फसवले काळासही मधुमास होते भोगले
जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले
राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला
जानकीने का इथे वनवास होते भोगले ?
दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना
सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले
पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी
प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले
रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली
यार, फसलेले किती अदमास होते भोगले
वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?
स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले
वृत्त : कालगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा
काफिया : मधुमास, मरणास, वनवास, परिहास, सहवास, उपहास, अदमास
रदीफ़ : होते भोगले
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1747
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान विशाल दा......
छान
विशाल दा......
सुंदर !
आवडली !
मतला जमला
वाह विशाल राव मतला मस्त जमलाय
एकुणात खास गझल
माहिती
In reply to मतला जमला by महासंग्राम
आणि खाली रदीफ आणि काफिया ची माहिती दिल्याने टेक्निकली पण समजण्यास सोपी
कविता आवडली रोज खोटी हूल,
कविता आवडली रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली...मस्त
मनःपूर्वक आभार :)
मनःपूर्वक आभार :)