मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक--दरोडा

राजेंद्र मेहेंदळे ·

ना खून ना खराबा घातला कोटींचा दरोडा सुटा बुटातला चोर पोलिसांच्या जीवाला घोर पायथन कोड फळला बॅक बॅलन्स झाला खाली बच्चे लोग बजाव ताली &#128512

सौंदाळा 10/02/2023 - 12:51
मस्तच यातील काही रक्कम (कदाचित इंडोनेशिया मधून) रिकव्हर केली होती असे पण वाचले होते.

रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत? अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर.... दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.

शंभर अदाणी हवे आहेत…

सुधीर मुतालीक ·

आणखी १०० अडाणी तुम्हां हवेत कशाला ? (म्हणजे आतचे १ + आणखी १०० = टोटल १०१) काय करणार तुम्ही १०१ अडाण्यांच ? तुम्हाला असं म्हणायचं का की जर १ अडाणी म्हणून १ पोर्ट, १ विमानतळ, १ हायवे, १ कोळसा खाण.... तर १०० अडाणी म्हणून १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी ?? असं जर असेल तर, त्या १०० पोर्ट, १०० विमानतळ, १०० हायवे , १०० खाणी साठी "भागभांडवल" येणार कोठून ? उभारणार कसे ?

In reply to by आग्या१९९०

अनंतफंदी 07/02/2023 - 13:50
फारच उत्तम माहिती मिळाली. अदानींची फसवेगिरी आहेच. पण भारतात अजुन असे सगळे उद्योग करणारे ईतर समूह नसतील कशावरुन? हे सगळे प्रकरण ईतके गुंतागुंतीचे आहे, की जिथे सरकारी ऑडिटर्सनाही समजायला वेळ लागेल तिथे सामान्यांची काय कथा? एक मात्र खरे!!अदानी समूहाने हिंडेनबर्गवर बदनामीचा खटला किवा ईतर कायदेशीर कारवाई लवकर करावी लागेल तरच त्यांची प्रतिमा टिकेल, अन्यथा हिंडेन बर्गच्या आरोपांनाच दुजोरा मिळाल्यासारखे होईल. अजुन एक--- सुधीर भाऊंचा लेख वाचुन ह्या प्रकरणाला अशीही एक बाजु असेल असे नक्कीच वाटुन गेले.

कंजूस 07/02/2023 - 14:41
तर यांचा तारणहार कोण यांच्याशी काहीही संबंध नाही. वालचंद हिराचंद यांनी ब्रिटिश बोट कंपन्यांना कशी फाईट दिली तेसुद्धा ब्रिटिश राज्य असताना हे कुणी वाचलं आहे का? तेव्हा कुठे तारणहार होते?

सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत.
हे कुठल्या सरकारी कंपन्याबद्दल बोलत आहात कळेल का? माझाही संबंध सरकारी व्यवस्थेशी येतच असतो थोडक्यात सांगायचे तर जिल्हा परिषद, सावजनिक बांधकाम खाते, एमआयडीसी वगैरे वगैरे. त्यामुळे 'भयानक गुंतागुंतीच्या'शी सहमत आहे पण स्वच्छ!
घरी बसल्या बसल्या लिंबाचे लोणचे खोचलेला बशीभर गोड शिरा खात खात हे मोदी आणि अदाणी देशाला लुटताहेत अशी बडबड करणाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाहीवर शक्य असेल तर विश्वास ठेवावा.
अनुभवाचे बोल आहेत, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास केव्हाच उडून गेला आहे. लोकशाहीवरही फार काळ टिकेल असं वाटत नाही. बाकी, अशी दिशाभूल करणारे लेख दोन्ही बाजूने चालू असतात त्यामुळे चालू द्या! सं - दी - प

मित्रहो 07/02/2023 - 16:36
खूप रोखठोक आहे. इतका की उपहास आहे का असे वाटावे.
दाढीचे खुंट वाढवून खांद्याला झोळी लटकवून अदाणीच्या नावाने कंठशोष करणाऱ्या समस्त महारथीपैकी एकालाही पोर्ट बांधता येत नसेल काय ? नाही. अशा बोलघेवड्यांनाच काय पण आपल्या कल्पनेतल्या भलाभल्याना असे प्रकल्प हाती घेण्याची आणि ते पूर्ण करण्याची कुवत नसते.
अदाणी नको असेल तर एखादा प्रकल्प उभा करण्याचा धंदा करावा किंवा जे धंदा करीत आहेत त्यांना आपल्या सर्व ताकदीनिशी मोठे करावे.
हे दोन्ही आवडले सरकारी व्यवस्था गुंतागुंतीची असते यात शंका नाही पण स्वच्छ असते यावर सामान्यांचा विश्वास बसणे कठीण आहे. सध्यातरी अदाणींविषयी जो गोंधळ सुरु आहे तो व्यवसायाविषयी नाही तर समभागाच्या किंमतींविषयी आहे. देशाला झोलावाला नाही तर उद्योगपतींची, छोट्या व्यावसायिकांची गरज आहे यात काही दुमत नाही.

सौंदाळा 07/02/2023 - 16:36
+/- शंभर अदानी हवे आहेत याच्याशी सहमत सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना लफडी करणे अशक्य आहे, तिथल्या व्यवस्था भयानक गुंतागुंतीच्या आणि स्वच्छ आहेत - असहमत माझा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सरकरी कंपन्यांशी जो काही संबंध आला आहे त्यावरुन त्यांना अजिबात स्वच्छ म्हणणार नाही.

कॉमी 07/02/2023 - 16:56
तद्दन फालतू लेख. एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.

In reply to by कॉमी

Trump 07/02/2023 - 22:44
तद्दन फालतू लेख.
सहमत
एव्हढे लिहिण्यापेक्षा डोळे मिटून तिरंगा हातात घेऊन छाती बडवतानाचा फोटो टाकला असता तरी चालले असते.
असहमत

लेखातील काही मतांशी अमान्य आहे . पण तेच तेच लिहित बसत नाही आता. पण देशात व्यवसाय वृध्दी व्हाय्लाच हवी ह्यात शंका नाही . पण ती अदानीनेच का करावी ? टाटा , बिर्ला , अंबानी , बजाज, पुनावाला हीच आडनावे का ? मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे , पण किमान पाटील, भोसले, कांबळे, गुरव, मोरे , अन गेलाबाजार मुतालिक वगैरे आडनावांना तरी यशस्वी बिजनेस करता येईल असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन द्या ! इझ ऑफ डूईंग बिजनेस , वेन्चर कॅपिटल , एम.आय.डी.सी , वीज, पाणी, रस्ते , मध्ये सुविधा वगैरे उपलब्ध्द करुन द्या ! पण कसं आहे की लोकांना " अनाजीपंत , कृष्णाजी भास्कर अन पेशवे " ह्या गफ्फांमध्ये इतकं मस्त गुंगवुन ठेवलें आहे की कशाला हवेत बिजनेस अन फिजनेस ! आता त्यात अडाणी ही नवीन भर ! टाक गाडीत २०० चें पेट्रोल , अन फेक पाचशेची नोट अन चपटी की पोरं लगेच तयार होतात वाट्टेल तो झेंडा लाऊन फिरायला . हाय काय अन नाय काय ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 07/02/2023 - 22:57
मान्य आहे की इथे महाराष्ट्रात ( किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी नकीच ) कुळकर्णी, देशपांडे , चितळे , फडणवीस वगैरे आडनावांचा द्वेष अगदी वरपासुन खालपर्यंत भिनला आहे ,
फक्त काही पक्षांचे कार्यकर्ते तसे आहेत. हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.

In reply to by Trump

हा बदल गेल्या २० - २५ वर्षामधील आहे. कृपया सगळे असे सार्वत्रीकरण करु नये.
हां , थोडे गणित चुकले . आता नुकतेच ३० जानेवारी १९४८ ला २०-२५ वर्षे पुर्ण झाली . या एकदा सातार्‍यात , आमच्या आजोबांचा मस्त चिरेबंदी वाडा आहे त्याची सफर करवतो तुम्हाला . नंतर मस्त आमच्या शेतात बसुन हुरडा पार्टी करुयात . =))))

अर्धवटराव 08/02/2023 - 00:01
ब्रिटीशांनी भारतातली औद्योगीक मानसीकता खच्ची केली हे एका स्थूलमानाने खरं आहे. भारतात एकीकडे शेती, बलुतेदारी, कुटीर उद्योग इत्यादी रुपाने अगदी ग्रासरूट लेव्हलला उद्योग धंदे होते. तर दुसरीकडे कापड, मसाले वगैरे एक्स्पोर्ट करणारे मोठे उद्योजकही होते. या एव्हढ्या मोठ्या स्पेक्ट्रममधे बाकी अनेक उद्योग-धंदे असतील. या उद्योजकतेला ब्रिटीशांनी संपवलं एक एक नुकसान, आणि त्यामुळे आधुनीक जगाच्या उद्योगविश्वाशी नाळ जोडता न येणे हे आनुशांगीक नुकसान (जे कदाचीत मूळ नुकसानीपेक्शाही भयंकर होते) अदानी वा इतर कुठल्याही उद्योगसमुहाला सरकारी पातळीवरुन मदत मिळणे आणि त्यातुन उद्योगसाम्राज्य मोठी होणे यात विशेष काहि नाहि. जगात सर्वत्र हेच होत असतं. त्यात काहिही गैर नाहि. उद्योगात भ्रष्टाचार होणं आणि भ्रष्टाचारासाठी उद्योग तयार करणं यात मूलभूत फरक आहे. अदानीची केस पहिल्या प्रकाराची असावी. आम्हि वैयक्तीक रित्या त्यांच्यावर बेटींग करतो आहोतच. पडलेल्या समभागांत गुंतवणुक करण्याची संधी कोण सोडेल :) बाकी अदानी, आणि त्याला जोडुन मोदी विरोध, या प्रकरणावर काहि किमान बौद्धीक पातळीचे विवेचन वाचायला मिळते का हे बरच शोधलं.. आणि अपेक्शेनुसार भ्रमनिरास झालाच. भारतात अदानीच्या तोडीचे अनेकानेक उद्योजक तयार व्हावेत. त्यांच्या कल्पकतेतुन भारताचा आर्थीक विकास व्हावा. सामान्य लोकांनी शेअरमार्केट मधुन बक्कळ पैसा कमवावा. सगळ्यांना बरोबरीची संधी मिळण्याच्या आणि पिळवणुक टाळायच्या उद्देशाने कायद्याचं पालन व्हावं. हे काहि दिवास्वप्न नाहि. भारत त्या दिशेने मार्गक्रमण करतोय असं आश्वासक चित्रं आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय पुणे. जय काका हलवाई आणि चितळे बाकरवडी.

स्वधर्म 10/02/2023 - 17:42
मा. मुतालिक साहेब, आपण कोणता उद्योग करता ते माहिती नाही, पण अशा प्रकारचा लेख लिहिण्याआधी थोड़े जमिनीवरील वास्तव समजून घ्यायची तसदी घेतली असती तर बरे झाले असते. अगदी अलिकडचं उदाहरण द्यायचं झालं तर, सध्या आपल्या महावितरण या सरकारी कंपनीने वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वीजदर असणारे राज्य असतानाही! गुजरातचे वीजदर काय आहेत? तर आपल्यापेक्षा ३५% कमी, आंध्र, कर्नाटकचे आपल्यापेक्षा १५% कमी. प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जावेत म्हणून तर हे केलं जात नाही ना, हे आपली सारासार विवेकबुध्दी शाबूत ठेऊन विचार करण्याची गोष्ट आहे. गेल्या रविवारी सजग नागरिक मंच यांची मासिक सभा पुण्यात झाली, तिचे संपूर्ण चित्रिकरण यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्यात प्रताप होगाडे या उद्योजकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. या धाग्यात हे देण्याचे कारण म्हणजे अडाणी यांचा या दरवाढीशी असलेला संबंध त्यांनी उलगडून सांगितला! महावितरण हे महाजनको आणि अनेक खाजगी उद्योगाकडून वीज खरेदी करते. त्यात साडेतीन रु. प्रतियुनिटपासून ५ रू. ७६ पै प्रतियुनिट इतका दर पड़ला आहें. सर्वात जास्त दर (रू. ५.७६ ) हा अडाणी पावर कंपनीकडून घेतलेल्या वीजेचा आहे. २०१२ ते २०१८ या कालावधीत जी वीज अडाणी कंपनीकडून घेतली, त्याचा परिणाम म्हणून इंधन समायोजन आकार १५ ते २० पैशापासून वाढून १ रू. ३० पैसे इतका झाला आहें. मागे असेच एनटीपीसी व इतर ऊर्जा निर्मिती करणार्या कंपन्यांना कोल इंडीया या कडून कोळसा न घेता अडाणीकडून कोळसा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही वाचले होते. अडाणीचा दर अर्थातच खूप जास्त होता (काही पटीत). आपल्या प्रत्येक वीजबीलातून किमान १५० रू. ते कितीही हे या कंपनीवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे त्यांना जातात, हे सामान्य माणसाला समजत नाही. खालील चित्रफितीत काही प्रमाणात हे मांडले गेले आहे. सामान्य माणसाकडून अडाणी यांच्या केवळ एका धंद्यात कसे पैसे वळवले जातात, हे सहज समजून येईल. अडाणी यांचे बाकी सगळे धंदे उदा. विमानतळ, बंदरे, धान्य कोठारे असे सरकारचेच नेमके का आहेत? आपण याचा कधी विचार केला आहे का? सगळी सभाच मुळी महावितरण कसे चालते, त्यात भ्रष्टाचार आहे का? त्यांचे व्यवस्थापन काय दर्जाचे आहे? खरोखरच शेतीपंपाला दिलेली वीज मोफत आहे का? आणि दरवाढ यातील वास्तव मांडणारी झाली. पण निदान खालील तुकडे तरी पहा आणि मग १०० अडाणी आपल्याला हवेत का, सरकारी आस्थापने खरोखरच पारदर्शक व भ्रषटाचारमुक्त आहेत का याचा विचार करा. दुवा: https://www.youtube.com/watch?v=E--ofniwq44 १३:०० ते १५:०० ३५:०० ते ३५:३० ४५:०० ते ४८:०० आपण प्रिय आहें त्याला निसर्गत: महत्व देणारच, पण सत्य हे त्याहिपेक्षा महत्वाचे असते, ही जाणीव जेंव्हा आपल्या नागरिकांस होईल तेव्हाच आशेला काही जागा राहिल. अन्यथा भ्रामक प्रचारातून, स्वस्तुतीतून (पहा कालचे संसदेतील भाषण) उभ्या केलेल्या ब्रॅंडमधून जे प्रेम उपजते, ते आंधळे असते. पण वरच्याप्रमाणे प्रचारकी, भावनेला हात घालणार्या लेखांच्या रतिबात हे सांगणार तरी कुणाला?

श्रीगुरुजी 10/02/2023 - 18:55
प्रस्ताव किती दरवाढीचा आहें? तर येत्या दोन वर्षात ५५% वाढ करण्याचा. हे सगळं जनतेच्या माथी मारणार्या सरकारी कंपनीत आजिबात भ्रष्टाचार नाही, असे केवळ दोनच लोक म्हणू शकतात, एक निर्बुध्द किंवा अंध. भ्रष्टाचार असेलच, पण या दरवाढीमागे अजूनही कारणे आहेत. अनेक दशके शेतकऱ्यांना विनाशुल्क किंवा अत्यल्प भावाने वीज देणे, शेतकऱ्यांनी देयकातील वीजशुल्क न भरणे, गावोगाव व गणेशोत्सवात आकडे टाकून वीज चोरणे यामुळे ५०,००० कोटी रूपयांहून अधिक थकबाकी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी नियमित वीजशुल्क देणाऱ्यांवर भाववाढ लादली आहे. वीजजोडणी तोडण्यासाठी गेलैल्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून पळवून लावले जाते. फक्त अदानीला दोष देऊन काय होणार?

In reply to by श्रीगुरुजी

आग्या१९९० 10/02/2023 - 19:26
पावसाळ्यात माझा कृषि पंप वापर शून्य असतानाही प्रत्येक महिन्यात ५०० पेक्षा अधिक युनिट्स वापर दाखवून बिल यायचे. चार महिने बिल भरले नाही. MSEB अधिकाऱ्यांना शेतात आणून प्रत्यक्ष मिटर रिडिंग दाखवले. शून्य वापर असतानाही वाढीव बिल का पाठवले? हे विचारले तर , निम्मे बिल करून देतो,लगेच भरत असल्यास. मी म्हटले पूर्ण भरतो पण मिटर रिडिंग तपासल्याची फॉर्मवर नोंद करा. त्यांनी तशी नोंद केली. ऑफीस मध्ये जाऊन शिक्का मारून घेतला. अजून बिल भरले नाही. पद्धतशीर तक्रार केली आहे. तक्रार मागे घ्यायला सांगत आहे. बघू काय होते ते. https://www.newsclick.in/inflated-power-bills-maharashtra-farmers-smell-scam

विवेकपटाईत 17/02/2023 - 11:08
गेल्या पाच वर्षांत 105 स्टार्टअप प्रत्येकी 6000 कोटींचे झाले आहेत. यातले काही अडाणी अंबानी निश्चित बनतील. टाटा ने 470 विमानांची ऑर्डर दिलइये तब्बल साडे पाच लाख कोटींची.विमान तळांची संख्या आज 147 आहेत दोन वर्षांत 200 वर जाणार. पुढील दोन वर्षांत डिफेंस उत्पादन 2 लाख कोटींपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे आणि निर्यात ही 35000 कोटींचा करण्याचा. उद्योगांसाठी उत्तम रास्ते, रेल्वे, optic फायबर लाइन, विमान तळ एवढेच काय वीज उत्पादन ही आठ वर्षणत 40 टक्के वाढले. सोलर स्वस्त वीज निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. बाकी शून्य तकनिकी असलेले उद्योग लाऊन पेप्सिको, कोकाकोला, यूनिलिव्हर, नेस्ले, अॅमवे समेत डझन भर अमेरिकी कंपन्या देशाला लुटतात. कुणीही त्यावर बोलात नाही. पंजाबत विदेशी कंपन्यांचे नाही तर किसान आंदोलनशी संबंध नसला तरी जिओ चे टावर जाळून 1500 कोटींचे नुकसान केले. पतंजलि फूड पार्क नुकताच सुरू झाला होता. त्यावर आक्रमण झाले. त्यात प्लांट जळला असता तर फूड पार्क =ची भ्रूण हत्या तेंव्हाच झाली असती. अर्थात हे कुणाच्या इशार्‍यांवर होते हे सुज्ञांना सांगण्याची गरज नाही. पुढील दहा वर्षांत हीच सरकार राहिली तर देशांत 100 अडाणी निश्चित बनतील.

तर्कवादी 17/02/2023 - 11:50
शंभर अदाणी हवे आहेत
हं.. थोडं कठीण वाटतंय. पण गौतम अडाणी आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढची काही वर्षे इतर उद्योगांवरचं लक्ष थोडं कमी करुन "अदाणी १००" प्रोजेक्टवर अहोरात्र मेहनत घेतली तर होवू शकेल कदाचित :)

...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.

विहीर

आजी ·

गवि 06/02/2023 - 08:30
त्या जोडप्याच्या चिकाटीला दाद दिली पाहिजे. आणि फिटनेसलाही. अशी जिद्दी जोडपी क्वचित आसपास दिसतात. विहीर खणणे नसेल पण काही उद्योग, प्रकल्प चिकाटीने उभा करणारे लोक हे याच प्रकारातले.

जिद्द काय असते ते दाखविणारा प्रेरणादायी लेख. एकदा ठरवलं तर कितीही अशक्यप्राय गोष्ट पूर्ण करता येते. The Mountain Man म्हणून मागे एक सिनेमा आला होता. त्यातही तो एकटा व्यक्ती डोंगर फोडून रस्ता करतो अशा त्या सिनेमा गोष्टीची आठवण झाली. आजी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

।आता कोणी शहरी पांढरपेशे लोक अशी विहीर खणू जातील का? । आहेत काही लोक असे मेहनती त्यांना लोक वेडं ठरवतात. तुम्ही छान लिहीलं आहे. असं लिहीत रहा ज्याने तरुणांना प्रेरणा मिळेल. आम्ही अगदी विहीर नाही खणली पण बरेच ऊद्योग केले आहेत. आम्हाला सगळे ‘ यडपट ‘ म्हणतात. 

mayu4u 06/02/2023 - 14:28
अशीच एक विहिर आपल्या मिपाकर अन्या बुद्धे च्या मित्राने खणली आहे.

आजींचे लेख वाचनीय असतात. आजही वाचून वाचनानंद मिळाला. शेवटचा वृत्तांत जरा निराशा आणणारा होता खरा, पण that's life! सं - दी - प

चित्रगुप्त 06/02/2023 - 22:08
खूपच प्रेरणादायक हकीगत आहे. सांगितली पण खूप बहारीची आहे. साधारणपणे कोणत्या काळातली/दशकातली घटना आहे ही ?

In reply to by सालदार

चित्रगुप्त 07/02/2023 - 20:45
'दोघेही दिसायला अगदी सामान्य, सावळे' असते तर चालले असते का ? धाग्याकर्त्याने सांगितल्याप्रमाणे ही प्रत्यक्षात होऊन गेलेल्या लोकांबद्दलची खरीखुरी घटना असल्याने त्या व्यक्तींचे केलेले वस्तुनिष्ठ वर्णन 'अनावश्यक' का ठरावे ?

In reply to by चित्रगुप्त

सालदार 07/02/2023 - 20:55
कथेचा गाभा, मतितार्थ पाहिला तर नक्कीच ते वाक्य अनावश्यक आहे. दोघे दिसायला देखणे असो वा सामान्य, त्यांच्या कर्तुत्वात त्याने काहिच फरक पडत नाही. माझा उलट प्रश्नः ते दोघेही दिसायला सामान्य असते तर ते त्यांनी केलेले कार्य वाखाणले गेले नसते काय?

In reply to by सालदार

जर लेखन खर्‍या घटना व व्यक्तींवर आधारित असेल, आणि त्या व्यक्ती 'देखण्या व गोर्‍यापान' असतील, तर त्यांना उगाच 'सामान्य' का करायचे? एखादं व्यक्तीमत्व उभं करताना, त्या व्यक्तीविषयी काही गुणदोष, काही शारिरीक वैशिष्ट्ये यांचे वर्णन येणे स्वाभाविक आहे.

In reply to by चित्रगुप्त

Trump 13/02/2023 - 14:31
श्री चित्रगुप्त, तुमच्या मताशी सहमत. सदर वाक्ये भारतीय समाजात असलेल्या रंगद्वेषाबद्दल सांगतात. गोर्या आणि काळ्या माणसांनी केलेल्या कामाबद्दल दुजाभाव नसावा.

चित्रगुप्त 10/02/2023 - 09:28
एखादं व्यक्तीमत्व उभं करताना, त्या व्यक्तीविषयी काही गुणदोष, काही शारिरीक वैशिष्ट्ये यांचे वर्णन येणे स्वाभाविक आहे.
------- सहमत.
दोघांचं लव्ह मॅरेज. दोघंही दिसायला देखणे, गोरेपान. एकमेकांना अनुरूप. प्रतिमा एम् ए झालेली. आवड म्हणून एका माॅंटेसरीत नोकरी करणारी. दिलीप ग्रॅज्युएट. एका शाळेत शिक्षक. त्यांना दोन मुलं. एक मुलगा.एक मुलगी. आदर्श संसार. दोघंही संसारापुरतं कमवायचे. संसार भागायचा.थोडी शिल्लकही पडायची. ते आधी पुण्यात राहात होते पण भाड्याने.
----- या सर्वांपैकी फक्त त्यांचं 'देखणेपण आणि गोरेपणच' का 'अनावश्यक' हे अनाकलनीय आहे. कृपया उलगडा करावा. समजा, वाचकांपैकी कुणाला 'लव्ह-मॅरेज', दुसर्‍या कुणाला 'अनुरूप', आणखी कुणाला 'ग्रॅजुएट', एकाद्याला 'शिक्षक', तर कुणाला 'दोन मुलं' इत्यादि 'अनावश्यक' वाटत असेल, तर त्या त्या व्यक्तीला तसे वाटण्याबद्दल काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असावे का, असल्यास कोणते, याविषयी कुणी खुलासा करू शकेल तर या मुद्द्याला एक नवा आयाम मिळेल आणि ज्ञानवर्धन होइल असे वाटते. (-- यात व्यक्तिगत असे काही नसून ही एक सर्वसामान्य जिज्ञासा आहे हे कृपया लक्षात घ्यावे)

In reply to by चित्रगुप्त

सालदार 13/02/2023 - 10:30
इतर विशेषणे त्यांनी कमावली आहेत आणि कथा/लेख मुळतः कमावलेल्या विशेषणांसाठीच लिहिला आहे असे वाटले म्हणून ते अनावश्यक आहेत.

In reply to by सालदार

"जसा आहे तसा" अनुभव मांडला आहे त्यामुळे हा वादच अनावश्यक आहे. ह्यातुन तुमचा " कावीळ झालेला अ‍ॅट्रॉसिटी" दृष्टीकोन मात्र दिसौन येतोय. आवरा!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सालदार 13/02/2023 - 10:54
मी माझा दृष्टीकोन मांडला, तुम्ही तुमचा मांडा. उगाच इतरांना सर्टीफिकेट वाटून काही साध्य होणार नाही. तुम्हाला बराच त्रास झालेला दिसतो म्हणुन क्षमस्वः

In reply to by सालदार

तुम्ही तुमचा दृष्टीकोन मांडला, मी माझे मत मांडले, बास ईतकेच. बाकी सर्टीफिकेट वगैरे देणारा मी कोण? व्यक्तीस्वातंत्र्य घेउन कोणीही इथे विरुद्ध मत मांडु शकतोच.

In reply to by चित्रगुप्त

Trump 13/02/2023 - 14:36
या सर्वांपैकी फक्त त्यांचं 'देखणेपण आणि गोरेपणच' का 'अनावश्यक' हे अनाकलनीय आहे. कृपया उलगडा करावा. >> कारण हि विशेषणे जन्मतः मिळतात. त्यामुळे ह्यावर आधारीत कौतुक, स्तुती आणि लेख अशाघ्य ठरतो. त्यात त्या जोडप्याचे कोणते ही कर्तुत्व दिसत नाही.

सर टोबी 13/02/2023 - 18:37
अतिशय निर्मळ मनाचा आणि निरागस स्वभावाचा आहे. त्यांच्या निरागसतेमुळे त्या अतिशय अवघड वाटणाऱ्या विषयांवर लिलया आणि लोभसपणे लिहू शकतात. त्यांचे लेख वाचणे हा एक समृद्ध करणारा अनुभव असतो. प्रस्तुत लेखात कथा पात्रांची त्यांनी ज्या प्रकारे ओळख करून दिली आहे ती लेखकांच्या एका पिढीत रुळलेली अशी पद्धत होती, जसे कि “अवि सावळा असला तरी तरतरीत आणि बांधेसूद होता आणि तरुणी त्याच्या कपाळावर रुळणाऱ्या झुलपांवर फिदा होत असत.” किंवा “ती सावळी असली तरी तरतरीत आणि चार चौघीत उठून दिसणारी होती” वगैरे. कालौघात असे लिखाण नवीन जाणिवांच्या आधारावर बुरसटलेले किंवा दुही निर्माण करणारे वाटू शकते परंतु एक वाचक म्हणून आपणही एक प्रगल्भता दाखवावी आणि आजी नाउमेद होणार नाहीत अशी दक्षता घ्यावी या अपेक्षेने हा प्रतिसाद देत आहे. प्रतिसादातील विचार पटले नाही तरी माझ्याकडून यावर काही प्रतिक्रिया असणार नाही.

गवि 13/02/2023 - 20:16
गोरे असणे याबद्दल काहीसे रेसिस्ट भासणे यात अगदी चूक काही नसावे. पण या कथेबाबत माझे मत असे झाले की गोरेपान किंवा तत्सम विशिष्ट वर्णन हे तथाकथित पांढरपेशे, सुखवस्तू, अगदी ब्राम्हणच म्हणा ना असे.. म्हणजे प्रचलित प्रतिमेनुसार जे लोक सहसा कष्टाची कामे करत नाहीत अशी समजूत आहे अशापैकी ते वाटत असावेत. म्हणून त्यांनी असे सश्रम सकारात्मक काही केले हे अधिक अनपेक्षित आणि उठून दिसणारे झाले. इतरही अनेक विशेषणे ही त्यांना साधारणतः शारीरिक कष्ट न करू जाणाऱ्या वर्गाची आहेत. अनपेक्षितपणा दाखवण्याचा उद्देश मला तरी वाटला. उन्हात ऑलरेडी रापलेल्या, रफ टफ जोडप्याने असं काम केलं असतं तर कदाचित हा अनपेक्षित फॅक्टर वाटलाच नसता. In fact ते गोरेपान जोडपे या विहीर खणण्याच्या प्रक्रियेत खरेच नैसर्गिक काळवंडले असावेत. :-) असो. इट वॉज ऑन अ लायटर नोट.

