Skip to main content

वाङ्मय

पुर्वग्रह-आनंदाला ग्रहण

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 01/03/2022 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात‌. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत. जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".

मी मोठा झालो.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 25/02/2022 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही...

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/02/2022 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही. ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात?

नवकवी आणि आचार्य अत्रे

लेखक सागरसाथी यांनी शुक्रवार, 18/02/2022 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९२९ साली 'पहिले कविसंमेलन' भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात भरले होते. या कविसंमेलनाचे आचार्य अत्रे स्वागताध्यक्ष होते त्यांनी तिथे केलेले भाषण हे भविष्याचा किती वेध घेणारे होते हे त्याचा सारांश वाचल्यावर लक्षात येईलच. त्यांच्या भाषणाचा सारांश त्यांच्या शब्दात....... "तशाच या सणासुदीच्या कविता. चंद्राला गिऱ्हाण लागले म्हणजे दान मागण्यासाठी जशी काही लोकांची धांदल उडते, तसे एखादा सण आला म्हणजे आमचे कवी लोक सैरावैरा धावू लागतात. संक्रांत आली की यांचा शिमगा सुरू झालाच. दसरा आला की हे घोड्यावर बसून शिलंगणाला निघालेच.

मुराकामी

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 04/02/2022 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..! त्याच्या कादंबऱ्यातली माणसं काही हिरो-बिरो नसतात. पण अशा सिंपलशॉट माणसांनाही मुराकामी फारच ताकदीने आपल्यापुढे पेश करतो.. कल्पनेच्या भल्यामोठ्या कॅनव्हासवर तो पात्रांना मनसोक्त खेळवतो. पात्रांसोबतच आपल्यालाही खेळवतो, जोखतो..!

ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट

लेखक nemake_va_mojake यांनी शनिवार, 29/01/2022 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट* शब्दब्रह्म हा बऱ्यापैकी वापरातला शब्द आहे. या शब्दाला प्राचीन परंपराही आहे. पण अर्थात तो बऱ्याच सैलपणेही वापरला जातो. सध्याच्या काळात माझ्यासारखा बोटांचा चाळा म्हणून काहीही खरडणाराही शब्दब्रह्माचा उपासक आणि भर्तृहरिसारखा साक्षात्कारी सखोल तत्त्वचिंतकही शब्दब्रह्माचा उपासक. फरक असतो तो उपासनेच्या दर्जाचा. भर्तृहरिसारखा थोर चिंतक स्फोट-सिद्धांतातून आदिम नादतत्त्व ते शब्दाचं प्रकट रूप किंवा स्फुट ध्वनिरूप (पश्यंति ते वैखरी) या प्रवासाची उपपत्ती मांडतो. आणि मी माझी फुटकळ, शब्दबंबाळ यमकं जुळवताना जेरीला येतो. पण म्हणून काय झालं? "शब्दब्रह्माचा उपासक"च!

झपाटलेल्या संग्राहकाचा खडतर ग्रंथशोध

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 13/01/2022 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता. वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली. अक्षरधारा-प्रदर्शनामधून केलेल्या मागच्या पुस्तक खरेदीला आता वर्ष उलटून गेले होते.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/11/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो.

लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 26/10/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
.img1 { float: left; width:50%; margin-right:15px; margin-top:32px; } .img2 { float: right; margin-left:15px; width:50%; margin-top:32px; } लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे. साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात.