Skip to main content

कविता

जुन्या चहाची नवीन उकळी

लेखक मनमेघ यांनी सोमवार, 07/06/2021 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या चहाला पुन्हा नव्याने उकळी आणू, दात नसू दे, चणे खायला कवळी आणू! अंदर नंगे बाहर चंगे सगळे येथे ज्ञान पाजण्या कफनी थोडी ढगळी आणू! ढंग, लहेजा, भाषा आपली आतषबाजी, माळ लवंगी, बॉम्ब लक्षुमी-सुतळी आणू! दुनियेला या कसले सोने लागुन गेले? आपण आपली बाळ बाहुली (बेबी डॉलही) पितळी आणू! गूण लागला नाही तरिही वाण लागु दे ढवळ्या-पवळ्यासाठी ढवळी-पवळी आणू ! कृष्ण व्हायचे आहे पण वाजेना पावा, दह्या-दुधा-लोण्याला शोधुन गवळी आणू ! ~मनमेघ
काव्यरस

इंद्रधनू....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 07/06/2021 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू... निरोप घेताना म्हणालो मी, माझी आठवण ठेव.. नशिबापुढे हतबल आपण, जोड्या ठरवतो देव.... क्षणात सारं बदललं तरी, विसरू कशी तुला..? तिचे साश्रुपूर्ण नयन, विचारत होते मला.... निशब्द शांततेत घुमला, उदास तिचा उसासा.. पण हात हाती घेऊन दिला, तिनंच मला दिलासा.... केली जरी प्रीती, पण सोडली नाही नीती.. अपराधासम खंत कशाला, सोड मनातील भीती.... शब्द असे पडता कानी, धरिले तिचे पाय.. परमहंस नाही गं मी, पण तू आहेस शारदा माय.... शेवटच्या त्या भेटीमध्ये, मनं झाली साफ.. विशाल हृदयाच्या तिनं, केलं मला माफ.... आयुष्यात आता पुढे जाईन, बाळगणार नाही तमा.. खूप समाधान देऊन गेली, तिची अनमोल क्षमा.... भांबावल
काव्यरस

कसाही बरसला, तरी मजा ती संपली.

लेखक Sanjay Uwach यांनी शनिवार, 05/06/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
कसाही बरसला, तरी मजा ती संपली. मन घाबरे घाबरे, जीव झाला व्याकुळ कुठे दिसेना रस्ता, सर्व अंधार अंधार. कधी शित सरी मध्ये, नाहुनी निघालो सवगड्यांच्या संगे, चिंब चिंब झालो कधी थंड वारा अंगास झोंबला अंगातल्या रगेने,तो ही तिथे शमला पण आज तुला पाहताना, दूर दूर पळालो जीवाच्या आकांताने, घरा मधे धावलो कुठे आशेचा किरण, हळुच डोकावला काळया कुट्ट ढगा मध्ये, लख्ख विजेचा प्रकाश रोज ऐकुन नवीन नवीन, माणूस सरावला जीवाचा काय तो मोल, गेलेे सारे विसरून कोडग्या मनाला, आता काय ती भीती कसा ही बरसला, तरी मजा ती संपली.
काव्यरस

|चाफा|

लेखक सरीवर सरी यांनी शुक्रवार, 04/06/2021 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्राची ताईचा चाफा तुझी आठवण नागचाफा सळसळत केशर अत्तर मन माझे मोहणारा तुझी आठवण गुलाबी चाफा प्रीतधारा बरसवणारा रंगाने सदैव मोहवणारा तुझी आठवण कनकचंपा डुलत डुलत कर्णिकार मधाळ सुंगधी झंकारणारा तुझी आठवण देव चाफा रेशम निशा वेळी तेज:पुंज रोजच उजळणारा

||चाफा..||

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 02/06/2021 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण भुइचाफा जो आत लपवता कंद मृण्मयी पहिली सर अन् रुजून येई. तुझी आठवण हिरवा चाफा मोहवणारा खुणावणारा दृष्टीला परि नच दिसणारा. तुझी आठवण पिवळा चाफा मधुगंधाने दरवळणारा सुकला तरिही जाणवणारा. तुझी आठवण कवठी चाफा तिन्हिसांजेला हळू उमलतो रात्रि सुगंधी सोबत करतो. तुझी आठवण खुरचाफ्यासम अपर्ण होउन मूक फुलांनी भरून अंगण तुलाच अर्पण.

गेल्या सहस्त्रावधी वर्षांत हिंदुस्थानमध्ये लागलेल्या होळ्या!!

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या होळीला मला आठवल्या त्या राजपूत स्त्रियांनी केलेल्या जोहारच्या होळ्या पृथ्वीराज, संभाजी महाराज, राजा दाहीर यांनी केलेल्या सर्वस्वाच्या होळ्या, नंतर इंग्रजांबरोबर स्वातंत्र्ययुद्धात अनेक वीरांनी केलेल्या आपल्या संसाराच्या होळ्या. जन आला दिन होळीचा, उधळीत विविध हे रंग आसेतु-हिमाचल राष्ट्र, होलिका स्वागता दंग ! उत्साह खरोखर मोठा, पक्वान्ने घर घर बनती पण मज या हर्षोल्हासी, वेगळ्या होलिका स्मरती! भूपाल सिंध प्रांताचा, आठवतो मज दाहीर ज्याने पहिला या देशी, झेलला यावनी वार! कोणी न सहाय्या आला, आर्यावर्तातुनि वीर धन, दासी, पत्नी, कन्या, वृक लुटून गेले पार! (वृक=लांडगा) सिंधची जाहली होळी,

शाप

लेखक पाटिल यांनी सोमवार, 24/05/2021 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया अन-इन्स्टॉल कर सगळं गच्च भरून गेलंय डोकं अजून किती कोंबशील वाचू नकोस काही अर्थ नसतो त्यात पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट मग स्वतःला कवटाळ व्हायचं ते होईल भेंचो कायकू डरताय ? साधी हुरहूर तर आहे तिला डरण्याचं वय आहे का हे? संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर, भय इथले संपत नाही वगैरे.. मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी.. झेपणार नाही तुला.. पळ.. शेपूट घाल नेहमीसारखा गटांगळ्या खा ओरड..

चहा घेणार?

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी शुक्रवार, 21/05/2021 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज जागतिक चहा दिनानिमित्त हे स्फुरले. गोड मानून घ्या. आवडले/न आवडले तरी कळवा. जुना विषय काढण्यासाठी, विचारले मी चहा घेणार? तोच विषय टाळण्यासाठी, विचारते ती चहा घेणार? नको वाटले छप्पर आणि नको वाटले काही काही, खरे छान वाटले जेव्हा म्हणालास तू, चहा घेणार? फिके पडावे अत्तर ऐसा गंध हे पेय धारण करते, उकळीन ह्याला आले घालूनी, तू थोडा चहा घेणार? कारण नसता भेटीसाठी, कशास उगाचच भेटायाचे , तरी कुठूनसा येईन मी बघ, विचार फक्त चहा घेणार? चर्चांसाठी, वादासाठी किंवा आणखी कशाहीसाठी, निमित्तमात्र एक बुलावा, ऐक ना रे चहा घेणार?

#तू म्हणालास...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 18/05/2021 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही. चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही. ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले. बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले. पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत, पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत. पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री. पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का? भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का? तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही वाटलं तुझा येईल ..
काव्यरस