In reply to by गवि

Trump 15/02/2023 - 12:37
गोरे असणे याबद्दल काहीसे रेसिस्ट भासणे यात अगदी चूक काही नसावे. पण या कथेबाबत माझे मत असे झाले की गोरेपान किंवा तत्सम विशिष्ट वर्णन हे तथाकथित पांढरपेशे, सुखवस्तू, अगदी ब्राम्हणच म्हणा ना असे..
कृपया ब्राम्हण हा शब्द वापरुन चर्चा मुळ मुद्द्यावरुन घसरवु नका. आधीच ब्राम्हण म्हटले की काही लोकांना पोट्शुळ होतो.

स्मिताके 14/02/2023 - 21:15
प्रेरणादायी अनुभव. नेहमीप्रमाणे छान ओघवतं लिहिलंत आजी. आणखी लिहा. >>लेखकांच्या एका पिढीत रुळलेली अशी पद्धत सर टोबी यांच्या प्रतिसादाशी सहमत.

इथे विहिरीऐवजी गोरेपणा, देखणेपणावरील चर्चा विहिर खोदलेल्या जोडप्याने वाचली तर नक्कीच त्यांनी ती परत बुजवायला घेतली असती. यानिमित्ताने "झक मारली विहीर खोदली" असा वाक्रप्रचार देखील मराठी भाषेत लाँच करावा अशी मागणी मी या ठिकाणी करीत आहे.

सौंदाळा 14/02/2023 - 22:00
दांपत्याच्या जिद्दीला सलाम. असे झपाटलेले लोक आता कमी होत चालले आहेत की काय असे वाटते. बाकी कथा लिहिण्यासाठी जे काही पात्रवर्णन असेल त्यात लेखकाचे पूर्ण स्वातंत्र्य असावेच. शिव्या, शारीरीक गुणदोष, जातिवाचक वैशिष्ट्ये गरजेप्रमाणे असावेच.

सौन्दर्य 15/02/2023 - 05:21
आजींचे लिखाण नेहेमीच वाचण्याजोगे असते, त्यामुळे ह्या लेखात देखील तोच अनुभव आला. त्या जोडप्याच्या निश्चयाचे, निष्ठेचे, अथक परिश्रमाचे अगदी कौतुक वाटले. ती विहीर खोदताना आसपासच्या लोकांनी नक्कीच त्यांचा अनेकवेळा हिरमोड केला असणार. त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला असणार. परिश्रमापेक्षा ते जोडपे अश्या नकारात्मक टीकेला पुरून उरले हे देखील कौतुकास्पदच.

स्वधर्म 15/02/2023 - 13:14
गोष्ट आवडली. आजीचें लेखन वाचनीय आणि निरागस असतं. मला एक मुद्दा जाणवला, तो असा: आजकाल स्वतः काम करण्याला प्रतिष्ठा राहिली नाही. काही वेळा तर तर ते प्रॅक्टीकलही नसतं. म्हणून कथेचा आशय भावला. मी पण काही कामं स्वत: करायचा प्रयत्न करतो, त्यात खूप वेळ जातो, मनस्तापही होतो. तरी स्वत: करावंसं वाटतंच. कधी कधी तर असं वाटतं की हा मूर्खपणाच आहे आपला. पण शेवटी समाधान मिळतं आणि मुख्य म्हणजे काहीतरी शिकायला मिळतं. उदा. आपला आयकर आपणच भरणे, वाहन परवाना स्वत: दोन तीन हेलपाटे मारून काढणे, घरातली छोटी मोठी दुरूस्ती. आजकाल सोसायटीत लोक दररोज गाडी पुसायला माणूस लावतात. मला हे पूर्णपणे अनावश्यक वाटतं. पैशाचा हिशोब केला तर कधी कधी काम करून घेणं स्वस्तच पडतं.

आजी 17/02/2023 - 07:43
गवि- त्या जोडप्याच्या फिटनेसला आणि चिकाटीला दाद दिली पाहिजे "हे तुमचं म्हणणं खरं. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे -" प्रेरणादायी लेख "हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले. धन्यवाद. सरिता बांदेकर -तुम्हीही अशा टाईपचे उद्योग केलेले आहेत? शाबास. त्याविषयी तुम्हीही लेख लिहावे अशी विनंती. Mayu4u-तुमच्या मित्राचं अभिनंदन. सस्नेह -तुमच्या अभिप्राय वाचून समाधान वाटले. हणमंत अण्णा शंकर -यावर तुम्हांला कथा लिहावीशी वाटते?जरुर लिहा. धन्यवाद. चांदणे संदीप -विहीर गाडली गेली हे कळल्यावर मलाही वाईट वाटलं होतं. टर्मीनेटर-अभिप्रायासाठी आभार. चित्रगुप्त -ही साधारण पन्नास वर्षांपूर्वीची घटना आहे. नचिकेत जवखेडकर-अभिप्रायासाठी धन्यवाद. सालदार -"देखणे गोरेपान हे वाक्य अनावश्यक"असं तुम्ही म्हटलं आहे. तुमच्या मताचा आदर आहेच. पण ही सत्यकथा आहे. ते दोघे प्रत्यक्षात तसेच होते. मी तसेच वर्णन केले आहे. त्यात इतर काही उद्देश नाही. त्यातून देखणे हा शब्द अनावश्यक वाटेल मान्य पण गोरेपान म्हणण्यामागं ते कष्टकरी, रापलेल्या रंगाचे, श्रमजीवी नव्हते,हे सांगण्याचा उद्देश आहे. तरीही त्यांनी हे केलं, जे लोकांना अनपेक्षित वाटलं. चित्रगुप्त -तुम्ही माझंच उत्तर दिले आहेत तुषार काळभोर, ट्रम्प -सहमत. राजेंद्र मेहेंदळे - प्रतिसादाबद्दल धन्यवाद. या सगळ्या चर्चेवरून, मीच लिहिताना माझं म्हणणं तुमच्यापर्यंत नीट पोचवू शकले Communication gap राहिली असावी असे वाटते. सर टोबी -आजी निर्मळ, निरागस मनाची आहे. हा तुमचा अभिप्राय वाचून समाधान वाटले. स्मिता के-तुम्ही सर टोबींशी सहमत.धन्यवाद. धर्मराज -वेगळी आणि गंमतीदार प्रतिक्रिया.धन्यवाद. सौंदाळा-जिद्दीला सलाम.. हो. पटलं. सौंदर्य -निश्चयाचे, निष्ठेचे,परिश्रमाचे कौतुक."खरंय. स्वधर्म -तुम्ही देखील घरासाठीची बाहेरची कामं स्वतः करता , हे कौतुकास्पद. सर्वांचेच पुन्हा एकदा आभार.

"विश्वास ठेवा अगर ठेवू नका,पण हे सत्य आहे." मी आता जी हकीकत सांगणार आहे,तिची सुरुवात वर दिलेल्या टिपिकल वाक्याने करावी असा मोह मला होतोय. पण तशी मी करत नाहीये. मी तर म्हणेन "विश्वास ठेवाच. कारण ही सत्य आहे. कारण मी हे डोळ्यांनी पाहिले आहे. खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यासारख्या शहरांचाही त्यावेळी आजच्याइतका विस्तार झाला नव्हता. त्याच पुण्याजवळचं एक खेडं. ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणारं. लहानशी वस्ती. त्या एरियात जमीन स्वस्त मिळायची. आता ती जागा अगदी मध्यवर्ती समजली जात असेल. माझ्या ओळखीचं एक जोडपं. दिलीप आणि प्रतिमा. प्रतिमा माझी मैत्रीण.

(मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!)

साहित्य संपादक ·

हेमंतकुमार 04/02/2023 - 16:20
झकास उपक्रम ! एक सूचना : एका वर्षात २ 'मराठी दिन' असतात पण १ मे आणि २७ फेब्रुवारी या दोन मराठी दिनांचे प्रयोजन वेगळे आहे. २७ फेब्रुवारीचा उल्लेख ‘म. भा. गौरव दिन’ असा करण्यात यावा. ok .. ( १ मे = मराठी भाषा दिन)

झकास बोले तो एकदम झक्कास, लिवणार म्हंजे लिवणारच कवी लोक्स तयार रहा तुमच्या क्वितांची तोडफोड बघायला (खुडसे बाता:- कौन्सी क्विता लेलू?) धाग्याचे शिर्षक कंसात का लिहिले आहे? पैजारबुवा,

१. इतर मराठी संकेतस्थळांवरील (जर ते लेखन मिपावर नसेल तर) लेखनाची प्रेरणा नको.
म्हणजे नक्की कसें ? फक्त मिसळपाव वरील लेखन प्रेरणा म्हणुन चाले असे की काय ? आता गीता काय मिसळपाव वर लिहिलेली नाहीये , मग चाल चलाऊ गीता हे विडंबन स्पर्धेसाठी चालेल की नाही ? की सुप्रसिध्द कविता गीते विडंनाला चालतील ?

