अशी व्हती आमची होळी.....
व्हलीचे पाच दिवस आगोदार व्हलीला सुरवत व्हायची.....
गावान जर एकी आसंल त तरणी पोरा एक व्हवून बैलगारी घेऊन रानात लाकरा आनाय जायाची. महामूर लाकरा आसायची म्हून व्हलीचे दिवसापरेत बारकी व्हली पेटायची. व्हलीचे दिवस सांचे ज्याची त्यानी लाकरा बिदीव आनून टाकायची. खरा म्हजे कुर्हाडीन फुटत नसतील आसं लाकराचं वंडं लोखा लय करून व्हलीला दियाची. म एक-दोन बैलगार्या जुपून व्हलीचे खासरान लाकरा पोचती व्हयाची. व्हलीचे दिवस राच्चे 8-9 वात्ता बाया नटून-थटून व्हलीव आरती घेऊन जमा व्हयाच्या. दरम्यान देवलान भजन सुरू असायचा. नंतर भजने भजन करीत-करीत व्हलीव जानार. व्हली पेटवायचा मान मातर गावचे पोलीस पाटलाचाच असायचा.
मिसळपाव