Skip to main content

प्रश्नोत्तरे

खूप थंडी आहे यंदा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/11/2025 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/03/2025 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

लेखक मिसळपाव यांनी शनिवार, 16/03/2024 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये) ---------------------------------------------------------------------- नमस्कार! आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते.

पुणे ते कन्याकुमारी सोलो ट्रीप

लेखक Nishantbhau यांनी रविवार, 29/10/2023 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुणे ते कन्याकुमारी car ने सोलो ट्रीप करायची आहे. आपल्या पैकी कोणी अशी ट्रीप केली आहे का? सोलो ट्रीप करताना काय काळजी घ्यावी? कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

लक्षद्वीप किवा अंदमान

लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 09/09/2023 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कुटुंबा बरोबर हिवाळी सहली वर जायचा विचार सुरु आहे. लक्षद्वीप/अंदमान इथं खुप सुंदर समुद्रकिनारा आहे, असे समजले. तर या २ ठिकाना बद्दल थोडं मार्गदर्शन हव आहे. सोबत 6 महिन्याच बाळ आसनार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाणं योग्य आहे का ? तसेच गरज पडली तर लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध असतील का? एकंदरीत सहलीचं नियोजन करण्यासाठी थोडं मार्गदर्शन हवं आहे

मदत हवी आहे - कोरिया भ्रमण

लेखक विअर्ड विक्स यांनी मंगळवार, 17/01/2023 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण कोरियाला ( जोंगि ) ३०-४५ दिवस ट्रेनिंग साठी जावयाचे आहे . तर पुढील संदर्भात माहिती हवी होती १. शाकाहारी जेवण उपलब्धता - भारतातून डाळ व तत्सम पदार्थ कोरियात विमानातून नेऊ शकतो का ? २. हवामान - जबर थंडी चा मोसम आहे तर हीटर व तत्सम कपडे रास्त दारात उपलब्ध होतील का भारतातून आणणे श्रेयस्कर ? ३. भाषा काठिण्य - इंग्रजी सहज बोलली जाते व कोणते विशिष्ट app डाउनलोड करावे लागेल भाषा सुलभतेसाठी ? ४. सिम कार्ड - गरज आहे का भारतीय ४G फोन चालतील वायफायवर ? ५.

ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करण्यात मदत हवी आहे.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 12/12/2022 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे मला कळत नाहीये की कोणता पर्याय निवडायचा. मी वर्ष २०२१-२२ साठी ईन्कम टॅक्स रीटर्न फाईल करुन पहात आहे. ITR मी फ्रीलान्सर म्हणुन आयटीआर बनवत आहे, कृपया माहीतीगारांनी मदत, मार्गदर्शन करावे. जे जास्त उत्सुक असतील त्यांनी मला पुर्ण आयटीआर तयार करुन दीली तर मला काहीही हरकत नाही. खरोखर! (ह्युश चला वाचले हजार दीड हजार!)

दोन प्रश्न आहेत, कृपया सहाय्य करावे.

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 06/12/2022 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दीवसांनी इथे लिहत आहे. सर्वांना नमस्कार. दोन प्रश्न होते, ते खालीलप्रमणे: १) चुकीचे लोन एक्सेपेरीयन रीपोर्टवर येणेबाबत : मला मध्ये, गेल्या महिन्यात एक लोन हवे आहे का म्हणुन फोन आला. आयडीएफसी फर्श्ट बँकमधुन. मी माझी माहीती सांगितली, बोलणारा व्यक्ती अनुभवी वाटला. व मी जस्टडायलमध्ये केलेल्या चौकशीचा हा रिस्पोन्स असावा असे वाटले.मी मा़झी माहीती दीली. पॅन कार्ड, आधार कार्ड विचारल्याचे आठवत नाही. ते मला बोलले की आमचा ऑफीसर तुम्हाला भेटायला येईल. नंतर पुन्हा कॉल आला की तुमच्या ईथे आमची शाखा नाही आहे.