मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वस्स्स्सकन् !!

यकु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लेखाखालच्या प्रतिसादातून वस्स्सकन् कुणीतरी अंगावर आले.. कुणीतरी चार डोक्यांनी विचार करणारा हेडटाईट असणार.. डोळ्यात चरचरीत अंगार आणि मनात झगझगीत शब्द आले.. वावराच्या नियमांनी चाप लावलेत म्हणून ते किबोर्डावरच खळखळ झाले आणि पुसले गेले. पुन्हा पुन्हा डोक्यात जाणारा वसवसता प्रतिसाद कोण साला घुसतोय नसत्या जंगलात.. उडतोय खालीपाली कुठच्या कुठे ** चा.. साध्‍या लेख, कवितावर अगदी शष्‍प पदार्थावर हॅलोजनच्या प्रकाशासारखी अक्कल टाकून शायनिंग मारतात... व्यंकट बुद्धीची पैदास ** ची... प्रोफाइल उघडून नीट पाहिलं तर तो स्वत:च मालकांपैकी एक होता.. मग मी गपगुमान खाली मान घालून लॉग आऊट केलं आणि चालू पडलो..

वाचने 4371 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by गणपा

सुहास.. 12/04/2012 - 21:26
जुनी मॅरेथॉन आठवली. एका दिवसात, एका कवीतेवर तब्ब्ल २०-२२ विडंबन पडली होती >> आणि एक त्यातली तुझ्यावरच होती ;) ... ( रनिंग ! )

In reply to by गणपा

चिंतामणी 13/04/2012 - 00:17
भळ्ळकन .. भस्सकन् .. खस्स्स्स्स् स्स्कन्. वस्स्स्सकन् !! आली आहेत. मिपावर विडबंन पंडीत खूप झाले आहेत. आणि आता फ्स्स्स्कन भरररकन पटटटकन चटटटकन फटटटकन इत्यांदी इडंबनाबरोबर संपादक मंडळाच्या खळ्ळ्कन ची वाट बघत आहे. (उबगलेला) चिंतामणी