माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.
मिसळपाव
कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.