Skip to main content

कथा

कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१

लेखक भागो यांनी शुक्रवार, 07/04/2023 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉराशिप भाग -१ ccccccccccccccccccccccccccccccccccccccc ‘भारत लार्ज हॅड्रान कोलायडर” केवळ पुण्याचेच नव्हे तर आशियाचे गर्वस्थान आहे. डॉक्टर राघवेंद्र करमरकर आणि त्यांच्या टीमला आत्मविश्वास आहे/होता की युरोपातल्या CERNच्या एलएचसी प्रेक्षा थोडा मोठा, म्हणजे जवळपास तीस किलोमीटर परीघ असलेला बीएलएचसी, अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल. ““अणु-रेणूंचे आणि विश्वाचे अंतिम रहस्य उलगडेल.””डॉक्टर शास्त्री विषण्णपणे हसले. ते डॉक्टर करमरकरांच्या समोर बसले होते. शास्त्री नुकतेच जीवघेण्या अपघातातून केवळ नशिबानेच वाचले होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

प्याद्याचा डाव

लेखक शेखर काळे यांनी बुधवार, 05/04/2023 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्याद्याला कधी कधी कळत नाही की त्याचे चलन त्याला हलवणाऱ्या हातांकडून होत असते. त्या खेळातले नियम, चाली त्या हातांकडून ठरवले जातात. हा प्यादा राजा व्हायच्या मार्गावर पुढे सरकत होता. कधी सरळ, कधी तिरका. एक शेवटचे घर उरले होते त्याला राजा होण्यासाठी. तेव्हढ्यात, हातांमागच्या डोक्यांमध्ये काही दृष्टिक्षेप झाले, काही खाणाखुणा झाल्या आणि प्याद्याचे त्या पटावरील आयुष्य संपले. त्याने आपला लॅपटॉप बंद केला - तो इथेच ठेऊन जायचे होते, गेल्याच महिन्यात बढती मिळाल्या निमित्तच्या पार्टीसाठी घेतलेला कोट/जॅकेट, खुर्चीच्या पाठीवरून उचलला, झटकून हातावर टाकला.

दोन शशक- नीट

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 29/03/2023 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?" म्हणजे काय? एव्हढी मेहनत करून आपण हे हॉस्पिटल उभारलंय. ते कोण सांभाळणार पुढे? त्यात रशिया युक्रेनचाही पर्याय बंद झालाय. चायनाबद्दल तर बोलायलाच नको. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. म्हणाला "डॉक्टरसाब चिंता मत करो. आप बस जेब ढिली रखो, और कितने मार्क्स चाहिये बोलो.

शेवटचा तास (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी सोमवार, 27/03/2023 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा तास मूळ फ्रेंच कथा : The Last Lesson By Alphonse Daudet (१८७३) , English Translation By Francis J. Reynolds Alphonse Daudet (१८४०-१८९७) हे कवी, कथाकार, कादंबरीकार होते. फ्रँको प्रशियन युद्धात (१८७०-७१ ) त्यांना सक्तीने भाग घ्यावा लागला. त्यांच्या लिखाणात युद्धकाळातले दारुण अनुभव आढळतात. या युद्धात फ्रान्सचा पराभव होऊन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. आल्सेस आणि लॉरेन हे प्रांत जर्मनीच्या ताब्यात गेले. ---------------- झालाच उशीर! आता हॅमेल सर ओरडणार. त्यात आणखी आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत. कसली, तर म्हणे कृदन्त! हे काय असतं? मला तर एक शब्दही ठाऊक नाही त्यातला.

पांडूबाबा.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 23/03/2023 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची. एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?" माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला.

शशक | तीर

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी शनिवार, 11/03/2023 03:21 या दिवशी प्रकाशित केले.
भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या!

शशक | आवंढा

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 09/03/2023 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला.

बंदूक भाग २

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 05/03/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
घरी आलो तर आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला. " कुठं गेला होतास, तुला घर दार हाय कि नाय, उन्हा-तान्हातून दिवसभर उंडगत असतोस, थांब तुझ्या तंगड्याच तोडून ठेवता, जनमभर पोसायला झालं तरी चालल, डोक्याला ताप तरी राहणार नाय." ती बोलत असलेला एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही, अशा अविर्भावात मी हात पाय धुवून जेवायला बसलो. जेवण उरकल्यावर खाटेवर शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. थोड्या वेळानं आईच लक्ष नसल्याचं पाहून सटकलो. संज्याच घर वाटेत असल्यानं, तो घरी आहे का पाहावं? म्हणून त्याच्याकडे गेलो, तर तो जेवायला बसलेला. ओट्यावर कुणीतरी पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेऊन झोपलं होतं.

बंदूक भाग १.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 03/03/2023 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.

स्टीमपंक चॅटरबॉक्स

लेखक भागो यांनी बुधवार, 01/03/2023 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्टीमपंक चॅटरबॉक्स डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!