प्रश्नोत्तरे : चांदोबा नियतकालिक

लेखनप्रकार
चांदोबा नियतकालिकाचे जुने अंक कोठे मिळु शकतील? मला आंनद गिडे यांच्याकडे असल्याची माहीती होती. पण त्यांचा संपर्क होत नाही. टिपः मला हे प्रश्नोत्तरे या विभागात लिहायचे होते. पण त्यात लिहायची परवानगी नाही.

शब्दांची कर्णफुले

शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

मिसळपाव दिवाळी अंक २०२१ - आवाहन

अपडेट : भरघोस प्रतिसादासाठी सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार. दिवाळी अंकात निवडी विषयीचा निरोप सर्व लेखकांना २७ ऑक्टोबरपर्यंत कळवला जाईल

काही सदस्यांनी साहित्य संपादक तसेच ईमेल आयडीवर मुदत वाढवण्यासंदर्भात विचारणा केल्याने मुदत येत्या रविवार पर्यंत वाढवत आहोत. आजपर्यंत प्राप्त झालेल्या लेखनावर निर्णयप्रक्रिया + मुद्रितशोधन सुरू आहे.

पारवे पाळले होते

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे गावात भोई मास्तरांनी पारवे पाळलेले होते. (त्यांचं आडनाव भोईच होतं.) पारव्यांसाठी त्यांनी मोठं लाकडी खोकं तयार करून घेतलं होतं. खोक्याला लोंखडी जाळी बसवलेली होती. सकाळी त्या खोक्याचं दार उघडलं की पारव्यांचा थवा बाहेर उडायचा. गल्लीत, झाडांवर, भितींवर, घरांवर सगळीकडे ते उडत- चरत विहार करायचे. आणि संध्याकाळी बरोबर त्याच खोक्यात येऊन बसत. खोक्यात ती गुटूरगूम...गुटूरगुम करायची. भुई मास्तरांचा मुलगा- सुरेश त्यांना ‘आऽ आऽ’ करून बोलवायचा. दाणे टाकायचा. पारवे त्याला ओळखायचे. त्याच्या अंगावर बसायचे. त्याच्या आजूबाजूला न घाबरता बागडायचे. हे दृश्य पाहून माझं मन हरखून जायचं.

पुस्तकगप्पा

लेखनप्रकार
नमस्कार. 'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण. लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

भारांच्या जगात...५

लेखनविषय:
लेखनप्रकार
सगळं सगळं ठीक होतं भा. रा. भागवतांची पुस्तकं मिळवता मिळवता कधी सेंचुरी मारली कळलेच नाही. या प्रवासात अनेक लोकांनी सर्वतोपरीने मदत केली. एखादे दुर्मिळ पुस्तक मिळवायला, स्वत:च्या कलेक्शनमधून काढून द्यायला आणि काहींनी चक्क ती मी येत नाही तोपर्यंत अगदी जपून ठेवली होती. अशातच कधी काही पुस्तके गहाळ झाली, काही देतो म्हणून नंतर यू-टर्न घेऊन गेले. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कळाली. आयुष्य सुंदर आहे. फक्त हवे असणारे पुस्तक कधी ना कधी मिळाले पाहिजे. माझ्या स्नेही मित्रांनी काही पुस्तके माझ्यासाठी घेतली होती, त्यात मला काल भारांचं एक दुर्मिळ पुस्तक मिळालं, ‘सगळं सगळं ठीक होतं’.

नियतीचे वर आणि माणसाची निवड (कथा परिचय : ९)

लेखनविषय:
लेखनप्रकार
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख: १ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी ३. कुणास सांगू ? ४. ‘भेट’ तिची त्याची ५. नकोसा पांढरा हत्ती ६. ती सुंदर? मीही सुंदर ! ७. ‘लॉटरी’.....अरे बापरे ८. तीन मिनिटांची ये-जा ................................... आपणा सर्वांचे लेखमालेच्या नवव्या भागात स्वागत ! इथे एका बोधकथेचा परिचय करून देतोय आणि त्याचे लेखक आहेत मार्क ट्वेन. हे लेखक 19 व्या शतकातील एक नामवंत अमेरिकी साहित्यिक होते.

सरगोंड्यांची झिंग

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे विरगावला पद्मनाभ स्वामींची समाधी आहे. ह्या समाधीकडे जाण्याचा रस्ता अतिशय छान उतारवळणाचा आहे. दर वर्षी आषाढी आमावस्येला वा दीपअमावस्येला (जिला आपल्या भागात गटार अमावशा म्हणतात) तिथं यात्रा भरते. म्हणजे मी लहान होतो तेव्हा भरत असे. यात्रेच्या दिवशी तिथं लळितही साजरं होत असे. ‘लळित’ म्हणजे एक प्रकारचं नाटक असतं. भारूड सादर करायची कला म्हणजे ‘लळित’. आता ते होणं बंद झालं. त्यात भाग घेणारे कलावंतही एकेक करत वारले. दीपअमावस्येच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत बसायचा.

‘‘डंख व्यालेलं अवकाश’’

लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘‘डंख व्यालेलं अवकाश’’ या कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनंतर चेन्नईच्या ‘नोशन प्रकाशना’कडून नुकतीच प्रकाशित झाली आहे. २६ जानेवारी १९९९ ला या संग्रहाची प्रथमावृत्ती ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या अनुदानाने (परस्पर) नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली होती. पहिल्या आवृत्तीत १९८९ ते १९९२ या चार वर्षातील निवडक सत्तर कविता समाविष्ट होत्या. या आधीच्या आणि नंतरच्या कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट नव्हत्या.
Subscribe to वाङ्मय