कट्टासेरी जोसेफ येशुदास अर्थात पद्मविभुषण डॉ. K. J. येशुदास यांचा आज ७८ वा वाढदिवस!
पूर्वीच्या कोचीन प्रांतात म्हणजेच सध्याच्या केरळमधे १० जानेवारी १९४० रोजी एका ख्रिश्चन कुटूंबात येशुदास यांचा जन्म झाला.आपलं संगीतविषयक शिक्षण तिरुअनंतपुरमच्या स्वाती तिरुनाल संगीत महाविद्यालयातून पूर्ण करुन ६० च्या दशकात त्यांनी सिनेक्षेत्रासाठी गायला सुरुवात केली.
मल्याळम सोबतच त्यांनी तमिळ,कन्नड,तेलुगू,मराठी,बंगाली,हिंदी,अरबी,रशियन अशा विविध भाषांमधून जवळपास ७०००० गाणी गायली आहेत.त्यांनी काही सिनेमांत पडद्यावर पाहुणा कलाकार म्हणूनही काम केलंय.
येशुदास यांचा आवाज दैवी आहे हे केवळ त्यांच्या गोड,मुग्धमधूर आवाजासाठी म्हटलेलं नाही तर त्यांनी गायलेली भक्तीगीतं बर्याच लोकांसाठी खरोखरंच दैवी अनुभूती आणि मन:शांती देणारी ठरली आहेत.श्रीकृष्ण आणि अय्यप्पा या केरळच्या आवडत्या हिंदू दैवतांची अनेक प्रसिध्द भक्तीगीतं ही येशुदास यांनी गायली आहेत.
शबरीमलैच्या अय्यप्पा मंदिराचे दरवाजे सायंकाळी बंद करण्यापूर्वी 'हरीवरसनम्' हे येशुदास यांच्या आवाजातील भजन दररोज ऐकवण्याचा नित्यक्रम बरीच वर्षे सुरु आहे.इतर अनेक गायकांनी हे भजन गायलेलं असूनही येशुदास यांचंच गाणं अधिकृतरित्या मंदिराकडून वाजवलं जातं.येशुदास यांची कर्नाटकातील कोल्लूर येथील मुकांबिका देवीवर खुप श्रध्दा आहे.इ.स. २००० पासून ते दरवर्षी त्यांचा वाढदिवस या मंदिरात गाणं गाऊनच साजरा करतात.केरळमधील बर्याचशा मंदिरांमधे केवळ हिंदूंनाच प्रवेश आहे.त्या पार्श्वभूमीवर येशुदास यांच्या दैवी आवाजानं केलेलं गारुड सगळे नियम शिथिल करुन अनेक वर्षं भक्तांना आनंद देत आलेलं आहे.
देशात केरळ आणि विदेशात भारतीय सांगीतिक सांस्कृतीचं प्रतिक म्हणूनही त्यांना अोळखलं जातं.
१४ नोव्हेंबर १९६१ रोजी त्यांनी आपलं पहिलं गाणं मल्याळम भाषेत "जाती भेदम् मत द्वेषम्" रेकॉर्ड केलं."अटेन्शन पेन्ने अटेन्शन" हे त्यांचं पहिलं गाजलेलं गाणं.मल्याळम नंतर त्यांनी सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत गायली आहेत.
येशुदास यांची काही गाजलेली हिंदी गाणी
१. जानेमन जानेमन तेरे दो नयन
२. गोरी तेरा गाँव बडा प्यारा
३. आज से पहले आज से ज्यादा
४. जानम जानम
५. कहाँ से आये बदरा
६. जिद ना करो अब तो रुको
७. हो गोरीया रे
८. माना हो तुम बेहद हँसी
९. दिल के टुकडे टुकडे करके
१०. तू जो मेरे सूर में
११. जब दीप जले आना
१२. चाँद जैसे मुखडे पे बिंदिया सितारा
१३. सुरमयी अखियों में
१४. का करु सजनी
१५. मधुबन खुशबु देता है
१६. सुनयना इन नजारों को तुम देखो
१७. मोहब्बत बडे काम की चीज है
१८. धीरे धीरे सुबह हुई
१९. तुझे देखकर
२०. खुशियाँ ही खुशियाँ हो
२१. अो भवरे
(येशुदास यांनी गायलेल्या काही तमिळ,मल्याळम,कन्नड,तेलुगू गाण्यांच्या लिंक्स नंतर प्रतिसादातून पेस्टवतो.)
आमचे एक केरळी स्नेही म्हणतात,मनावरचा ताण हलका करायचा असेल तर एक उत्तम उपाय;हेडफोन लावून येशुदास यांची गाणी ऐकणं!
दैवी कृपा असलेल्या या दैवी आवाजाच्या गायकाला दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईशचरणी प्रार्थना.बाकी त्यांची गाणी चिरंतन आहेतच!
वाचने
13641
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
येशुदास यांनी गायलेली मराठी गाणी
मस्त लेख आवडला... १+
In reply to येशुदास यांनी गायलेली मराठी गाणी by उपयोजक
मराठी गाण्यांसंदर्भात येसूदास
In reply to येशुदास यांनी गायलेली मराठी गाणी by उपयोजक
छान ओळख
ही अन्य भाषांमधील गाणी
आलाप
दैवम तंद वीडू ची लिंक ही वापरावी
समयोचित सुरेख लेख ! या महान
त्यांनी गायलेली हिंदी गाणी माझी आवडती !
In reply to समयोचित सुरेख लेख ! या महान by चौथा कोनाडा
वा! येसुदास यांना दीर्घायुष्य
छान ओळख
लेख आवडला.. न ऐकलेली गाणी आज
इतर भाषेतली गाणी जास्त ऐकली
अतीमहाप्रचंड सहमत....!!
In reply to इतर भाषेतली गाणी जास्त ऐकली by अंतु बर्वा
येशुदासांना अभिवादन
वाचनखुण साठवली आहे. धन्यवाद.
वर दिलेली मराठीमधील येसूदास यांची गाणी ऐकली...
छान लेख !
अहाहा....!! लाजवाब
In reply to छान लेख ! by सस्नेह
वाथापि गणपतिम
अप्रतिम लेख!
मस्त लेख
प्रचंड मोठी फॅन आहे
नि सा गा मा पा
एक आठवण...