मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060)
वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते.
मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.