मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्रीत्वाचा सन्मान

ज्योति अळवणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
स्त्रीत्वाचा सन्मान नका होऊ नतमस्तक मी कोणी देवता नाही.. नका म्हणू अष्टभुजा; मी काली-भवानी नाही! कधी मखरात... कधी वेश्यागारात... मान मात्र कधीच नाही! मनुष्य जन्म माझा ही; एवढंच स्वीकारणं का शक्य नाही? जग तुझ्या मनासारखं... तुला कोणतंही बंधन नाही! एकदा तिला हे सांगून तर बघा... अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!

वाचने 1837 वाचनखूण प्रतिक्रिया 3