Skip to main content

विनोद

धन्य ते गायनी कळा..!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 06/11/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
'गाणं' या गोष्टीशी सर्वांचाच आयुष्यात कधी ना कधी संबध आलेला असतो. पण ‘गायन’ करण्याचा प्रसंग मात्र सर्वांवरच आलेला नसावा. म्हणजे शाळकरी वय किंवा कॉलेजचं ग्यादरिंग वगैरे सोडून. तरीसुद्धा, ‘गायनी गळा’ असो अथवा नसो, ‘गायनी कळा’ मात्र सर्वांनाच आयष्यात केव्हा ना केव्हा हमखास येऊन गेलेल्या असतात. आणि प्रत्येक घराच्या बाथरूमच्या भिंतींना, घरातल्या सर्वांच्या या ‘गायनी कळा’ चांगल्याच परिचित असतात. (आणि काही घरांच्या टॉयलेटच्या भिंतींनासुद्धा ! ) या गायनी कळांनी आणलेल्या गमतीदार प्रसंगांचे काही किस्से. मंगल कार्याला पार्श्वभूमीवर गाणी वाजत ठेवण्याची पद्धत आहे.

मुलाखत .. आणखी काही मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 15/10/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
(एका मुलाखतीतील मुक्ताफळे.... दुसरा भाग) ‘कमिंन सर ?’उमेदवार क्र. ४ .. कॉलेजकुमार. ‘या. बसा तिथं.’ उमेदवार बसतो. ‘नाव ?’ ‘सुमित अरुण नार्वेकर ‘ ‘शिक्षण ?’ ‘MSCIT करून आता एस. वाय. बी. कॉमकरतोय. ’ ‘कॉम्प्यूटरवर १ ते ३० पाढे बनवायचे आहेत.कोणते Application वापराल ?’ मी. ‘अं..C किंवा जावा..’ ‘ते languagesआहेत.

एकापेक्षा एक.

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 09/10/2012 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार) "एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह"" "कोणाला हवी आहे" - दुकानदार "मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात) "** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्‍हाइकांसमोर) " ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?" " लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात" "तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?" " आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?" "("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना.

एका मुलाखतीतील मुक्ताफळे

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 08/10/2012 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : हापिसातील बॉस क्र. १ ची प्रशस्त वातानुकूलित केबिन. वेळ : हापिस सुरु होऊन १ तासानंतर. काळ : लवकर पुढे सरकत नसलेला कंटाळवाणा . प्रसंग : अकौंटस क्लार्कच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी (तब्बल) ६५ उमेदवारांच्या मुलाखतीचा. पात्रे : मुलाखतकार : १. बॉस क्र. १ २. सदस्य , लेखा विभाग ३. सदस्य , प्रशासन विभाग ४. मी , महिला सदस्य उमेदवार : ५८ मुली व ७ मुले १७ ते २० वयोगटातील. बॉस क्र. १ समोरच्या फायलीतली उमेदवारांची माहिती चाळून पाहत आहेत. बॉस प्रशासन सदस्यांकडे पाहून विचारतात.

जहालभाषाचिकित्सक

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 08/10/2012 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का? प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.

कॉन्स्पिरसी थिअरीज

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 30/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
.आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली. गणपती झाले... दसरा दिवाळी येत आहे. मिष्टान व मिठाईचे दिवस.. विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार.. बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार.. उद्देश हाच की चोकलेट्स भेट म्हणून द्या .. पारंपारिक मिठाई नको............................... म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्‍या बनवता येतात का पाहू. मी पण बनवल्या आहेत काही थिअर्‍या. १. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.

आधी बसू मग बोलू.

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 10/09/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
“बसणे” या शब्दाचे तसे वैकल्पिक आणि व्यावहारिक अभिप्रेत अर्थ बरेच आहेत. जसे “गाडीवर बसणे”, “खुर्चीवर बसणे”, “सकाळी सकाळी १५ मिनिटे एकांतवासात बसणे” इत्यादी इत्यादी. या सर्व प्रचलित अर्थांबरोबरच “बसणे” या शब्दाला एक स्पेशल अर्थ आहे. या “बसण्यात” सगळंच येतं, मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, कर्ता, कर्म, क्रियापद या सगळ्यांच्या व्याख्या या शब्दाला तंतोतंत लागू होतात. अगदी “उभयान्वयी” अव्ययाला “आडवे” करण्याची ताकद आहे या “बसण्या” मध्ये. असा हा “बसणे” शब्द विश्वव्यापक आहे. खरं तर ही एक साधना आहे, पण त्या साठी तुम्ही साधक असण्याची अट अजिबात नाही.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.