प्रिय मायमराठी
- Read more about प्रिय मायमराठी
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.
कट्टासेरी जोसेफ येशुदास अर्थात पद्मविभुषण डॉ. K. J. येशुदास यांचा आज ७८ वा वाढदिवस!