मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खिडकी

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
क्षितिजावरचा निळसर पर्वत कातळमाथा ढगात घुसळत भूशास्त्राला कोडी घालत खोल ठेऊनी लाव्हा धुमसत पुरातनाचे सूक्त गुणगुणत नभरेषेवर उंच उसळुनी दिसे अनाहूत माझ्या खिडकीत निळे पाखरू पहाटफुटणीत पंखभिजवत्या दवास झटकत चोच मुलायम पिसात फिरवीत पंखांतील अचपळ बळ जोखीत साद घालुनी अधीर, अवचित नभांगणाला उभे छेदुनी उतरे अलगद माझ्या खिडकीत आखीव रेखीव खिडकी चौकट निळ्या नभाचा कापुनी आयत इंद्रजाल निळसर पसरवुनी जड चेतन द्वैताला मिटवीत

वाचने 2627 वाचनखूण प्रतिक्रिया 4

सरीवर सरी गुरुवार, 03/25/2021 - 15:58
इंद्रजाल निळसर पसरवुनी जड चेतन द्वैताला मिटवीत सुरेख.. पहिल कडव जरासं कवितेपासून दूर वाटलं पण..

गणेशा गुरुवार, 03/25/2021 - 16:51
निळे पाखरू पहाटफुटणीत पंखभिजवत्या दवास झटकत चोच मुलायम पिसात फिरवीत पंखांतील अचपळ बळ जोखीत साद घालुनी अधीर, अवचित वा क्या बात... अप्रतिम