मराठी गाणी
आता जरा नवीन व जुनी गाणी आठ्वूया, एका शब्दावरून किती गाणी आठवता आहेत ते बघूया . हे संकेत स्थळ मराठी साठी असल्यामुळे मराठी गाणी आठवूया. शब्द आहे जीवन.
माझ्याकडून : जीवनात ही घडी अशीच राहू दे. धागा आवडला नाही तर प्रतिसाद देऊ नका. ज्यांना गाणी आवडतात त्यांना लिहून देत.
गाल चोळ फक्त
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही
पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग
ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही
नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग
तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग
पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग
पैजारबुवा,
यमन
हल्ली संध्यकाळी मस्त गार वारे सुटतायत. असच अचानक त्या दिवशी ते सूर पुन्हा मनात घुमू लागले. आतल्या आवाजामुळे त्या संध्येचे रंग अजून खुलू लागले. मला संगीतातलं शास्त्र खरच कळत नाही पण हि सुरावट माझ्या मनात एकदम पक्कं घर करून राहिलिये. शाळा-कॉलेज च्या वयात असताना फिल्मी गाणी, खास करून हिंदी ऐकायची खूप सवय पण फार तर फार समजले तर शब्द कळणार. आणखी गाण्यात काय ऐकण्यासारखं असत? असं मला वाटायचं . आता एक-दोन वर्षापूर्वी थोडी थोडी मराठी गाणी ऐकायला लागलो .
मराठी वाहिनीवर आलेल्या एका प्रसिद्ध स्पर्धेत तर अजून बरीच गाणी ऐकायला मिळाली.
ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी
मेल बॉक्स उघडल्यावर नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या.
नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते.
हल्ली तुम्ही भलतंच काही करत आहात का ?
तुम्ही हल्ली भलतंच काही करत आहात ?
असाल, तर हा धागा खास तुमच्यासाठी आहे.
मित्रांनो, आपण मिपाकर म्हणजे छांदिष्टांची मांदियाळी - आपण काय काय करत नाही? कशानंतरी भारून जाऊन, रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी नवीन, वेगळंच, भलतंच - असं काहीतरी करण्याचा आपल्यापैकी प्रत्येकालाच नाद असावा. खाजच म्हणा हवंतर.
तर सध्या तुम्ही असं भलतंच काय करत आहात ? ते लिहिण्यासाठी हा धागा.
सुरुवात स्वत:पासून करतो:
---------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्या मी 'उदरनृत्य' अर्थात 'बेलीडान्स' शिकण्याच्या खटाटोपात आहे.
क्षण ते...
क्षण ते (कॉलेज डेज)
क्षण ते, फांदीवरी बसलेले
क्षण ते, झुळकीसवे झुरलेले
क्षण ते, संपुनही उरलेले
मज मिळतील का पुन्हा
सवे, झुलतील का पुन्हा
मज सांग रे मना.
क्षण ते... ॥धृ॥
नभ भासे विहरण्या, पंखाना तोकडे
थांबावे ते कुठे, नच आम्हा सापडे
त्या पक्षांचे थवे, आता जमतील का पुन्हा
भिजुनी मने, जुळतील का पुन्हा
क्षण ते .. ॥१॥
हसण्यात आमुच्या जग सारे विरघळे
गाण्यात आमुच्या मन सारे पाघळे
रंगाने आमुच्या आता रंगेल का आकाश
गंधाने आमुच्या पसरेल का सुवास
क्षण ते ... ॥२॥
काळ जाई रे पुढे मन मागे ओढते
गळलेली ती फुले पुन्हा जोडु पाहते
त्या बागेत बहर आता नाचेल का पुन्हा
मातीत आमुच्या दिसतील का खुणा
क्षण ते ...
काव्यरस
२१ डिसेंबरचे प्लॅन्स
तर मित्रहो,
२०१२ हे वर्ष पृथ्वीच्या इतिहासातले शेवटचे वर्ष असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे. २०१२ साली जग नष्ट होणार, हे भाकित माया की अॅझ्टेक लोकांनी फार वर्षांपूर्वी करून ठेवले आहे, त्यानुसार २१ डिसेंबर २०१२ हा दिवस हा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असणार आहे. 'सॅंडी'ने चुणूक दाखवलीच आहे. त्याप्रमाणे 'बिगिनिंग ऑफ द एंड' सुरू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला या विषयाचा फार गहजब झाला, पण प्रत्यक्षात हा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसा त्या मानाने फारसा गवगवा होताना दिसत नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे!
शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्या-कोतार्यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.
रागिणी सुहावनी- किरवाणी
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे.
मिसळपाव
