योग – प्रतिबंधात्मक उपाय
योग – प्रतिबंधात्मक उपाय
शाळेत असताना विज्ञानात शिकलो होतो कि उत्क्रांतीतून मर्कटाचा मानव झाला.मनुष्य प्राणी हा जरी जात्याच बुद्धिमान असला तरी त्यास पडलेले एक कोडे उलगडत नव्हते, ते म्हणजे या जीवनाचे ध्येय काय ? महामुनी पतंजलींनी हे कोडे उलगडले - नश्वर जीवनास योगरूपी संजीवनी देऊन ! योग हा शब्द संस्कृत धातू 'युज' पासून बनलेला आहे.युज म्हणजे संयोग पावणे वा एकत्र जुळून येणे. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग म्हणजेच योग होय !
योगमध्ये प्रामुख्याने चार प्रवाह मानले जातात – कर्म योग, भक्ती योग, ज्ञान योग आणि राजयोग .राजयोग हा महामुनी पतंजली प्रणीत अष्टांग योगाचाच एक भाग आहे.
मिसळपाव