Skip to main content

महिन्याचे वाढदिवस

लेखक आर्य यांनी गुरुवार, 03/06/2010 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे. दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात. उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर) असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

मधूमेहाविरुद्ध लढा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 25/05/2010 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मधूमेहाविरुद्ध लढा अदिती ताईंच्या या प्रश्नामुळे मला लिहावेसे वाटले. मी मराठीचा उदोउदो करण्यासाठी भांडत असतांना एके ठिकाणी त्यांनी मला 'तुमच्या सहीत इंग्रजी आहे' ते बदला अन आताच्या प्रश्नात 'तुमच्या सहीतला 'ओ' आणि ते इंग्लिश वाक्य अजून तसंच आहे. आणि हो मधुमेहाशी कसं लढायचं?' असं विचारलं. त्यांचा चेष्टेचा अन मस्करीचा सूर मी समजलो अन त्यांना खालील उत्तरे तेथेच देवून आमची चेष्टा तेथेच थांबवता आली असती. पण प्रश्न हा सामाजिक जागृतीचा असल्याने नविन धागा काढून लिहीत आहे.

प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/05/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य
प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">
महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

सेवाजी द रेबल

लेखक सुमीत भातखंडे यांनी गुरुवार, 08/04/2010 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
मधे कुठल्याशा ऑनलाईन पेपरमधे - "संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ "लंडन गॅझेट" या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला" ही बातमी वाचली होती. तेव्हापासून ""लंडन गॅझेट" च्या साईटवर याची ऑनलाईन आव्रुत्ती मिळत्ये का ते बघायचं ठरवलं होतं पण कामाच्या व्यापात विसरून गेलो.

भगवंत दयाळू आहे.. न्यु प्रिंट संचित

लेखक shaileh vasudeo pathak यांनी मंगळवार, 06/04/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंत दयाळू आहे... लहानपणी चांदोबा नावाचे एक मासिक(कदाचित पाक्षिक असेल...) यायचे त्यात एक कथा होती,कोणी एक लहान मुलगा सतत असे म्हणतो, भगवंत दयाळू आहे.एकदा तो आपल्या आई-वडीलां सोबत फ़िरायला गेला असतो.. अचानक बाहेरील काही दृष्य पाहुन तो गाडी थांबावतो आणि पळत सुटतो.. येथे पुढे गेलो तर एक मंदिर आहे.. मंदिरात मी राहत होतो..देवाची पुजा व साधना करत होतो अचानक मृत्यु आला..वै...मग तेथील लोक त्याला तेथेच राहायला सांगतात.तो आपली साधना पुन्हा सुरु करतो....भगवंत दयाळू आहे इ..कथा पुर्वजन्म या गोष्टीशी निगडीत होती. आता उरलो उपकारा पुरता..

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः