Skip to main content

प्रश्नोत्तरे

'कायदा' विषयक सेवा आणि सजगता दिवसा निमीत्त प्रश्नोत्तरे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/11/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
९ नव्हेंबर भारतात 'कायदा' विषयक सेवा आणि सजगता दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमीत्त प्रश्नोत्तरांसाठी म्हणून धागा काढत आहे. (प्रश्नांची भलतीच सरमिसळ आहे त्या बद्दल सुरवातीसच माफी मागून) चर्चेस सुरवात म्हणून मी काही प्रश्न टाकतो आहे पण या धाग्यात तुम्ही सुद्धा इतर प्रश्न (उत्तर माहित असलेले अथवा नसलेले) विचारू शकता. १) मागील वर्षाभरात मराठी संस्थळांवर कायदे विषयक लेखन आणि चर्चांचे दुवे आणि त्यातील कोणते लेखन अथवा चर्चा तुम्हाला उल्लेखनीय वाटली आणि का ? २) मराठी संस्थळांवर मराठी कायदे तज्ञांचा सहभाग पुरेसा आहे पुरेसा नसेल तर सहभाग वाढवण्यासाठी काही मार्ग/उपाय शोधता येतील का ? ३)

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 16/07/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.