Skip to main content

कविता

प्रोफाइलवरती बाई..!!

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 26/02/2021 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून) प्रोफाइलवरती बाई अशि काही दिसते धासू तो फोटो पाहुन येती झुंडीने चावट वासू कुणी भोजनपृच्छा करतो कुणी थेट घालतो डोळा बाईच्या भवती जमती भुंगे सतराशे सोळा बाईचे आशिक मुबलक कुणि पुतण्या तर कुणि काका रंगेल एकसे एक बाईस मारिती हाका मेसेज पटापट येती गालात हासते बाई पाहता गड्यांची गर्दी तिज हसू अनावर होई ती विचार करुनी लिहिते, पुसते, -अन पुन्हा लिहिते ते 'टायपिंग..' दिसताच वासूंचे भान हरपते डोळ्यात प्राण आणूनी व्याकूळ पाहती वाट कंठाशी येती प्राण वासूंची हालत 'ताठ' दो अशाच घटका जाती मग 'टिंग!' वाजतो फोन वासूंच्या टोळ्या येती तो वाचण्यास धावून उघडता फोनचा प

भगवंत....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 26/02/2021 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंत..!! भुकेल्यास देई अन्न, दुर्बलास धीर, आंधळ्याची काठी होई, तोच खरा थोर... दीनजन सेवेसाठी, झिजवी "तो" शरीर, याचकासि कर्ण होई, तोच खरा थोर... तान्हुल्यास क्षीर देई, तृषार्तास नीर, कुणा द्रौपदीस चीर देई, तोच खरा थोर... अनाथांची होई माय, शत्रुपुढे वीर, पतितांना उद्धरुन नेई, तोच खरा थोर... कुणी म्हणती गुरु त्याला, कुणी म्हणे संत, सर्वांतरी तोच आहे, माझा भगवंत.....!!! जयगंधा.. २४-२-२०२१.
काव्यरस

आतल्या आत

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 21/02/2021 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भचौकटी मोडून पडल्या तेव्हा मी अधांतराचा धरला अलगद हात मग रिक्तपणाने भरलो काठोकाठ अन् ओसंडून सांडलो आतल्या आत धगधगून निखारे विझून गेले तेव्हा मी हिमपातावर कसून केली मात मग पलित्यातळिच्या अंधारात बुडालो अन् लखलख तेजाळलो आतल्या आत भ्रमनिरास बनले जगणे सगळे तेव्हा मी सुखस्वप्नांचा सहज सोडला हात जरी भोवतालच्या कोलाहली विस्कटलो उलगडलो अवघा पुन्हा आतल्या आत
काव्यरस

तोरण मरणाचे

लेखक गणेशा यांनी रविवार, 21/02/2021 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच.. --- . आयुष्याच्या क्षितिजापाशी भावनांचा उडतो कल्लोळ.. मागे जीवनाचे सैल धागेदोरे अन पुढे असते तोरण मरणाचे पक्षी उडून जातात घरट्यात अन स्तब्धता उरते मागे... हसत दिवस जातो खोटाच अन मग रात्र सावरण्यास येते.. प्रकाश शोधण्या जीवन संपते अन क्षितिजावरती कळते शेवटी अंधार असतो खरा सोबती तोच सुरुवात..अन तोच शेवट.. - शब्दमेघ, मुक्त..स्वैर..स्वछंदी..जीवन २१-०२-२०२१
काव्यरस

वार्‍याने पेटते रान आता हे ..

लेखक गणेशा यांनी रविवार, 21/02/2021 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
घामाच्या चिंब भरलेल्या सदर्‍याला ठिगळे अनेक रंगबेरंगी.. पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली बेसुमार झीज पायाची .. वार्‍याने पेटते रान आता हे कशास विचार फुका.. होरपळले शेत जरी हे ढेकळाचा रंग काळा तो काळाच.. ठिंणगी बनलेला विचार तुझा तू दूर आकाशातील तारा .. ओसाड ह्या जगण्यावरती उगा बुजगावण्यांचा पहारा.. दगडाला कुठे फुटतो पाझर ? कुठे शोधु देवपण त्याच्यात ? जन्मलो मातीत या पुन्हा मातीत मिटण्यासाठी... -- शब्दमेघ (शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)
काव्यरस

प्रवासी

लेखक आर्णव यांनी रविवार, 21/02/2021 06:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी ती चाहुल नश्वरतेची, नाशाचे गूढ इशारे ते रणरणते निखारे, भयाण वादळी वारे मिरवले मुखवटे खोटे, रमताना माया जाळी धुक्यात

आपलेच दात.....

लेखक मका म्हणे यांनी शनिवार, 20/02/2021 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी दुधाचे दात पडून त्या जागी नवीन यायचे. वाईट वाटायचं एखादा दात पडून गेला की काही वेळ कधी कधी तर, असा पडलेला दात, आठवण म्हणून जपून ठेवायचो दिवसेंदिवस सवयीने जीभ तिथं जायची आणि मग आता तिथे काहीच नाही हे लक्षात आल्यावर परत यायची काही दिवस तर तो एक चाळाच होऊन बसला होता मनाला मग पुन्हा त्या जागी एक नवीन दात दिसायला लागायचा हळुहळु.. हा दात इतर आधीच असलेल्या दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा याचा आकार, ठेवण निराळी असायची हा अधिक तजेलदार, बळकट आणि सशक्त असायचा, इतरांच्या तुलनेत आरशात स्वतःला पाहताना या नवीन दातामुळे चेहऱ्याला आलेल्या वेगळेपणाकडे लक्ष जायचं... काही नवे, काही जुनेच असे घेऊ

गाठोड

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 18/02/2021 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
खतपाणी घातलं निगा राखली झाडाची बिज होत चागंल तरी फळे मीळाली विषाची वाटल झाड आहे दुबळं त्याला द्यावी साथ देणार्‍याचा अदांज चुकला तुटायला आले हाथ जरी ऋणानुबंधाच्या गाठी तरी प्रारब्धाचा खेळ कर्मच नाही चांगल तर जुळणार कसा मेळ आपल घर आपणच बाधांयचे पेरललं तेच उगवायचे क्षणभराची विश्रांती घेऊन पुन्हा इथेच यायचे कोण कुणाला पुरायचं म्हणूनच आतल्या देवाला निरंतर जागवायचं आयुष्याच गाठोडे आपण आपलच पेलायचं १६-२-२१

मुर्ख

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 15/02/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या उतरणीला सगळे बोट दाखवतात तु किती मुर्ख आहे म्हणून सारे हीणवतात माणुसकीच्या नात्यानं जमेल तेवढे करत होतो स्वतःच्या स्वार्था आधी जबाबदारीला पुढं ठेवत होतो तीच जबाबदारी आता मुर्खपणा ठरते ज्यानां आधार दिला त्यांच्याच कडुन कळते जेव्हां चुकत होतो तेव्हां बरोबर म्हणायचें गणित नाही कळाले आता बरोबर वागताना मार्क शुन्य पडले आता काय उपयोग हे सगळं बोलून जेव्हा हातातले सारे पक्षी गेले उडून मेल्या सगळ्या भावना बोथट झाल्या संवेदना पण आतला माणुस काही मरत नाही माणुसकीचा लळा काही सुटत नाही शहाण्यांच्या जगात हे आसचं चालायच "शहाण्या" लोकां कडून कस जगायचं हे नव्यानं आता शिकायचं माणुसकीच्या

मुक्त

लेखक सरीवर सरी यांनी रविवार, 14/02/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..
काव्यरस