Skip to main content

कथा

एक वाट पहाणे.

लेखक भागो यांनी बुधवार, 13/12/2023 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाट पहाणे. आज हॉस्पिटलचा दिवस. थोडी तयारी केली. एक जुनी फाईल शोधून जवळ घेतली. त्यात कुणा डॉक्टरच्या गिचमिडी हाताने लिहिलेले प्रिस्क्रिप्शन होते. कसलीतरी टेस्ट करायची होती. का? डॉक्टरला काहीतरी संशय आला होता म्हणून. हॉस्पिटल मध्ये पोचल्यावर त्याला कुणा स्वागतिकेला विचारायची गरज नव्हती त्याला सगळे प्रोसिजर माहित होते. लिफ्ट पकडून तो ज्या मजल्यावर जायचे होते तेथे गेला. काऊंटरवर जाऊन पैसे भरले. फी दणदणीत होती. रोग होताच तसा. काऊंटरवालीने सांगितले, “ह्या रूममध्ये जाऊन थांबा.” एकूण चार तास वाट पहावी लागेल म्हणाली. पाण्याची बाटली आणली आहे?” “हो ही काय.” “छान. वाट पहा.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

लेखक निओ यांनी शनिवार, 09/12/2023 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.

लेखक भागो यांनी सोमवार, 13/11/2023 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता. त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही. “आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.” हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते.

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-२

लेखक भागो यांनी रविवार, 12/11/2023 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्या चपट्या बाटलीतले रंगीबेरंगी रसायन प्याल्यावर चिंटूच्या मेंदूत अभूतपूर्व बदल झाले. त्याला कथा लिहिण्याची सुरसुरी स्फुर्ति आली. चिंटूने धाडकन एक विज्ञान कथा लिहून टाकली. विज्ञान कथा लिहून लिहून चिंटू तडकला होता. आतापर्यंत जवळ जवळ वीसेक कथा लिहून झाल्या असतील. कुठल्याही प्रस्थापित प्रतिष्ठित मासिकांत त्याची कथा प्रसिद्ध झाली नव्हती. त्याच्या कथावाचनाशिवाय विश्वाचा गाडा अडला नव्हता कि ठोका चुकला नव्हता. कुणालाही चुकल्या सारखे वाटत नव्हते. चिंटूला ह्या गोष्टीचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.

क्रॉसओव्हर आणि परत माघारी -१

लेखक भागो यांनी रविवार, 12/11/2023 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
क्रॉसओव्हर आणि परत माघारी नोकरीसाठी वणवण पायपीट करणाऱ्या चिंटूसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. नोकरीसाठी दिसेल त्या ठिकाणी अर्ज टाकण्याचा त्याने सपाटा लावला होता. एमएस्सी फिजिक्स करून देखील त्याला म्हणाव्या तश्या नोकरीचे इंटरव्यू कॉल देखील येत नव्हते. नोकरी मिळायची तर गोष्टच निराळी, त्याने कुठे कुठे अर्ज नाही केले? काही दिवस त्याने कुरिअर बॉयची नोकरी केली, काही दिवस मॉलमध्ये सामान हलवून शेल्फवर लावायची हमाली केली. काही दिवस कॉल सेंटर मध्ये नोकरी करत परदेशी लोकांच्या शिव्या खाल्ल्या. ज्या वेगाने त्याने नोकऱ्या धरल्या त्याच वेगाने सोडल्या.

भैय्याची गर्लफ्रेंड

लेखक सरिता बांदेकर यांनी बुधवार, 08/11/2023 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
भैय्याची गर्लफ्रेंड “मॅाम तू या चिंगीसाठी वेगळी रूम तयार कर.मला तिच्या बरोबर रूम नाही शेअर करायची.” विराजस आईला सांगत होता पण चिंगी म्हणजे सिया मात्र भैय्याला वेडावून दाखवत होती. “अरे पण आपल्याकडे कुठे इतक्या रुम आहेत.तुम्हाला रूम शेअर करावीच लागेल.” सानवीने विराजसला समजावण्याचा प्रयत्न केला. “ए ,भैय्या तुला मी अशी सोडणार नाहीय.चांगलीच पिडणार आहे.” विराजसची मागणी मम्मीने न ऐकल्यामुळे आनंदलेली सिया बोलली. “अगं मम्मी,मी याला रूममध्ये का नको असते माहित आहे का तुला?सारखा मला रुमच्या बाहेर काढत असतो.”सिया चुगली करणार तेव्हढ्यात विराजसने तिचं वाक्य मध्येच तोडले. “चिंगे,छोटा

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग दुसरा)

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 25/10/2023 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते.

प्रारब्ध भाग ३

लेखक साहना यांनी मंगळवार, 24/10/2023 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
गोविंदाने हळूहळू खटारा ओढत पूल सुद्धा पार केला. तो जुनाट लाकडी पूल इतका आवाज करत होता कि दोन्ही मुलांना भीती वाटली आणि त्यांनी आपल्या वडिलांना घट्ट पकडले. तो वाटसरू सुद्धा थोडा घाबरून चालत होता. पण एकदाचा पूल पार झाला. दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच पूल पहिला होता त्यामुळे त्यांना थोडी मजा सुद्धा वाटली. पुलाच्या दुसर्या बाजूचा रस्ता विस्तीर्ण होता. त्याला राजमार्ग असे संबोधायचे ह्या रस्त्यावर वर्दळ थोडी जास्त असे. आता उतरंड असल्याने सगळीच मंडळी खटार्यावर बसली होती आणि गोंविदाच्या पायांत थोडी गती आली होती. मार्गक्रमण करता करता दूरवरून थोडी धूळ दिसू लागली. हयग्रीव सावध झाला.

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग पहिला)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 21/10/2023 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: एकाच शिर्षकाचे हे दोन वेगवेगळे धागे - 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी मोनी टीव्ही नावाच्या उपग्रह वाहिनीवरील 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या लोकप्रिय 'गेम शो' च्या निर्मात्यांनी ह्या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या 'विशेष' भागासाठी विशेष अतिथी म्हणून ह्या गेम शो च्या दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात सहभागी झालेल्या धनंजय, शंतनू, सुधीर आणि परशुराम अशा चार स्पर्धकांना सहकुटुंब सह

प्रारब्ध भाग २

लेखक साहना यांनी बुधवार, 18/10/2023 04:58 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचा भाग विंध्य पर्वतातील युद्ध संपले होते. नक्की राजा कोण ह्याची पर्वा आता कुणालाच नव्हती. सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्यात मग्न होता. हयग्रीवाचे घर कड्याकपाऱ्यांत असल्याने त्याला लोक कमीच भेटत. विंध्यकन्या नदीतून कधी कधी छोट्या नावा जात. हयग्रीवाने नदीच्या एका बाजूला लहानसा लाकडी धक्का बांधला होता. छोट्या नावा कधी कधी तिथे थांबत आणि हयग्रीव त्यांना अन्न पुरवी. दोन्ही मुले होईल तशी वडिलांची मदत करत. कुणी कधी जुने कपडे, इतर साधने देत. युद्ध संपले असले तरी असंख्य जनावरं युद्धाच्या झळीने जंगलांत पळाली होती.