मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संदर्भ

झक मारते राव तुमची स्कॉच !

विशाल कुलकर्णी ·
लेखनप्रकार
गेल्या वर्षभरात अलिबागच्या ४-५ तरी चकरा नक्की झाल्या असतील. एकदा आई-आण्णा आले होते तेव्हा त्यांना मुरुड जंजीरा बघायचा होता म्हणून, तर एकदा सासु-सासर्‍यांना बघायचा होता म्हणुन. तर एक - दोन वेळा आम्ही दोघे नवरा बायकोच बाईकवरुन फिरून आलेलो. येता जाता अलिबागच्या साधारण १०-१५ किमी अलिकडे 'पळी' गावापाशी एक पाटी बघीतली होती.. "डि. सॅमसन कोल्ड्रिंक्स....!" कोल्ड्रिंक हाऊसच्या पाट्या तशा सगळीकडेच दिसतात, त्यामुळे दुर्लक्षच केले होते. नंतर कुणाकडून तरी ऐकले की ते केवळ कोल्ड्रिंक हाऊस नाही तर कोल्ड्रिंकची विशेषतः सोडा तयार करण्याची फॅक्टरी आहे.

आपण मुर्खात मोडतो का शहाण्यात ?

जयंत कुलकर्णी ·
दुर्दैवाने मला हा लेख परत एकदा प्रकाशीत करावा लागत आहे. म्ह्नजे तो आत्त मिपा वर आहे असे नाही कारण मी तो काढला होता पण तो एवढ्या लवकर परत टाकावा लागेल असे वाटले नव्हते. त्याच बरोबर दुसरा पण टाकत आहे. " "जो आपल्या चमत्कारांचे विश्लेषण करु देत नाही तो पक्का बदमाश असतो. जो चमत्कारांचे विश्लेषण करायला घाबरतो, तो फसवणुकीला बळी पडतो.

ट्विट्टर वरील साहित्य

साधा_सरळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे! मिपा हे एक मराठी होटेल आहे, हे माहिती असूनही नवीन तन्त्रज्ञानाचा कल्पक उपयोग इतरान्बरोबर शेअर करावा ह्या हेतूने ट्विट्टर च्या एका बाजूची महिती देत आहे.) शीर्षक वाचून दचकलात? पण ट्विट्टर वर एका ट्वीटवरील १४० अक्षरान्चे बन्धन असूनही त्याचा मजेशीर उपयोग करणार्यान्ची सन्ख्या काही कमी नाही.

शिवराज्याभिषेक

जिप्सी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिवराज्याभिषेकाचे वर्णन आपण अनेकदा वाचले असेल पण एखाद्या प्रत्यक्षदर्शीकडून यावर लेखन फार क्वचितच झाले असेल. खास महाराजांच्या राज्याभिषेकासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या एका डच वकीलाने लिहिलेले हे वर्णन.हा वकील वेंगुर्ल्यातल्या डच वखारीतला असावा,त्याने हे पत्र बटेव्हियातल्या (?) आपल्या वरिष्ठास लिहिलेले आहे. त्याचा हा गोषवारा. संदर्भ :- डच रेकॉर्डस्,शिवकालीन पत्रसारसंग्रह खं.२ पुष्कळ दिवस तयारी होऊन जुनच्या सुरुवातीला राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. ब्राह्मण्,विद्वान व इतर मिळून सुमारे ११ हजार लोक रायगडावर जमा झाले.

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com

dr sanjay honkalse ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.

आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

पैसा ·
मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला. कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा.