Skip to main content

कथा

नकोसा (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी शनिवार, 21/01/2023 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.

शिकार...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 29/12/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिराच्या समोर बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही तिघे मी, दया आणि रवी आकाशाकडे तोंड करून असेच पहुडलो होतो. एकदम निरभ्र आकाश, एक सुध्दा काळा ढग नव्हता. निळीतून काढलेल्या सफेद कपड्यासारखं निळसर पांढरं, कुठे कुठे शेवरीच्या झाडाखाली पडलेल्या कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, त्यावर अगणित चांदण्याचा अंधुक प्रकाश, या सौंदर्यात भर घालण्यासाठी नुकताच उगवलेला पूर्ण चंद्र. दृष्ट लागावी असं ते दृश्य. क्षणभर वाटलं कुणाची नजर लागू नये म्हणून तरी, एखादा काळाकुट्ट ढग हवा होता,. लहान भावाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून, आई त्याच्या गालावर काजळाचा टिळा लावायची. गोऱ्या गालावर तो टिळा खूपच सुंदर दिसायचा.

ती आणि तो

लेखक भागो यांनी गुरुवार, 29/12/2022 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
ती नेहमी प्रमाणे येत होती. संध्याकाळचे सहा वाजले. भेळवाल्याने मनातल्या मनात नोंद केली. ती हळूहळू चालत नेहमीच्या बाकड्याकडे जाते. तिच्या चालीत काहीही विशेष नाही. आठ महिन्यापूर्वी जशी आली होती तशी ती दररोज येते. आठ महिन्यापूर्वी उत्साह होता. चालण्यात डौलदार संथपणा होता. उत्सुकता होती. हुरहूर होती. आशा आणि भीति यांचा पाठशिवणीचा खेळ आता त्या भावनाही विरून गेल्या होत्या. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते. अस केव्हातरी अल्लड बोलणे झाले होते. तेच निभावते आहे. वूडस आर लवली डार्क अॅंड ग्रीन बट आय हॅव प्रोमिसेस तो कीप. केवळ म्हणून ती येते. हाच तो बाक.

खेळसारीचा खेळिया

लेखक भागो यांनी रविवार, 25/12/2022 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
खेळसारीचा खेळ खेळसारी तुम्हाला थंड हवेचे ठिकाण म्हणून माहित असणार. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव. त्याला गाव म्हणणे बरोबर नाही. जून महिन्यात पाउस सुरु होतो. त्या पावसाला लोक मान्सून म्हणतात. पेपरात तुम्ही वाचलं असणारच, “खेळसारीला मान्सूनचे आगमन!” खेळसारीला मान्सूनची पहिली चाहूल लागते. तिथे पाउस सुरु झाला कि समजायचं कि अजून ठीक चार दिवसांनी मुंबईला पाउस सुरु होणार. आणिक सात दिवसांनी पुण्याला पावसाची पहिली सर येणार! कमाल आहे ना. ढगांना ही बुद्धी कुणी दिली? त्यांना कसं समजत कुठं केव्हा जायचं, किती पडायचं? खेळसारीला एकदा का पाउस सुरु झाला कि तो मग चार महिने नॉनस्टॉप चालूच राहतो.

आदर्श पत्नी

लेखक सरिता बांदेकर यांनी रविवार, 18/12/2022 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आदर्श पत्नी “मॅम,आज सकाळी दोन मिटींग आहेत.एक ११.३० वा.शेळकेंबरोबर आणि १२ वा.

सिग्नल (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी मंगळवार, 06/12/2022 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल ------------------ मूळ कथा - The Signal By Vsevolod M. Garshin. अवघ्या वीस कथा लिहिणारे रशियन लेखक गार्शिन (१८५५ - १८८८) हे अतिशय हळव्या मनोवृत्तीचे लेखक म्हणून ओळखले जात. १८७७ च्या टर्किश रशियन युद्धकाळात सैन्यात भरती होऊन, ते एका लढाईत जखमी झाले होते. त्या काळात घेतलेला युद्धाचा अनुभव त्यांच्या कथांमधून दिसून येतो. एक वर्स्ट = १.१ किमी एक देसियातीन = जवळपास एक हेक्टर सॅम्हावार 0 ------------------ सेमयॉन इव्हानोव्ह रेल्वेचा रूळ राखणदार होता.

Thought Experiment No 2

लेखक भागो यांनी गुरुवार, 01/12/2022 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ. साहेब आणि बाईसाहेब नाष्टा करत होते. रोबोटिक वॅक्युम क्लीनर बेडरूम झाडत होता. रात्रीची उष्टी भांडी डिशवॉशर ने रात्रीच स्वच्छ करून ठेवली होती. टोस्टरने ब्रेड भाजून ठेवले होते. कॉफी मेकरने कॉफी तयार केली होती. बाईसाहेबांनी नाश्ता मांडला होता. पण मला वाटतं दोघांचेही खाण्यात लक्ष नव्हते. एक अनामिक ताण होता दोघांच्या मनावर. शेवटी साहेबांनी शांततेचा भंग करत तो पर्यंत म्हटलं, “अनु, आता तू काय करणार?” “काय करू? तूच सांग. आज पहिलाच दिवस होता. आणि हे अस.” “तू एचआरला फोन करून रिक्वेस्ट करून बघ. अजून चार पाच दिवसांची सवड मिळाली तर. तसे चांगले आहेत ते लोक. मी करू का फोन?

Thought Experiment No 1

लेखक भागो यांनी बुधवार, 30/11/2022 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
खयालोमे तो सगळा आठवडा आमच्या कुटुंबाला चांगला गेला होता. माझे आणि बायकोचं एकदाही भांडण झाले नव्हते. ती सात दिवस दररोज भेंडीची भाजी करत होती. भेंडी म्हटलं कि माझ्या अंगावर हे भेंडी एवढे काटे येतात पण ह्या आठवड्यात नाही. ताकातली भेंडी, भेंडी आणि ताक, भेंडीतले ताक, ताक भेंडी रस्सा, भेंडी दो ताक, भेडीया भेंडी, क्रश्ड लेडीज फिंगर ऑ बटरमिल्क असे भेंडीचे विविध प्रकार खाऊन अंतरात्मा तृप्त झाला होता. मी चवीने खातोय बघून बायकोही नवीन नवीन प्रकार शोधून काढत होती. छोट्या चंकी मंकीचा समजूतदारपणा तर वाखाणण्यासारखा होता. सात दिवसात एकदाही त्याने भोकाड पसरलेले नाही.

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६ (शेवटचा)

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 29/11/2022 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
image host इव्हॅन तुर्गेनेव्ह (९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३) Turgenev: The Novelist's Novelist एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ६ मार्च ३०. बर्फ. .... हंऽऽ मी काय सांगत होतो, मी त्याच्या अभ्यासिकेत प्रवेश केला. स्वतःचे कपडे सावरत तो धडपडत उठला आणि घाईघाईने त्याने पुढे येऊन हात पुढे केला. अरे देवा! त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर कुठले भाव होते हे माझे मलाच पाहता आले असते तर किती मजा आली असती.

“एक” “शून्य” रोबो!

लेखक भागो यांनी शनिवार, 19/11/2022 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
“एक” “शून्य” रोबो! उपोद्घात Another Universe. Another Time. फार फार वर्षांपूर्वी- किती वर्षांपूर्वी?- कुणालाच माहित नाही की किती वर्षांपूर्वी- काहीही नव्हते. अवकाश नव्हते आणि काल नव्हता. ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य. आदि नव्हता अंत नव्हता.. सुख नव्हते दुःख नव्हते. देव नव्हते, दानव नव्हते, धर्म नव्हता, अधर्म नव्हता. नीति अनीति नव्हती त्यामुळे त्याची चाड नव्हती. दिवस नव्हता, प्रकाश नव्हता त्यामुळे रात्र नव्हती आणि अंधार नव्हता. जन्म मृत्यूचे फेरे नव्हते. त्यामुळे यम नव्हता आणि नियम पण नव्हते.