Skip to main content

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

वाचने 1992
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे
छानंय. मध्यमवर्गीय हतबलता व अपेक्षांचे चित्रण चांगलेय. शेवटची ओळ खोचक आहे. पण मला ते पटले नाही.असो तो खूप वेगळा विषय!

छान

जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे ..............हे खासच आवडले.