शिक्रेट (शतशब्दकथा)
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला!
लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते.
''काकू जरा मुरवण देता का?''
''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू.
मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू.
काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत.
पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी.
नायतर मग चवकशा सुरूच-
''सुमी रोज कशाला येती?''
''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?''
उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच!
मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.
पन तायडीला तशी समज नाय..
काकूंचं आन माजं शिक्रेटच हाय!
वर्गीकरण
मुरवान म्हणजे काय?
मुरवान= विरजण?
In reply to मुरवान= विरजण? by यशोधरा
बरोबर.
In reply to बरोबर. by खेडूत
मला वाटलं...
In reply to मला वाटलं... by अर्धवटराव
हो. मलाही असंच वाटलं.
+१)
:(
आवडली
शिक्रेट टोचलं.