काल फोन वर बोलताना लेकीचा मुड छान होता. शक्यतो तिच्या गप्पा ३-४ वाक्यातच संपतात. पण सध्या मे महिन्याच्या सुट्टीचे डोहाळे चालु झालेत. त्यामुळे स्वारी खुशीत होती. शाळेतल्या गमती जमती सांगायला आतुर झाली होती.
परवा म्हणे इंग्रजीच्या तासाला बाई 'अॅबस्ट्रॅक्ट' आणि 'काँक्रिट' नाउन शिकवत होत्या. तिसरीतल्या मुलांना समजेल अश्या शब्दात समजवण्याची बाईंची कसरत चालु होती. तरी जमेल तितकी व्याख्या सोप्पी करत बाई म्हणाल्या की अॅबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे ज्या गोष्टीं आपल्याला पहाता येत नाही वा वास घेता येत नाही किंवा स्पर्शही करता येत नाहीत त्या. उदा. ब्युटी, हॅप्पीनेस. आणि काँक्रिट नाउन म्हणजे अॅबस्ट्रॅक्टच्या विरुद्ध.
इतक्यात बाईंच वर्गातल्या आर्यकडे लक्ष गेल. त्याच्या टिवल्या-बावल्या चालु होत्या. बाईंनी आवाज चढवत त्याला काँक्रिट नाऊनचे उदाहरण देण्यास सांगीतले. बिचारा एकदम भेदरला. पण जरा डोकं खाजवून म्हणाला की 'टिचर सुसु. We can see, it smell it, and touch it.' आणि मग वर्गात एकच हशा पिकला. थोड्या वेळाने सगळं शांत झाल्यावर आमच्या बाईसाहेबांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. ती (मागील काही अनुभव गाठिशी असल्याने) हळुच बाईंच्या जवळ गेली आणि विचारल 'टिचर आपल्या शरिराच्या आतले भाग (हृदय्,मेंदु,हाडं) अॅबस्ट्रॅक्ट की काँक्रिट?' बाईंनी 'काँक्रिट' अस उत्तर दिल्यावर पुढचा प्रश्न आलाच. 'पण ते आपल्याला दिसतात कुठे? आपण टच पण करु शकत नाही की स्मेलपण घेउ शकत नाही?' बाईंच्या नशिबाने तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली.
असच एकदा वर्गात भुगोलाचा तास चालु होता. बाईंनी 'ऑर्बिट'ची व्याख्या फळ्यावर लिहिली आणि मुलांना उतरवुन घ्यायला सांगीतली. 'The curved path on which Earth rorates around Sun in a circular motion.' तितक्यात बाहेरुन कुणी तरी आल्याने पाचेक मिनिटाचा गॅप पडला. बाई परत फळ्याकडे आल्या. लेकीचा हात वर झालेला पाहुन बाईंनी विचारल काय शंका आहे?
'टिचर रोटेट ऑर रिव्हॉल्व्ह? रोटेट का मतलब अपने और ही घुमना होता है ना?' बाईंनी निमुट आपली चुक मान्य केली आणि तिच कौतुक केल. लेकचीचे विमान एकदम सातवे आसमाँ में. :)
एकदा गणिताच्या तासाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आकडे लिहिण चालु होतं. बाई पुस्तकात पाहुन आकडे लिहित होत्या. सगळ्या संख्या चार आकडी होत्या. पण पुस्तकातल पाहुन फळ्यावर उतरवताना बाईंनी एका चार आकडी संख्येतला एक आकडा खाउन टाकला. मुलांनी स्वतःची अक्कल लावून ती तिन आकडी संख्या सगळ्यात खाली लिहिली. मुलांचा अभ्यास तपासताना बाईंनी सगळ्या मुलांच उत्तर (पुस्तकातल्या उत्तराला प्रमाण मानुन) चुक दिल. (त्यांनी स्वतः घातलेला घोळ त्यांच्या गावी नव्हता.) पण नेहमी प्रमाणे लेकीला रहावल नाही. बाईंची चुक नजरेस आणुन दिली. म्हणे जर तुम्ही पुस्तकातला प्रश्न दिला असेल तर तुम्ही एक आकडा गाळलाय. आणि जर तुमच्या मनाच गणित घातलं असेल तर आमच उत्तर बरोबर आहे. बाईंनी काही न बोलता पाठ फिरवली आणि त्यांची चुक दुरुस्त केली. बाई साधं थँक्यु पण नाही म्हणाल्या ही तीची खंत तिने मला बोलुन दाखवली. :)
