मी कोणी एवढा मोठा नाही की कोणी तरी येईल व माझी मुलाखात घेईल. पण मला माझी काही व्यसने सोडायचीच आहेत. पण मला माझा अनूभव पण शेअर करायचा आहे. अजून सवय सुटली नाही आहे. पण प्रयत्न करतो आहे. सध्या मी योग आणी सेल्फ अवर्नेसवर जास्त लक्श देऊन आहे. ज्या मध्ये मी खूप गोष्टीचा वापर करत आहे. या दिवाळीमध्ये मी अल्कोहोल पासुन लांब राह्ण्याचे ठरवले आहे. गेली चार दिवस मी एकटाच घरी आहे, पण मी ड्रिन्क रोज करत आहे. मला समजत नही आहे की मी ड्रिन्क का करत आहे. मी तर सोडण्याचा प्रयत्न करत आहे. आधी मी सकाळी, दुपारी आणी रात्री पण घेत असे.