लेखकप्रज्ञादीपयांनी शुक्रवार, 26/03/2021 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गीत - जरासी आहट होती है तो दिल सोचता है ,कही ये वो तो नही
जब whatsapp पे unknown no से Hii का massage आता है
तो दिल सोचता है कहीं ये वो तो नही ....
जब भी instagram पे profile photo change करती हुं
follower न होने के बावजुद भी massage request आती है nice DP
है ये उसीकी अदा ...है ये उसीकी सदा
कहीं ये वो तो नही .....
दिल में उठती है धडधडीसी
नस-नस में मचलने लगी चिंगारीसी
जब किसी नं से blanck call आता है
और सुनने में आता है बस अखियोंका पानी
...कहीं ये वो तो नहीं ..कहीं ये वो तो नहीं
हाक........
देवा, मारु कशी रे तुजला हाक...
किती संबोधने कामी आली..
मम प्रतिभाही इथे निमाली..
तरी म्हणसी मजला तू रे..
अजुनी करुणा भाक...
ईश्वरा, मारु कशी रे तुजला हाक..
संग तुझा नित मजला असुनी..
कधी वाटते एकाकी मी..
पसरुनी बाहु पुन्हा मागते..
तुझीच केवळ साथ..
प्रभो, मारु कशी रे तुजला हाक..
आयुष्याच्या अवघड वळणी..
देवदूताची साथ घेऊनी..
पुढती आले कशीबशी मी..
संमुख आहे ही वैतरणी..
गाठू कसा रे काठ..
कृष्णा, मारु कशी रे तुजला हाक..
गुरुरायांनी धरुनी मम कर..
अश्रू पुसुनी दिधला मज धीर..
प्रेमभरे दाखविली त्यांनी..
नामाची ही वाट..
अनंता, मारु कशी रे तुजला हाक...
लेखकज्योति अळवणीयांनी शुक्रवार, 19/03/2021 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीत्वाचा सन्मान
नका होऊ नतमस्तक
मी कोणी देवता नाही..
नका म्हणू अष्टभुजा;
मी काली-भवानी नाही!
कधी मखरात... कधी वेश्यागारात...
मान मात्र कधीच नाही!
मनुष्य जन्म माझा ही;
एवढंच स्वीकारणं का शक्य नाही?
जग तुझ्या मनासारखं...
तुला कोणतंही बंधन नाही!
एकदा तिला हे सांगून तर बघा...
अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!
लेखकअनन्त्_यात्रीयांनी शनिवार, 13/03/2021 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळत्या झाडावरती
किलबिलणार्या पंखांनी
आणले नभातून जे जे
ते तुझ्याचपाशी होते
अर्थाचे अनवट कशिदे
विणणार्या चित्रखुणांना
जे जटिल असूनही कळले
ते तुझ्याचपाशी होते
तार्यांच्या मिथककथांचा
आकाशपाळणा अडता
जे पुरातनाला सुचले
ते तुझ्याचपाशी होते
लेखककर्नलतपस्वीयांनी सोमवार, 08/03/2021 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा
महिलादिन
दाखवण्याचे दात वेगळे
जगण्याची ऱीत आगळी
जागतीक महिलादिनी
मोजा किती आसवं गळली
किती चढल्या बोहल्यावरी
किती ठरल्या हुंडाबळी
असल्या कसल्या रितीभाती
कधी तुडवे पायतळी
तर कधी घेई डोईवरी
सारे दिवस थोतांड
उद्दमींचे कुभांड
तुबंडी भरण्यासाठी
एक दिवसांचे खोटे पण
नको दिन नको सण
रावा माणसागत सारे
नको उत्सव दिनांचा
मला माझी जागा द्यारे......
८-३-२०२१