Skip to main content

कथा

महाशिवरात्री विशेष : पुजा - ले, अरुणा ढेरे (कथावाचन / ऑडियो)

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 18/02/2023 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
महाशिवरात्री निमित्त सादर करत आहे कथा अभिवाचन : पुजा ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या शब्दसौंदर्याने नटलेली, श्री बृहदेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरची आगळी वेगळी प्रेम कथा.

गाठीचे लाकूड

लेखक देवू यांनी गुरुवार, 16/02/2023 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
ए ! " तांब्यात पाणी घेऊन ये जरा, ह्या गाठीने नाकात दम आणलाय माझ्या. ह्या कुऱ्हाडीची धार बोथट करून टाकली तिने ". अहो! निदान आज तरी लाकडं फोडू नका, अजयचा मॅट्रिकचा रिझल्ट आहे. शाळेत गेला आहे तो, येईल थोड्या वेळात मित्रांबरोबर घरी, तेव्हा दारात असा पसारा बरोबर दिसणार नाही. तुझा लेक काय दिवे लावणार आहे माहीत आहे मला. आणि उद्या बंबात काय घालू? तुझ्या लेकाची लाकडं? अहो असं अभद्र तरी बोलू नका आपल्या लेकराबद्दल. अजय लहानपणापासून खोडकर. अभ्यासात फार गती नव्हती. शाळेतून आला की मित्र गोळा करून खेळायला जात असे. त्याचे मित्रही त्याच्यासारखे उनाड आणि खोडकर, रोज काहीतरी उपदव्याप केल्याशिवाय घरी येत नसे.

आठवणी रेंगाळतात.

लेखक भागो यांनी मंगळवार, 14/02/2023 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
“काय झाल? विकला गेलास की नाही?” “नाही रे. वेल्डिंगचा कोर्स केला. सर्टिफाइड वेल्डर झालो. काय उपयोग? काल एकजण बघून गेला. ट्रायल पण घेतली. म्हणाला किंमत जास्त आहे. अजून थोडे पैसे टाकले तर लेटेस्ट मॉडेलचे दोन येतील,” “हो रे, सगळीकडे मंदी आहे. शेअर मार्केट मात्र जोरात आहे. आमच्या इकडे ह्याच वार्ता आहेत.” “मला भीति वाटतीय”. “भीति? ती कशापायी? सकाळ संध्याकाळ दोन टाइमाला चार्जिंग खाऊन मजेत रहायचं.” “मी ऐकलं आहे कि दोन महिन्यात विकलो गेलो नाही तर स्क्रॅप करतील.” “कोण म्हणालं?’ “तोच तो माझ्याबरोबर शो-केसमध्ये उभा असतो तो. तो रे शाहरुखसारखा दिसतो तो. म्हणतो कि फिल्लम मध्ये काम करणार आहे म्हणून.

हरवले ते गवसले.

लेखक भागो यांनी शुक्रवार, 10/02/2023 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी तिला मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. इतकं पाणी कि महापूर. त्या पाणलोटात पूल वाहून गेला होता. किती वर्षं झाली असतील? तिनं कधी पूल ओलांडला नव्हता. पूल ओलांडायची गरज नव्हती. तिची जिवाभावाची मैत्रीण! ती कायम तिच्याबरोबर असायची. शाळेत कॉलेजात. मनसोक्त गप्पा. लोक म्हणायचे, “हिला वेड लागलेय. स्वतःशी बडबडत असते.” गप्पांचा विषय एकच. कविता. क़्वचित कथा. तिनच तिला ती डायरी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. “आता लिही कविता. या डायरीत. अगदी मनसोक्त लिही. तुझ्यामधील लेखकरुपी पक्ष्याला, घेऊ दे साहित्यगगनामध्ये भरारी.

मानव आणि रोबोट

लेखक भागो यांनी गुरुवार, 09/02/2023 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या ‘रोबोट: कथा आणि व्यथा’ ह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत. तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो.

ती व तो 2023

लेखक भागो यांनी मंगळवार, 07/02/2023 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती. त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता. अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त एक श्रीमती की कलावती की सेवा करे जो पति की ज़रुरत है ज़रुरत है ज़रुरत है. सेवा करे जो पति की? म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे. ती!! तिचे “पॅकेज” “उंच, स्लिम आणि सौंदर्यपूर्ण” होते. त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार? ते महत्वाचे नाही.

सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/02/2023 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस. दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय.... ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही. तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ...... तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता. अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला, "ए तू पेठेतला रोहनच ना! ऐकोणसत्तर बॅच...नुमवी.... मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..." अय्या..!!!!

शापित यक्ष!--१

लेखक भागो यांनी गुरुवार, 26/01/2023 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
I am Ubik. Before the universe was I am. I made the suns. I made the worlds. I created the lives and the places they inhabit; I move them here, I put them there. They go as I say, they do as I tell them. I am the word and my name is never spoken, the name which no one knows. I am called Ubik but that is not my name. I am. I shall always be. ------------Ubik-Philip K Dick त्याचे नाव? पहा मला पण नेमकं आठवत नाही. काही तरी “स” ने सुरुवात होणारे होते. समीर? सदानंद? सज्जन? सतीश? सत्येन? नाही. असं बंगाली वाटणारं निश्चित नव्हतं. नावात काय आहे?

नकोसा (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी शनिवार, 21/01/2023 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.

शिकार...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 29/12/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा.