मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते तुझ्याचपाशी होते

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सळसळत्या झाडावरती किलबिलणार्‍या पंखांनी आणले नभातून जे जे ते तुझ्याचपाशी होते अर्थाचे अनवट कशिदे विणणार्‍या चित्रखुणांना जे जटिल असूनही कळले ते तुझ्याचपाशी होते तार्‍यांच्या मिथककथांचा आकाशपाळणा अडता जे पुरातनाला सुचले ते तुझ्याचपाशी होते

वाचने 1881 वाचनखूण प्रतिक्रिया 2

कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीसी काशी हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी पैजारबुवा,