Skip to main content

कविता

कवितेनंतर

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 23/04/2021 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेनंतर बाकी उरल्या शब्दांचे विभ्रम मी बघतो ऐकून आहे ठिणगीचाही बघता बघता वणवा होतो वळीव कोसळता वणव्यावर राखेची रांगोळी होते अगणित थेंबांतिल थोड्याश्या थेंबांची पागोळी होते सोसून पागोळ्यांचा मारा, तरारून अंकुर जो फुटतो वृक्ष होऊनी त्याचा, अनघड शब्दांनी तो डवरून जातो पाठशिवणीचा नाद लावुनी शब्द बीज वळचणीत रुजते कधीतरी त्यातून अचानक ओळ नवी कवितेची फुलते - पण ओळीच्या पैलतिरावर अनाघ्रातसे काही उरते
काव्यरस

..बहुतेक रेशमी होते!

लेखक राघव यांनी रविवार, 18/04/2021 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आकार घडीव घडले.. [पण] आघात अनावर होते! डोळ्यांशी डोळे भिडती.. संवाद कोवळे होते! स्वत्वाची ओळख नाही.. [प्रतिबिंब सोवळे होते!] अंधार असु देत जरासा.. तेजाचीच सवय होते! आयुष्य क्षणांतून घडते.. अन् क्षण, मोजके होते! -- निसटून जातसे काही.. बहुतेक रेशमी होते! राघव

अध्यात्माची भूमिती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 14/04/2021 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनादिच्या अलिकडचा "अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला. मग अनंताला स्पर्श करू धजणारा, ज्ञानगम्य असा, "ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला. "अ" ला "ज्ञ"शी जोडणारी "अज्ञ" ही रेषा आखली. ह्या रेषेवर माझ्याच जवळपास कायम घोटाळणारा "हम्" हा बिंदू निवडला. "अज्ञ" या रेषेशी लंबरूप, फटकून असणारे, "सोs" हे प्रतल असे निवडले की ते "अज्ञ" रेषेला "हम्" बिंदूत छेदेल. "सोs" प्रतलावरील १,२,३,....
काव्यरस

चैत्री पाडवा....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 11/04/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्री पाडवा.... नवी पालवी चैत्राची ती, रंग तिचा हिरवा.. पारंब्यांवर झोके घेई, एक वेडा पारवा... पानोपानी फुलली जाई, दरवळे अंगणी मरवा.. मुदित सृष्टी बहरून जाई, वसंत ऋतु हा बरवा.. मंदिरातला मृदुंग बोले, सुमधुर तो केरवा.. संध्यासमयी कानी येई, दूर कुठे मारवा.. सजतील सदने, गुढ्या तोरणे, पाडवा आहे परवा.. नववर्षाची नवीन स्वप्ने, संकल्प मनी ठरवा.....! जयगंधा.. ११-४-२०२१.

पाचा ऊत्तराची कहाणी

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 08/04/2021 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
देवाघरची नाती संभाळावी खत पाणी घालुन वाढवावी तेव्हा कुठं प्रेमाच फळ आणी विसाव्या पर्यंतची साथ मिळते पाचा ऊत्तराची (आयुष्याची) कहाणी साठा ऊत्तरी सुफळ संपूर्ण होते जो पर्यंत होत नाही जाळ तो पर्यंत तुटत नाही नाळ कमळाची फुले सोडुन उचलत बसतात गाळ नाईलाजाने आशांची साथ आणी हातातला हात सोडावा लागतो कारण बुडत्याचा पाय खोलात आसतो पण आतला माणुस काही मरत नाही माणुसकीचा उमाळा काही सुटत नाही कधितरी कुठेतरी थांबावेच लागते स्वताःचे अस्तित्व जपावेच लागते नाही सोडली आशांची साथ तर मग तो ठरेल आत्मघात देवाचं काम देवावर सोपवावे माणसातल्या देवाने हरी हरी करीत बसावे पांडुरंग हरी वासुदेव हरी।
काव्यरस

कबुलीजबाब

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 07/04/2021 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
रोज तो जुळवून अपुली एक कविता ठेवतो वृत्त-मात्रा-अर्थ-लय- -छंदात निशिदिनी रंगतो जे न दिसते रविस तेही मिटून डोळे पाहतो काव्य अन् शास्त्रामधे तो क्षण नि प्रतिक्षण डुंबतो कल्पनांचे भव्य इमले सुबकसे तो बांधतो (मी तयांची द्वारपाली आपखुशीने निभवितो) विविध प्रश्नांचा तुम्हाला अटळ छळ जो जाचतो मात त्याला देऊनी तो मिति-दिशा ओलांडतो शब्द धन वाटून अविरत थकून कधि तो थांबतो (मी ही त्या दुर्मिळ क्षणाची वाट गुपचूप पाहतो) आजवर कोणा न कथिले तेच आता सांगतो कल्पना उचलून त्याच्या मीच कविता प्रसवितो
काव्यरस

या अशा कुंठीत वेळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 03/04/2021 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
एकही कविता आताशा काळजाला भिडत नाही शब्द मोहक विभ्रमांनी  भ्रमित आता करीत नाही कोरडा असतो किनारा  लाट फुटते मत्त तरिही जखम होते खोलवर पण  रक्त आता येत नाही प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,  बीजअक्षर श्रांतलेले भंगलेल्या देवतांना  आळवूनी भ्रष्टलेले मार्गदर्शी ध्रुव अन्  सप्तर्षी आता लोपलेले दीपस्तंभांचे दिवेही  भासती मंदावलेले या अशा कुंठीत वेळी दाटुनी येते मनी विफलता, जी रोज उरते  रोमरोमा व्यापुनी एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी
काव्यरस

श्रीरंग....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 02/04/2021 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीरंग.... सावळ्याचा शाम रंग.. भक्तिमाजी गोपी दंग.. प्रेमाचे उधळुनि रंग.. स्वानंदे भिजले अंग.. ममत्वाचा होई भंग.. अहंतेचा सुटे संग.. वैराग्याचा मनी तरंग.. उजळुन जाई अंतरंग.. जाणिवेत "मी" च गुंग.. "तो" चि "मी" श्रीरंग... "तो" चि "मी" श्रीरंग... जयगंधा... ६-३-२०१७.
काव्यरस

सावली

लेखक सरीवर सरी यांनी मंगळवार, 30/03/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
असं कधी झालंय का? आपली सावली ..राहिलय उभी किती तरी वर्षांची पानं उडून गेली काळाची काजळमाया सरून गेली.. तरी अवचित ही सामोरी राहिलय उभी.. मी तिला पाहते,मनभरून न्याहाळते समोरूनी ती पुढली वाट चालू लागते सांगाव वाटे तिला ही वाट अशी कठीण असते कशाला धावते आत तरी हात हाती घेते? ती चालत राहते ...कधी माझ्याकडे पाहत हसते.. मी बघत राहते.. हळूच हसते