Skip to main content

कथा

लग्न झाले नी अंकल झालो

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

छंद बायकोचा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 05/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक कथा) मैफिल वसंतोत्सव अंकात प्रकाशित ऋचा मायी लिखित कथा वाचत होतो. फावल्या वेळात: बायकोने छंद जोपासला. नवऱ्याला हिरा सापडला. अंगणी वर्षाव झाला नोटांचा. तिचा छंद व्यवसायात बदलला. हीरे-मोत्यांचे दागिने तिने अंगावर घातले. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानी झालें. साठा उत्तराची कहाणी सफल व सुंदर झाली. मनात विचार आला, अरे ऋचा ३६ वर्ष आधीहि कथा लिहिली असती तर माझ्या सौ.ला एखाद छंद जोपासायला म्हंटले असते. तिचा फावला वेळ 'सास-बहू' पाहण्यात व्यर्थ गेला नसता. ऋचा, फार अन्याय केला तू माझ्यावर.

भेट तुझी माझी होता.

लेखक भागो यांनी मंगळवार, 27/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
वैशालीतली भेट! मी टिंबक्टूला कंपनीच्या कामासाठी गेलो होतो. टिंबक्टूच्या सुलतानाला त्याच्या झनानखान्याचा डेटा बेस बनवून पाहिजे होता. वयोमानपरत्वे सुलतानाची स्मरणशक्ति त्याला दगा द्यायला लागली होती. कुठल्या दिवशी कुठल्या बेगमकडे वार आहे हे समजेना. एकूण किती मुलं आहेत? आज कुणाचे डोके उडवायचे आहे? इत्यादि. तर ते काम आमच्या स्वस्त आणि मस्त कंपनीकडे आले होते. मी टिंबक्टूहून परत आल्यावर “तो धबधबा बघितलास का?” हा प्रश्न सगळे विचारणार अशी माझी अपेक्षा होती. पण तीन दिवसाच्या धावपाळीत माणूस काय काय बघणार हो?

“ चिअर्स! "

लेखक मी-दिपाली यांनी सोमवार, 26/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं. “ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं. “ खूप बोअर आहेस रे तू. ” “ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ” “ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली. “ तुझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणी कशी असतात गं ? मागच्या वेळी कुठला तरी विचित्र खेळ शोधून काढला होता. त्यात कमोड सीटवरचं गाणंही आठवलं होतं तुला. काय तर...' कुछ हुआ क्या? ', ' अभी तो नही... कुछ भी नही ' अशक्य आहेस.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग-३

लेखक भागो यांनी शनिवार, 24/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
तो कोण आहे ह्याबद्दल त्याची स्वतःचीच खात्री नव्हती. तो जेव्हा प्रेक्षागृहातू बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोक्यात तेच शब्द घुमत होते. “जागा हो.” आपण कुठल्या शहरात आलो आहोत? समजायला काही मार्ग नव्हता. विचारावे का कुणाला? ऐकणाऱ्याची काय प्रतिक्रिया होईल? त्याला वेडा तर समजणार नाहीत? त्याने डोक्याला ताण देऊन आठवण्याचा आटोकाट प्रयत्न केला? परिणाम मात्र उलटा झाला. मेंदूत जणू घणाचे घाव पडू लागले. ठण्ण्, ठण्ण्, ठण्ण्... मेंदूत आठवणीची गर्दी झाली होती.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग - १.५

लेखक भागो यांनी बुधवार, 21/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पण आत्ता इथे. आकाशगंगेच्या उत्तर दिशेला असलेले केंस वेनाटीकी (Canes Venatici) नक्षत्र समूहात टीओएन ६१८ अतिविशाल कृष्ण विवर. वेळ? ज्याने “काळा”ला गती दिली त्याच्याच उपस्थितीत तुम्ही वेळ विचारत आहात! कृष्ण विवरात कालप्रवाह थबकलेला असतो. पुढे जायचं विसरलेला असेल किंवा वहायची इच्छाशक्ति हरवली असेल. अनंत कोटी ब्रह्मांडनायका समोर काळ नतमस्तक झाला होता. Time saw The Mastar and froze! अशा ह्या एकलतेमध्ये अशरिणी विश्वशक्तींची विचारसभा भरली आहे.

कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -२

लेखक भागो यांनी मंगळवार, 20/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -२ दुपार झाली होती. करमरकर सकाळी शास्त्रींबरोबर झालेल्या मीटिंगमुळे अस्वस्थ होते. शास्त्री काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण अनामिक भयाने पछाडल्यामुळे त्यांना बोलायचे धाडस होत नसावे. ह्या संयंत्राच्या बांधणीत असंख्य अडचणी आल्या होत्या. ही गोष्ट खरी होती, शास्त्रींनी मघा घारीचा उल्लेख केला. एका वर्षापूर्वी घारीने प्रॉजेक्टच्या स्विचआवारावर उंदीर पकडण्यासाठी झडप टाकली होती आणि शॉर्टसर्किट होऊन आरोहित्र जळाले. बीएचइएलने तत्परतेनं नवीन आरोहित्र बनवून दिले म्हणून नाहीतर? नंतरच्या धुवाधार मान्सून मध्ये संयंत्राच्या भोगद्यात पाणी शिरले होते.

माधुरी

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 17/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्मल्यापासूनच सुर्यवंशी होतो. मला जेव्हा शाळेत पाठवण्यात आलं तेव्हा मी ७.०० च्या शाळेला ७.३० वाजता पोहोचायचो. आईला जवळपास दररोजच शिक्षकांचा ओरडा खायला लागायचा. अर्थात दुपारी घरी गेल्यावर त्याबदल्यात माझी यशाशक्ती षोडोपचारे पुजा व्हायची तो भाग वेगळा. पण म्हणून मी उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही. नंतर नंतर आई मला शाळेपासून अर्धा किलोमीटर लांबूनच सोडून द्यायची आणि आता एकटा जा म्हणायची. शेवटी शेवटी वैतागून वडीलांनी माझी शाळा बदलायचा निर्णय घेतला आणि चौथ्या इयत्तेत माझी रवानगी नवीन शाळेत झाली. नवीन शाळेचे नाव'लोकमान्य टिळक' होते आणि ती नावाप्रमाणेच काही बाबतीत सुधारणावादी होती.

एका सासूबाईची करुण कहाणी.

लेखक भागो यांनी गुरुवार, 15/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
लहान माझी भावली मोठी तिची सावली. नकटे नाक उडवीते घारे डोळे फिरवीते. भात केला कच्चा झाला वरण केले पात्तळ झाले. आडाचे पाणी काढायला गेली धुपकन पडली आडात. सासू बाई शेजार्याच्या लहान मुलीला गाणे “शिकवत” होत्या. सून स्वयंपाक गृहात काम करत होती. मनात म्हणाली. “मला शिव्या देताहेत. ऐकतेय मी सगळे. तुम्ही काही म्हणा मी आडात जाऊन जीव देणाऱ्यातली नाही. सज्जड हुंडा देऊन आले आहे. तेव्हा न लाजत मुलाची किंमत खण खण वाजवून घेऊन त्याला विकला न तुम्ही?” साबा आणि साबू दोघेही व्हाट’स अप अंकल आणि आंटी. सारखी किच कीच चाललेली. पदर सांभाळ. केस किती आखूड कापलेस? आता वेणी कशी घालणार?