Skip to main content

वाङ्मय

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 08/08/2023 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्जन प्राणी समजावे. परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे. महत्त्व देऊनी. समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 04/08/2023 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 29/07/2023 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/06/2023 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.

प्रॉफेट : खलील जिब्रान : पुस्तक परिचय

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 30/05/2023 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॉफेटः खलील जिब्रान.. प्रॉफेट हे अगदी छोटेखानी पुस्तक . त्यातल्या भाषेने अगोदर लक्ष्य वेधून घेतले. आणि मजकुराने वेड लावले. पुस्तक कधी वाचले हे आता लक्ष्यात नाही. पण रजनीशांची प्रवचने ऐकताना त्याचा उल्लेख बरेचदा होतो. प्रॉफेट हे पुस्तक प्रकाशित झाल्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. जगातील १०० पेक्षाही जास्त भाषांमधे या पुस्तकाचे अनुवाद झालेले आहेत. ( बोरकरांनी याचा कोकणी मधे अनुवाद केला आहे) खलील जिब्रान हा मूळचा लेबनान मधला. कुटुंबा समवेत तो अमेरीकेत आला.

थ्री कप्स ऑफ टी : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन : पुस्तक परिचय

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/05/2023 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
थ्री कप्स ऑफ टी. : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन. या पुस्तकाच्या नावात बरेच काही दडलेले आहे.गिलगिट बाल्टीस्तानमधे एक म्हण आहे. की जेंव्हा बाल्टीस्तान मधले लोक तुम्हाला एक पहिला चहाचा कप देऊ करतात त्यावेळेस ते अतिथी चे स्वागत करायचा शिष्टाचार म्हणून असते. तुम्ही त्यांच्यासाठी आगांतुक असता. ते जेंव्हा तुम्हाला चहाचा दुसरा कप देऊ करतात तेंव्हा त्यानी तुम्हाला त्यांचे पाहुणे म्हणून स्वीकारलेले असते.

बदललेला स्वभाव.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 07/04/2023 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक...!) सकाळी जाग आली ती मिक्सरच्या आवाजाने. आज रविवार सुट्टीचा दिवस ठरवलेलं चांगली झोप काढावी. पण निवांतपणे झोपून देईल ती बायको कसली. प्रेत्येक सुट्टीच्या दिवशी कशा ना कशाच्या आवाजानेच झोप मोड होते. कधी भांड्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा आवाज, तर कधी आणखी कशाचा आणि काहीच नसलं तर मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्याच्या आवाजानं.

पुन्हा एकदा पहाट झाली

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 17/01/2023 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस रोज एक कावळा पुनईच्या उंंचच उंच झाडावर बसून आपल्या घराण्याचा तीव्र स्वर सोडून कोमल स्वरात साद घालताना दिसत होता. त्याच्या गोड बोलण्याला दाद देणारे आसपास कोणीच दिसत नव्हते. गावात कावळे दिसेनाचे होवूनही कितीतरी काळ लोटला हे त्याला माहीतीच नसावे असे वाटत होते.

पुस्तक परिक्षण-टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 10/01/2023 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आपण जवळपास सगळयांनीच नव्वदच्या दशकात झालेली टेलिकॉम क्षेत्रातील क्रांती अनुभवली आहे. त्या दशकात साधारण घरोघरी टेलिफोन आला, आणि जागोजागी एस टी डी/ पी सी ओ उघडले. तोवर गल्लीत/आसपास एक दोन जणांकडे टेलिफोन असे आणि सगळ्यांचे निरोप त्यावरच दिले/घेतले जात. शेजारधर्म म्हणून ते सरसकट मान्यच होते. त्यात फोनधारकालाही आपण काही विशेष करतोय असे वाटत नसे. फारतर त्याची कॉलर जरा टाईट असे इतकेच. फक्त हे फोन कधी कधी दहा दहा दिवस बंद असत तर कधी कधी रॉंग नंबर लागून पैसे वाया जात असत.