सध्या सगळ्या बाईंच्या चुका काढण्याचा नवा छंदच तिला जडलाय. हिंदीचा तास चालु होता. बाई फळ्यावर एक वाक्य लिहित होत्या 'और उसने डंडा उठाया |' शक्यतो हिंदी मध्ये बरेच वेळा ड खाली टिंब येते अस गेल्या वर्षी व्याकरणात शिकवल होत. ही बया परत उभी राहिली आणि बाईंची शाळा घेतली. हीची ख्याती माहित असल्याने बाईंनी पुस्तक उघडल आणि धडा चाळुन पाहिला. डंडा खाली टिंब दिसत नसल्याची खात्री करुन मग बाईंनी असा काही लुक दिला लेकीला की तिचे सारे तारे जमीं पर आले. ;)
वाचने
20646
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेक घरी येवून तुमचा गृहपाठ
हा हा हा
In reply to लेक घरी येवून तुमचा गृहपाठ by पाषाणभेद
सहि आहे लेक ..रीअलि शाळेतले
मुलीचा कल पाहून तिला योग्य दिशा द्या, ती नांव काढेल!
लेक हुशार आहे हो...
गणपा, लेक जबरदस्त तल्लख आहे!
+१
In reply to गणपा, लेक जबरदस्त तल्लख आहे! by बहुगुणी
लेकीचे आणखी किस्से असतील.
भारी चौकस पोरगी आहे हो!!
खर सांगु? तुम्हाला आम्हाला
'ती ना ती गणपाची लेक, फार
In reply to खर सांगु? तुम्हाला आम्हाला by स्पंदना
बाप रे
In reply to 'ती ना ती गणपाची लेक, फार by रेवती
काय 'दूरदृष्टी ' हो
In reply to बाप रे by रमताराम
आपला मुलगा चांगल्या घरी पडावा
In reply to बाप रे by रमताराम
आपला मुलगी चांगल्या घरी पडावी
In reply to आपला मुलगा चांगल्या घरी पडावा by रेवती
दिवस बदलले हो बाणा!
In reply to आपला मुलगी चांगल्या घरी पडावी by मदनबाण
दिवस बदलले हो बाणा! दिवस तसेच
In reply to दिवस बदलले हो बाणा! by रेवती
होय रे बाबा!
अगदी!! आमच्यावेळी हे असं
In reply to होय रे बाबा! by पिवळा डांबिस
शाब्बासकी द्या आमच्या वतीनं.
इ बबो...............
भावी संपादक.
तू ओककाकावाली नाडी बघून नाव
एकदम धमाल.
हा हा हा! जबर्या!
गणपाशेठ तुमचे काही खरे नाही.
बेश्ट!
एक नंबर
हा हा हा हा
हा हा हा...
छान !! अवांतर : मास्तरीणी चा
भारी..
आणखी किस्से येऊ द्यात लेकीचे, गणपाभौ..
In reply to भारी.. by चिगो
खीखीखी धमाल अनुभव !
धन्यवाद मंडळी. आधी म्हटलं
दणकट! एवढ्याश्या वयात इतका
बेष्ट... तिला हा लेख आणि
आत्ताच तिला लेख आणि सगळ्या
In reply to बेष्ट... तिला हा लेख आणि by भडकमकर मास्तर
___/\____!!!! =)) =))
In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा
ह्ये . काढली ना विकेट?
In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा
ढिचक्यॅ ऽ ऽ व ऽ ऽ..
In reply to आत्ताच तिला लेख आणि सगळ्या by गणपा
म्हणुनच म्हणतात
हा हा हा
हेहेहे पटलं खरच मनापासुन
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
हलकट्ट ...
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
गणपाशेट
छान छान छान
हाहाहा!
मस्त
हिच्या वेळी हिच्या आईनी काय
आणखी काय खाणार?
In reply to हिच्या वेळी हिच्या आईनी काय by पिलीयन रायडर
गणपाच्या रेसिपीज!
In reply to हिच्या वेळी हिच्या आईनी काय by पिलीयन रायडर
येस्स देअर यु आर.
In reply to गणपाच्या रेसिपीज! by संजय क्षीरसागर