आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका.
डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.