मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नोत्तरे

नारायण सान्याल आणि काही प्रश्न...

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनविषय:
ज्या माणसाला मदत केली म्हणून डॉ. बिनायक सेन यांना अटक झाली होती त्याला, नारायण सान्याल, यांना आता सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला आहे. त्या संबंधीची माहिती आजच्या वृत्तपत्रातून आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा दुवा इथे देत आहे. http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-grants-bail-to-Naxal-leader-Narayan-Sanyal/articleshow/13044364.cms बातमी नीट वाचली. मात्र हे वाचल्यावर काही प्रश्न मनात आले. मूळातच एका नक्षलवाद्याला सुप्रिम कोर्टाने, शिक्षा भोगत असताना, जामिन दिला आहे ही एक महत्वाची आणि लक्षणिय बाब आहे.

टीआरपी साठी ’टेन कमांडमेंट्स’

रमताराम ·
आमची प्रेरणा: परागुरु यांचा हा धागा परागुरुंनी आयडी कसा काढावा नि त्याचा वापर कसावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केलेले आहेच. ही पहिली यत्ता पार झालात की पुढच्या टप्प्यात आपले संस्थळ कसे चालवावे याबाबत अडवान्सड कोर्स घ्यावा अशी मनीषा आहे. (मनीषा आहे म्हणजे आमच्या माईंडमधे आहे. कोण ही मनीषा अशी खरड/व्य. नि. करू नये) नाही म्हणूच नका, प्रत्येक आयडीच्या मनात जसा एखादा डु. आयडी काढण्याची मनीषा (खुलासा वर पहावा) असते तसेच आपलेही एक संस्थळ असावे अशी खुमखुमी असतेच.

गप्पा युजींशी

यकु ·
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

पुन्हा सालं 'वैचारिक'

यकु ·
हे सगळं कशासाठी सुरु आहे ? लोक का जन्माला येतात? लग्न का करतात? दु:खी का असतात ? या प्रश्नांची उत्तरं कुणीही समाधानकारकपणे देऊ शकत नाही. उत्तरं लाख मिळतात पण ती लागू पडत नाहीत. याचं कारण हे प्रश्न पडले असले तरी कुणीही उत्तरं मिळेपर्यंत त्यांना तडीस नेलेलं नाहीय. ज्यांनी नेलं ते गेले.. उलटून गेले.. त्यांचंही नेमकं काय झालं हे फक्त वर्णनं वाचून कळतं. वास्तविक आजूबाजूला जन्म, मृत्यू, लग्ने, संसार गतीमान असणे या सगळ्या प्रोसेसला बळ आहे फक्त विचाराच आणि समोर अफाट पसरलेल्या अंध:कारमय भविष्‍याचं, भावनांचं, आकांक्षांचं - शब्द कोणतेही आणि कितीही वापरा, परिणाम एकच होतो.

मावळतीचा सूर्य

रेशा ·
लेखनविषय:
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

सचिनचा मार्ग 'मोकळा'

आशु जोग ·
लेखनविषय:
आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार' 'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा' वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे. नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का ! सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

VINODBANKHELE ·
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

नरेंद्र मोदी यांचे उपोषण

आशु जोग ·
लेखनप्रकार
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले. काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती. १९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप. बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली. ४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले. ते दिल्लीमधे उपोषणाला बसले. एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला. आंदोलन प्रचंड यशस्वी.

पेट्रोल ची पुन्हा दरवाढ.

चन्द्रशेखर सातव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पेट्रोल ची पुन्हा सुमारे ३ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ७१ रुपये प्रती लिटर आता पेट्रोल ची किमत असणार आहे,काही महिन्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर्स प्रती पिंप होती तेव्हा सरकार ने दरवाढ केली होती,परंतु सुमारे दोन महिन्या पूर्वी एशियन बाजात तेलाच्या किमती ८५ डॉलर्स प्रती पिंप पर्यंत खाली उतरल्या होत्या तेव्हा किमती कमी करण्याचा विचार केला नाही.आता मात्र रुपयाचे मूल्य डॉलर च्या तुलनेने कमी झाल्यावर लगेच दरवाढ का केली जात आहे ? चारही सरकारी तेल कंपन्या प्रचंड फायद्यात आहेत,मग कंपन्यांचे होणारे नुकसान त्या नफ्यातून का भरून काढले जात नाही ?