In reply to by प्रसाद गोडबोले

तसे केल्यास एकतर (जर ते लेखन मिपावर नसेल तर) त्याचा संदर्भ इकडे लागणार नाही. 'मोकलाया दाहि दिशा' मिपावर सुप्रसिद्ध आहे. पण त्याचा संदर्भ इतर मराठी संस्थळांवर दिल्यास त्याची गंमत ज्यांनी मिपावर ते वाचलेले नाही, त्या वाचकांना कळणार नाही. आणि असेही इतरत्र आंतरजालावरील लेखनाचे विडंबन (जर ते खूप जास्त प्रसिद्ध नसेल, उदा. मुक्तपीठ वरील लाडू कावळा किंवा लुनावाले ब्रह्मे) मिपावर करणे उचित वाटत नाही. आंतरजालीय नसलेले इतर लेखन, कविता, सिनेमातील गाणी जी प्रसिद्ध, सर्वश्रुत असतात, त्यांची विडंबने चालतील. ('प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'बोले चुडीया, बोले कंगना' यांची विडंबने मिपावर आहेतच.)

पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! - चालचलाऊ गीता, जयकृष्ण केशव उपाध्ये
विडंबन.. मराठी वाङमयामधील एक विशेष प्रकार. एखाद्या लोकप्रिय रचनेचे (बहुतेकदा विनोदी अथवा उपहासात्मक) अनुकरण, अशी विडंबनाची साधारण व्याख्या करता येईल. मराठी लेखनात दर्जेदार विडंबनाची दीर्घ परंपरा आहे.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

शशक- औताचा बैल

राजेंद्र मेहेंदळे ·

माणूस पहिली चार पाच वर्ष सोडली तर पुढची बारा ते सोळा आठरा वर्ष शर्यतीचा बैल व पुढे साठ,सत्तर किंवा मरेपर्यंत औताचा बैल. कथा आवडली.

चित्रगुप्त 27/01/2023 - 21:53
छान लिहीले आहे, परंतु शीर्षकामुळे कथा 'औताच्या बैला'बद्दल असल्याचे आधीच ठाऊक झाल्याने शेवटी 'धक्का' लागला नाही. 'शर्यतीचा बैल' आणि 'औताचा बैल' यात तांत्रिक फरक काय असतो हे आम्हा ठावे नाही. म्हणजे शर्यतीचा 'बैल' हा प्रत्यक्षात 'सांड' असतो का? 'वळू', 'बैल' आणि 'सांड' हे तिन्ही वेगवेगळे असतात का? बाकी कोंबड्यांच्या झुंजी, बैलांच्या शर्यती, माकडांच्या कसरती, सर्कशीतले प्राणी वगैरेंवर बंदी घालायची आणि दररोज लाखो कोंबड्या, बकरे, गायी वगैरेंची खाण्यासाठी कत्तल करायची, हे काही पचनी पडत नाही राव. ती मनेका का कोण, भाषण वगैरे देऊन झाल्यावर चिकन -कबाब वगैरेवर ताव मारत असेल.

वळू-- देवाला सोडलेला बैल, याला कोणी मारत नाही उलट पूजा करतात सांड- पुनरुत्पादनासाठी उपयोगी बैल औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

टर्मीनेटर 28/01/2023 - 14:51
छान! शशक आवडली 👍 शर्यतीचा बैल आणि औताचा बैल म्हणजे रेसचा घोडा अणि टांग्याच्या घोड्या सारखाच प्रकार आहे 😀
औताचा बैल-- याची वृषणे फोडली जातात, म्हणजे तो बंडखोरी करत नाही आणि जन्मभर निमूट्पणे काम करतो. पण प्रजोत्पादन करु शकत नाही.
थोड्याफार अशाच पद्धतीने बोकड आणि डुकरांनाही 'खच्ची' केले जाते. त्यामागे त्यांच्या शरिराची उर्जा विर्योत्पादनात खर्च न होता, त्यांचे वजन वाढुन मांसविक्रितुन अधिक उत्पन्न मिळवणे हा उद्देश असतो. हे सर्व अघोरी वाटते पण "सब गंदा है पर धंदा है ये..." "एखाद्याचे खच्चीकरण करणे" ह्या वक्यप्रयोगाचा जन्म ह्यातुनच झाला आहे.

चित्रगुप्त 28/01/2023 - 16:55
म्हणजे शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' नसतो ? मग त्याला शर्यतीचा वळू किंवा शर्यतीचा सांड का म्हणत नाहीत ? यावरून आठवले, आम्ही चित्रकलेच्या तिसर्‍या वर्गात आल्यावर शिक्षकांनी आम्हाला तैलरंग, पॅलेट, ऑइल पेपर आणि 'हॉग हेयर' ब्रश आणायला सांगितले. hog म्हणजे नेमके काय, हे कुणालाच ठाऊक नव्हते. मग मी घरी जाऊन इंग्रजी शब्दकोषात हुडकल्यावर hog म्हणजे 'अण्ड बडवलेला डुक्कर' असे होते. या घटनेनंतर आज बावन्न वर्षांनंतर गूगल ट्रान्स्लेट मधे बघता खालील अर्थ दिलेले दिसले: hog = स्वार्थी. आपमतलबी मनुष्य. दुष्ट मनुष्य. (... दुष्ट माणसाच्या केसांचा ब्रश ? कमाल आहे) आणखी भाषांतराच्या साईटांवरः स्वतःकडे ठेवा, वर्चस्व ठेवा, ताब्यात घ्या, कोपरा, नियंत्रण करा, , पेरणे, स्वाईन, पोर्क, पिगलेट, डुक्कर, --- अन्यायकारक किंवा स्वार्थी मार्गाने स्वतःसाठी सर्व (काहीतरी) ठेवा किंवा वापरा. (जहाजाच्या संदर्भात) त्याच्या लांबीच्या बाजूने वाकणे किंवा वाकलेले उत्तल बनणे परिणामी एकतर हुल मध्यभागी समर्थित आहे आणि टोकांना नाही (जड समुद्राप्रमाणे) किंवा जहाज अधिक टोकावर लोड केले जात आहे . पाळीव डुक्कर, विशेषत: 120 पौंड (54 किलो) पेक्षा जास्त आणि कत्तलीसाठी पाळले जाते. एक मोठी मोटरसायकल, विशेषतः हार्ले डेव्हिडसन. पहिल्या काटण्याआधी एक तरुण मेंढी. HelloEnglish: India's no. 1 English Learning Apphttps://helloenglish.com › hog meaning in marathi: स्वार्थी तात्पर्यः कितीही गूगल, ट्रान्सलेशन अ‍ॅप वगैरे नवनवीन प्रकार आले, तरी जुन्या पुस्तकंना पर्याय नाही.

केव्हढा तो अभ्यास!! शशक लिहिताना मी एव्हढा विचार केला नव्हता बुवा. आता मिपावर लिहिताना अजुन जास्त अभ्यास करुन लिहावे लागणार असे दिसतेय :)

श्रीगुरुजी 30/01/2023 - 00:22
दुर्दैवाने खरे आहे. बैल या मुक्या प्राण्यावर जिवंतपणी अत्यंत क्रूर अत्याचार केले जातात. भूल न देता त्याचे वृषण दगडाने किंवा दांडक्याने ठेचून नष्ट करतात. हे करताना बैलाला किती यातना होत असतील या कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो. वृषण नष्ट करून त् त्याचा नैसर्गिक आनंदही हिरावून घेतला जातो. आडवे पाडून पाय बांधून त्यात लोखंडी खिळे ठोकून नाल बसविताना होणाऱ्या वेदनांमुळे बैलाच्या डोळ्यातून पाणी वाहत असते. पण माणसाला त्याची दया येत नाही. नंतर आयुष्यभर नाकात वेसण घालून भर उन्हात नांगराला जुंपून राबवितात आणि गाडीला जुंपून अमाप ओझे ओढायला लावतात. हे करताना चाबकाचे फटके मिळतातच. शेवटी बैल म्हातारा झाला की कसायाला विकतात. शर्यतीच्या किंवा जालिकट्टू मध्ये पळविणाऱ्या बैलांचेही अतोनात हाल करतात. कानात लाल मुंग्या सोडणे, दारू पाजणे, काटेरी टोकदार चाबकाने मारणे, शेपटी पिरगाळणे हे अत्याचार या बैलांवर होतात. आपल्या स्वार्थासाठी माणूस इतका क्रूर व निर्दयी का होतो हे समजत नाही. हीच माणसे भजन वगैरे करतात, वारी करतात, बैल आमच्या कुटुंबातील सदस्य आहे वगैरे सांगतात, पण थंडपणे बैलाला आयुष्यभर यातना देतात. हा विरोधाभासच समजत नाही. मिपावर मी पूर्वी या विषयावर एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने बरेच मिपाकर बैलांवर केल्या जाणाऱ्या क्रूर अत्याचारांचे समर्थन करीत होते.

श्रीगुरुजी 30/01/2023 - 13:41
कधी थांबणार हा क्रूरपणा? या लेखाचा मूळ उद्देश समजून न घेता किंवा समजूनही मुद्दाम दुर्लक्ष करून स्कोर सेटलिंग, वैयक्तिक पातळीवर घसरणे, उपहास अश्या स्वरूपाचे प्रतिसाद दिले गेले.. काही जणांनी बैलांवर अत्याचार करण्याचे जोरदार समर्थन केले.

In reply to by श्रीगुरुजी

काही प्रतिक्रिया वाचुन धाग्याचे काश्मीर केल्याचे जाणवले.पण लेखाशी मी सहमत आहे. एकुणातच सहज जाता येता कुत्र्यांना दगड मारणे, मांजरांना काही होत नाही म्हणुन उंचावरुन फेकणे, चतुर वगैरे किड्यांच्या पायाला किवा गोगलगायींना दोरा बांधुन त्यांची मजा बघणे, बुल फाईट, कोंबडे/बकरे झुंजवणे वगैरे प्रकारांचा तिटकारा आहे.

हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असल्याने त्यावेळेस अंगावर आलेला काटा पुन्हा आला. नेमकी शशक. इतरांप्रमाणेच म्हणेन, शीर्षक दुसरे हवे.

चित्रगुप्त 30/01/2023 - 18:27
'शर्यतीचा बैल' हे शीर्षक दिले असते तर जास्त चपखल झाले असते, म्हणजे पिच्चरांमधे वगैरे 'असली कातिल' कौन है, कत्ल किसने किया ... वगैरे जसे अगदी शेवटी समजते, तसे. पण मग एवढा उहापोह पण झाला नसता बहुतेक. एवढा सगळा उहापोह होऊनही आम्हाला 'शर्यतीचा बैल 'खच्चीकृत' असतो की नाही ? या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही ते नाहीच.

सकाळची वेळ. बंडू शाळेत जाताना माझे लाड केल्याशिवाय पुढे जातच नाही. मालकही रोज पाठीवर थाप मारणारच, दिमतीला गडी ठेवलाय.मी माझ्या बापासारखाच शर्यतीचा बैल आहे.या मालकाला माझ्या बापाने भरपूर बक्षिसे मिळवून दिली म्हणे. पण बरेच दिवस झाले नेहमीसारखा खुराक मिळत नाहीये. मालक कायतरी बोलत होते. बैलगाडा शर्यत ,कोर्टाचा निर्णय, औताला जुंपूया. संध्याकाळची वेळ.मालक मला शेतात घेऊन आलेत. मस्त वारा वाहतोय. अरेच्चा!!हे काय?चारी पाय बांबूला बांधून मला खाली पाडले. अचानक खाट खाट आवाज आले. सण्णकन डोक्यात कळ गेली आणि डोळ्यापुढे अंधारी आली. मोठ्याने ओरडायचे होते, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत.

आम्ही जातो आमुच्या गावा (भाग १- व्याप आवरते घेणे)

चित्रगुप्त ·

In reply to by चित्रगुप्त

अशासाठी की, परवाच एका जवळच्या मित्राबरोबर त्याच्या वडिलांच्या वृध्दापकाळाने आलेल्या आजारपणाबद्दल चर्चा झाली. थोडक्यात सांगायचे तर त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलेले आहे जवळच्या माणसांसोबत शेवटचे काही दिवस घालवण्यासाठी. मित्राला म्हणालो, तू जात का नाहीस, तर त्याचे उत्तर जवळपास माझ्या विचारांशी मिळतेजुळते होते. तो म्हणाला, ज्या वडिलांना लहानपणापासून वाघासारखं पाहिलंय त्यांना असं अंथरूणाला खिळलेलं नाही बघवणार. शिवाय, भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार. अजून बरीच चर्चा झाली. माझी एक सख्खी मावशीही पॅरालाईज होऊन अंथरूणाला खिळून आहे आणि मला शेवटंच बघायचं म्हणतीये. तिलाही बघायला मला जाऊ वाटत नाही कारण, मनात एक भयानक गिल्ट आहे की मी तिला बरी नाही करू शकलो. तिलाही मी लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना पाहिलंय, आता त्या अवस्थेत तिला नाही बघवणार. अजून एक, फार पूर्वी फिरोज खान नावाच्या एका हिंदी कवीची एक रचना वाचनात आली होती ती इथे देतो. ये भोर ठंडी है एकदम जैसे कि ठंडा है मेरा जिस्म ठंडी चीजें मर जाती हैं मैं भी मर जाऊँगा एक रोज मेरे मरते ही मर जाएगा ये शहर ये वतन ये दुनिया मर जाएगी मेरे मरते ही स्मृतियाँ मर जाएँगी मर जाएँगी मेरी प्रेमिकाएँ मेरी माँ मर जाएगी जिसके मरने का सताता रहा है डर वो पिता मर जाएगा मेरे मरते ही वे सब मर जाएँगे जिनके जीने की दुआएँ की थीं मैं एक खंडहर हूँ या कि हूँ एक ईश्वर ढह जाऊँगा एक रोज मैं मर जाऊँगा मेरे मरते मर जाएगा ईश्वर भी थोडक्यात काय तर, मृत्यू हा विषय अस्वस्थ करणारा असला, नकोसा असला तरी त्याच्या वेळेला तो येतोच. त्याला काय सुख-दु:ख, भाव-भावना, जाणीवा-वेदना असा कसलाही स्पर्श नसतो. ती असते फक्त एक घटना. पण तरीही, मानवी मन त्याला चटकन स्वीकारत नाही. आपल्या रक्ताचे, जवळचे, परिचयातले कोणीही जाते तेव्हा दु:ख हे होतंच. अजून तरी ती पिढी यायचीये पृथ्वीवर जी भावनांवर विजय मिळवून फक्त भविष्याकडे मार्गक्रमण करत राहील. कदाचित, मृत्यूवरही विजय मिळवेल. पण आतातरी आपण सर्वजण सामान्य मानव आहोत. जे भावनांपासून अलिप्त नाही राहू शकत. प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी असू शकते कदाचित. म्हणूनच एक सामान्य माणूस म्हणून मी विचार करतो. मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे. तुम्हांला काही वेगळं वाटलं असेल तर तो माझा लेखनदोष आहे. मी कितीही तुमच्या, माझ्या आईवडिलांच्या, स्वतःच्या किंवा आणखी कुणाच्या दीर्घायुष्याची कामना केली तरी त्यालाही मर्यादा आहेत हेही मी जाणून आहे. पण कुणाचेही जाणे किंवा त्याबद्दल कल्पना करणेही काही काळापुरते का होईना क्लेषकारक असते. एकूणच काय मृत्यूसारख्या भयकारी आणि नकोशा वाटणार्‍या विषयाचे चक्र डोक्यात सुरू झाले. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

सस्नेह 25/01/2023 - 19:36
मृत्यू नकोसा भयकारी, अस्वस्थ करणारा ही संकल्पना सोडली पाहिजे. मृत्यू हे खरोखर वरदान आहे, अपंग, आजारी, परावलंबी, अंथरुणाला खिळलेल्या जीवनापेक्षा. सुरेश भटांचे शब्द अगदी चपखल आहेत इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.. चित्रगुप्त यांचा लेख अगदी उचित आहे. व्याप कमी करणे, वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हे मृत्यूला हलक्या मोकळ्या मनाने सामोरे जाण्यासाठी आवश्यकच आहे.

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 25/01/2023 - 19:51
तरुणपणी मृत्यू हे सुंदर काव्य असतं. उतारवयात ते एक रुक्ष आणि भीतीदायक असे गद्य होऊन जाते श्री व्यंकटेश माडगूळकर

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 25/01/2023 - 21:37
संदीपभौ, तुमच्या मित्राने मृत्युशय्येवरील वडिलांना भेटायला न जाणे, आणि अंथरुणाला खिळलेली मावशी - जिला तुम्हाला भेटायची इच्छा आहे - तिला भेटायला न जाणं हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही.
--- वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल, त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही. भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू , आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय?
कर्नल तपस्वी यांच्या वरील प्रतिसादाशी मी शतप्रतिशत सहमत आहे. तुम्ही तुमच्या मावशीला भेटायला जाऊन - तुमच्या लहानपणापासून सार्‍या घराचं, नातलगांचं करताना तिला पाहिलंय, आणि तिच्या आपुलकीमुळे, कष्टांमुळे सगळ्यांचे कसे भले झाले वगैरे - तिला नक्की सांगा. त्या माऊलीला जे समाधान वाटेल, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. -- तुमच्या मित्राच्या बाबतीत तपस्वींनी माडलेली 'काळी बाजू' माझ्या लक्षात आली नव्हती, पण ती एक वस्तुस्थिती आहे.
भाऊ तिथे आहे, तो म्हणाला तू येऊन बाकी काही होणार नाही पण आई आणि इतर नातलगांची रडारड आताच सुरू होणार.
'बाकी' काय व्हायचे असते ? अशा वेळी आई-वडिलांना मिठी मारून रडणे, हेच महत्वाचे असते. रडारड होणे यात काहीही गैर नाही, व्यक्त व्हा, मुक्त व्हा.
मी फार वर्षांपासून तुम्हांला मिपावर बघत आलो. तुमचे वैविध्यपूर्ण लेखन आणि चित्रकला यांचा आस्वाद घेत आलो. तुमच्या वजन कमी करायच्या एका प्रयोगाला फॉलो करून मीही जवळपास तीसेक किलो कमी केले होते काही वर्षापूर्वी. म्हणूनच तुम्ही जेव्हा असे म्हणाल, "आम्ही जातो आमच्या गावा" तेव्हा कुठेतरी एक कळ उठणारच. ती तशी उठली म्हणूनच तसा प्रतिसाद दिला. आपण कधीही न भेटूनही माझ्या वतीने एक अनामिक नाते मी गुंफलेले आहे. ते कुठेतरी सुटतेय की काय ही जाणीव त्रासदायक आहे.
तुमच्या मनातील माझ्याविषयीच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात, हे खरोखर माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. आपण वृद्धपणी सुद्धा कुणालातरी हवेसे वाटतो, हा केवढा मोठा दिलासा असतो, हे त्या स्थितीत आल्यावरच समजते. अनेक अनेक आभार. इथे मला आपले मिपाकर 'चौकटराजा' आठवतात. त्यांचे अकाली जाणे अनेकांना चटका लावून गेले. 'मरावे तरी कीर्तीरूपे उरावे' याचे उदाहरण. प्रत्यक्ष मृत्युपेक्षाही त्यापूर्वीच्या काळात अनेकांची झालेली विविध प्रकारची दुर्दशा आपण ऐकलेली-पाहिलेली असते, त्यातून मृत्युविषयक भिती उपजते, असे मला वाटते.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

चित्रगुप्त 24/01/2023 - 15:46
पसारा आवरला गेला पंत. त्यातून मुक्त झालो आहे. लेखातील शेवटल्या काही परिच्छेदात त्याविषयी लिहीलेच आहे. आवश्यक सामान इंदौरच्या घरात नेऊन ठेवलेले असले तरी त्याबद्दल आता मनात काहीही मोह उरलेला नाही. (ते सगळे चोरीला गेले तरी काही वाटणार नाही, अश्या अवस्थेला पोचलो आहे.) अनेक आभार.

Bhakti 24/01/2023 - 14:58
मावळतीच्या रंगात मनासारखे चित्र साकरणारे हळूवार लिहिले आहे.

माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात तुमच्या सहचारिणीला किंवा तुमच्या वारसदारांना काही महत्त्वाच्या गोष्टींचा त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी, तुम्ही ती घेतच असाल. तुम्हाला आणि इतरांना मी या गोष्टी सुचवतो. तुम्ही तुमच्या सामानाची विल्हेवाट लावतच आहात त्याला पूरक अशा मी आणखी दोन गोष्टी सुचवतो. माझ्या औधत्याबद्दल आणि आगावूपणाबद्दल क्षमा असावी. ब्लॅक बुक / तुमचा आवडता रंग> बुक : माझ्या मते तुम्ही तुमच्या पश्चात संबंधित सर्व आप्तांना आणि विशेषतः सहचारिणी/जोडीदारांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत काही गोष्टी नमूद करून ठेवाव्यात. कृपया हे ध्यानात घ्या की तुमचा जोडीदार विनासायास या गोष्टी वाचून समजून घेऊ शकेल अशी स्पष्ट आणि विस्तृत पण साध्या सोप्या भाषेत हे वाचणार आहे. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्युमेंट झाले. ते कोणाकडूनतरी वाचून घ्यावयाचे असते. त्याचा अर्थ हे तज्ञ लावतात. (म्हणजे वकील). हे ब्लॅक बुक हे मृत्यूपत्र नसावे तर त्याला पूरक अशी माहिती साध्या सोप्या शब्दात कळेल अशी आणि जी माहिती मुत्यूपत्रात येऊ शकत नाही अशी पण महत्त्वाची माहिती संकलित करणारे असावे. हे बुक हार्ड म्हणजे लिखित/छापील स्वरूपात असावे. फक्त डिजीटल स्वरूपात नको. छापील+ डिजीटल असेल तर चांगलेच! यामध्ये फक्त फॅक्चुअल माहिती ठेवावी. भावनिक आणि वैयक्तिक नको. काही उदाहरणे - १. तुम्ही जो इमेल अ‍ॅड्रेस अनेक लीगल कामांसाठी वापरला आहे त्याचा पासवर्ड. तो इमेल अ‍ॅड्रेस डिअ‍ॅक्टिवेट करण्यासंबंधी सूचना २. तुमच्या सगळ्या अ‍ॅसेट्स (स्थावर जंगम, वाहने इत्यादी) यांची यादी. त्यासंबंधीची महत्त्वाची डॉक्युमेंट्स कुठे आणि कसे स्टोअर केले आहेत त्याची पूर्ण यादी. ३. तुमच्या सगळ्या लाअ‍ॅबिलिटीज ( कर्ज, उधारी-उसनवारी, नवस-सायास, दानधर्म, सेवा) यांची यादी आणि अर्थातच त्यांची कागदपत्रे, परतफेड करण्यासंबंधी सूचना इत्यादी. ४. तुमच्या सगळ्या सर्जनात्मक कामाची यादी. उदा. तुमचे पेंटिंग्ज. त्यांचे स्वामित्व हक्क आणि त्यासंबंधीच्या सूचना, कागदपत्रे यांची यादी. ( कृपया हे हलक्यात घेऊ नका. तुमच्या पश्चात तुमच्या आप्तांना या गोष्टींशी डील करावे लागणार आहे हे नेहमी लक्षात घ्या ) ५. सर्वात महत्त्वाचे - तुमच्या सर्व विम्यांची माहिती. त्यांचे नॉमिनीज. त्या त्या ऑनलाईन अकांऊंट्स चे पासवर्ड. ६. इतर महत्त्वाच्या ऑनलाईन अकांऊंट्सची माहिती. त्यांवरील तुम्ही लिहीलेल्या अनेकविध सर्जनात्मक कामाची प्राथमिक माहिती. ७. तुमची वैयक्तिक कागदपत्रे कशी आणि कुठे आहेत यांची सुस्पष्ट माहिती ८. ज्या गोष्टी तुमच्या वारसदारांनी पुढे चालवाव्यात अशा पारंपारिक गोष्टी. उदा. तुमचे घड्याळ जे तुम्हाला वंशपरंपरेने मिळाले आहे. एखादे फर्निचर, किचनवेअर जे पुढच्या पिढ्यांनी वापराव्यात, एखादी साधी पण कुटुंबासाठी मौल्यवान असलेली गोष्ट. उदा. तुळजाभवानीची परडी + कवड्यांची माळ ९. मृत्यूपश्चातल्या सूचना - विशेषतः अंतिम संस्कार आणि तशा सूचना. विद्युतवाहिनी इत्यादी. किंवा तुम्हाला तुमच्या अस्थी नद्यांमध्ये विसर्जित करू द्यायच्या नाहीत. किंवा तुम्हाला तुमची समाधि बांधणे नको आहे. किंवा तुम्हाला तुमच्या नावाने तुमच्या मुलांनी महावृक्ष लावावेत असे वाटत असेल तर. खूपदा आपण आयुष्यभर काही मूल्ये धरून आणि जमेल तशी पाळून आयुष्य कंठतो. परंतु परंपरेच्या नावाखाली आणि इतर सामाजिक दबावाखाली आपले वारसदार/पश्चातकुटुंब त्या मूल्यांविरोधी नकळत (त्यांचा दोष नसतो ) कृती करतात. तसे होऊ नये आणि तुमच्या मूल्यांचे पावित्र्य जपले जावे अशा सूचना. इत्यादी इत्यादी.. यादी वाढवता येईल. पण महत्त्वाचे म्हणजे या नोटबुक मध्ये फक्त माहिती आणि सूचना ठेवाव्यात. व्हाईट बुक/ तुमचा आवडता दुसरा रंग> बुक : या मध्ये तुम्ही वैयक्तिक गोष्टी ज्या तुमच्या जोडीदाराने वारसदारांनी समजून घ्याव्यात अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी. राग लोभांचे निराकरण, इच्छा आकांक्षांचा आढावा, कुटुंबाकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा, त्यांना आशीर्वाद, सदिच्छा अशा भावनिक गोष्टी लिहून ठेवाव्यात. जी गुपिते तुमच्याबरोबरच जातील अशी गुपिते लिहिली नाहीत तरी चालतील. परंतू उद्या तुमच्या पार्टनरला/वारसदारांना ती अचानक कळाली तर त्यांना धक्का बसू नये म्हणून शक्यतो मनमोकळेपणाने लिहावे. उदा. तुम्ही दोन महिने रॉ मध्ये अंडरकव्हर एजंट होता इत्यादी! जोक्स अपार्ट, काही गैरसमज तुमच्या माघारी इतरांना छळू नयेत अशी काळजी घेण्यासाठी हा प्रपंच! नेहमीप्रमाणे, तुम्हाला आनंद लाभो हीच सदीच्छा!

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चित्रगुप्त 25/01/2023 - 11:50
@ हणमंतअण्णा: उपयुक्त आणि मौल्यवान सूचना आणि सदिच्छेबद्दल अनेक आभार. कायदेशीर 'इच्छापत्रा'खेरीज आणखी दोन वेगवेगळी पत्रे करून ठेवणेही तितकेच महत्वाचे, गरजेचे आणि उपयुक्त आहे हे अगदी खरे. ढोबळपणे तसे थोडे केलेले असले, तरी हा प्रतिसाद वाचून ते काटेकोरपणे आत्ताच करून ठेवायला हवे हे जाणवले.

कंजूस 24/01/2023 - 16:47
मीही त्यातलाच हे अगदी थोडक्यात म्हणेन. भरपूर सामान छंदापायी जमवलं आहे. विल्हेवाट कशी लावायची ते माहीत नाही. रोज बोलणी खावी लागतात.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 09/08/2023 - 03:29
@ कंजूसः छंदापायी तुम्ही जमवलेलं सामान बघायला यायला हवं तुमच्याकडे. मला असं काही बघायला, त्याविषयी बोलायला खूप आवडतं. येत्या नोहेंबराच्या सुमारास मुंबई-पुणे प्रवास करायचा विचार आहे. त्यापूर्वी 'विल्हेवाट' लावू नका.

सुबोध खरे 24/01/2023 - 19:51
व्याप आवरते घेणे पाच वर्षांपूर्वी आमच्या सासूबाई अचानक हृदयविकाराने गेल्या. त्यानंतर आम्ही सासर्यांना एकटे राहू नका म्हणून सुचवल्यावर ते आपला बंगला विकून पुण्यात मुलाबरोबर स्थायिक होण्यासाठी गेले. त्यावेळेस आमच्या सासूबाईंनी जमवलेली अशी प्रचंड सामग्रीची आम्हाला चक्क विल्हेवाट लावावी लागली. त्यात स्वतः भरतकाम केलेल्या भरजरी साड्या, हौसेने जमवलेली भांडीकुंडी, कपडे इ होते जे आमच्या मुंबई पुण्यातील छोट्या घरात मावणे शक्य नव्हते. तुमच्या कितीही भावना गुंतल्या असल्या तरी ५०-६० साड्या मोठी मोठी पितळेची भांडी घरी नेणे शक्यच नव्हते. आणि ज्यांना दिल्या त्यांना त्याच्या मागची भावना समजू शकलीच नसती. त्यांच्या दृष्टीने त्या सर्व वापरलेल्या गोष्टी होत्या. अर्थात बऱ्याच गोष्टी आम्ही परित्यक्ता, अनाथ महिलाश्रम अशा ठिकाणीच दिल्या तरीही आपल्या भावना गुंतलेल्या गोष्टी देऊन टाकणे अतिशय कठीण असते. यास्तव आपण या गुंत्यातून आपला पाय वेळेत बाहेर काढणे हा विचार तेंव्हा पासून माझ्या मनात आहे. गेल्या वर्षी आमचे वडील पक्षाघाताने अचानक निवर्तले परंतु त्यांनी आपली संपूर्ण व्यवस्था इतक्या उत्तम रीतीने लावलेली होती इतकी कि जायच्या आदल्या महिन्यापर्यंत प्रत्येक गुंतवणुकीचा तपशील त्यांनी आपल्या संगणकात अद्ययावत करून ठेवलेला होता. आपले मृत्युपत्र करून सर्व मालमत्ता आमच्या आईच्या नावाने आणि त्यानंतर मी आणि माझा भाऊ यांच्याकडे कशी जाईल हे संपूर्ण लिखित स्वरूपात ठेवलेले होते. सगळ्याच्या सगळ्या गुंतवणूकीत आईचे एकत्र नाव असूनहि मुलं सुना नातवंडापैकी कुणाचे तरी नामांकनहि केलेले होते. यामुळे त्यांची सर्व मालमत्ता आणि वस्तू वारसाहक्काने येण्यासाठी आम्हाला वकिलाची सुद्धा गरज पडली नाही कि न्यायालयात प्रोबेट करण्यासाठी पायरी चढावी लागली नाही. ८६ व्या वर्षी जायच्या आदल्या दिवसापर्यंत बुद्धी उत्तम चालत होती आणि जीवन सुखासमाधानाने जगताना कोणतीही आसक्ती सुद्धा नव्हती. या दोन्ही अनुभवातून गेल्यामुळे अजून साठी झालेली नसली तरी जीवनाबद्दल आसक्ती राहिलेली नाही. आतापर्यंत जीवन सुखात जगत आलो आहे तसेच शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत राहणे आणि कोणत्याही गोष्टी बद्दल तृष्णा नसणे हि आता माझी इच्छा आहे. अर्थात जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही. असे करणे म्हणजे राष्ट्राच्या बहुमूल्य संपत्तीचा अपव्यय करणे असे माझे मत आहे मनाने मी कदाचित निवृत्तीच्या जवळ पोचत आहे.

In reply to by सुबोध खरे

चित्रगुप्त 25/01/2023 - 21:50
@ डॉ.सुबोध खरे- वृद्धत्व आणि मृत्यु यांचे अनेकरंगी पदर या धाग्याचे निमित्ताने इथे उलगडले जात आहेत, हे सर्व वाचकांसाठी चांगलेच. तुमच्या सासूबाई, वडील यांच्याविषयी तुम्ही जसे लिहीलेत, तसे अन्य मिपाकरही लिहीतील, तर या धागा अधिक मूल्यवान होईल असे वाटते.

शशिकांत ओक 24/01/2023 - 20:50
आता मला पैसा वाढवायचा नाही, तर मनमुराद भटकंती आणि छंद पुरे करण्यात खर्च करायचा आहे. उभा जन्म काटकसरीत घालवलेला आहे, आता तरी त्यातून मुक्ती हवी.
कलंदर मानसिकतेचे लोकच असे करू शकतील. बाकीचे ठरवतील पण ऐनवेळी खर्च करायला कचरतील... अंतर्मुख करणारा लेख. टप्पा २ काय म्हणतोय ते वाचायला उत्सुक आहे.

आवरतं घेता येणं, आपलं मन त्या स्थितीत नेता येणं, यासाठी जबरदस्त ताकद लावावी लागणार आहे. (थोडा जनरालयझेशनचा धोका पत्करून) महिला अशा बाबतीत जास्त हळव्या असतात. त्यामुळे असं करताना आपल्या अर्धांगाची समजूत घालणं हे थोडं जड जाऊ शकतं. १. हणमंतअण्णा यांच्या प्रतिसादासंबंधी - मी एक फाईल बनवली आहे. त्यात सगळ्या ऑनलाइन अकाउंट्सचे युजर आयडी आणि पासवर्ड, सगळ्या गुंतवणुकीची माहिती, विम्याची माहिती, यातील कोणत्या गोष्टीसाठी (गरज लागल्यास) कोणाची मदत घ्यावी हे आहे. (त्या त्या व्यक्तींना, तुम्हाला अशी मदत मागितली जाऊ शकते याची कल्पना देऊन ठेवली आहे). यात एक मेख अशी आहे, की अशी ऑनलाइन खाती (ईमेल पासून ते ऑनलाइन बँकिंग आणि डिमॅट पर्यंत) आपल्या अगदी कायदेशीर वारसदाराने (आपणच सांगितलेला) पासवर्ड वापरून ॲक्सेस करणं हे कितपत कायदेशीर आहे, याची एकदा शक्यता बघायला हवी. काही वर्षांपूर्वी एक बातमी वाचली होती, की पत्नी डिलीव्हरीसाठी रुग्णालयात दाखल असताना, पतीने तिच्या खात्यातून, तिचे atm card वापरून पैसे काढायचा प्रयत्न केला, तो बेकायदेशीर असल्याचा दावा बँकेने केला होता (आणि बहुधा न्यायालयाने तो उचलून धरला होता). २. @ डॉ, सुबोध खरे,
जोवर मेंदू काम करत आहे तोवर डॉक्टरी करत राहणे हे मी नक्कीच करणार आहेआणि जेंव्हा पैसा पुरेसा आहे असे वाटेल तेंव्हा सरळ धर्मार्थ काम करत राहणार पण निवृत्त होऊन घरी वेळ फुकट घालवणे नक्कीच करणार नाही.
हे प्रचंड आवडलंय. हे मला जमावं, अशी इच्छा आहे.

कंजूस 25/01/2023 - 05:35
विचारांना चालना देणारा लेख म्हणून पाहतो. केवळ वयस्कर लोकांसाठी नसून तरुण पिढीसाठीही योग्य ठरावे. म्हणजे कोणत्या वस्तू घ्यायच्या हो/नाही. १)पर्यटनातील खरेदी ? २)महागडी घड्याळे? -वेळ दाखवणारे यंत्र दोनशे रुपयांत मिळते ३)साड्या - शालू ,पैठणी,भरतकाम केलेल्या. पुढची पिढीच कशाला एकदा वापरून कपाटात ठेवण्यासाठी? ४)देवपुजा सामान व भांडी- भाविकपणा टिकणार का? ५) पुस्तके.- कथा कादंबऱ्या विकत आणणे?

In reply to by गवि

गवि 28/01/2023 - 10:52
पुन्हा वाचल्यावर एक विचार मनात आला. केवळ ऑन अ लाईटर नोट.. फार निरानिपटी आवरून जाऊ नये. पोरांसाठी काहीतरी शिल्लक ठेवावा व्याप, प्रोसिजर. आदर्श सोयीस्कर करून ठेवलं की पोरं आपल्या आठवणीने सारखी अधिकच दुःखी होतील. त्यापेक्षा, "म्हाताऱ्याला हयातीतच हे सगळं करून ठेवायला काय झालं होतं. शिंची कटकट सोडून गेला" असं नावं ठेवत आपल्याला मागे टाकून पुढे जगणं त्यांना सोपं पडतं. आणि त्यांनाही जरा सराव हवा की .. :-))

माझ्या कुटुंबा पुरता मी काय विचार करतो हे मी सांगू शकतो इतरांनी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी म्हणून काही गोष्टी व्यक्तिगत असू शकतात पण बर्‍याच गोष्टी लेखात,प्रतिसादात मांडल्या आहेत त्या सर्वांनाच लागू पडतात. मृत्यूची ओळख वय वर्ष बारा असतानाच झाली.वडील गेले,कर्तेधर्ते,त्यांच्या जाण्यामुळे मागे राहाणाऱ्या आप्त स्वकीय यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणी तेव्हांच लक्षात आल्या,अनुभवल्या व त्यातून बाहेर पडलो.एक गोष्ट मात्र अजूनही करू शकत नाही ती म्हणजे. ती मृतव्यक्ती पुन्हा कधीच दिसणार नाही यामुळे होणारी पिडा. लवकर मेला बाप म्हणून दृष्टी झाली साफ कोण सुखाचे कोण फुकाचे कळले सारे अर्थ नात्याचे ना लोटा ना थाली सारेच कमंडल खाली नाही कुणाची साथ आपणच आपला जगन्नाथ पुढे सैन्यात निवृत्तीवेतन विभागात काम करताना विधवा, आईवडील मुले यांना सैनिकांच्या मृत्यूनंतर होणारा त्रास याच्याशी संबध आल्यामुळे आपण गेल्यावर पाठीमागील लोकांना काय त्रास होऊ शकतो याची साधारण कल्पना आहे. व तो होऊ नये या साठी आगोदरच पावले उचलली आहेत. सर्व छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवल्या/ठेवत आहे. नामांकन सर्व ठिकाणी केले आहे.वैयक्तिक नावावर असलेली संपत्ती व कर्ज याची विल्हेवाट लावली आहे, थोडेफार बाकी आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे. ही एक न संपणारी गोष्ट आहे पण याचा दायरा,परीघ कमी करण्याचा प्रयत्न चालूच आहे. बायकोला व मुलींना जरी हा विषय आवडत नसला तरी वेळोवेळी यावर समुपदेशन करत राहातो. वडीलांनतर आलेल्या कौटुंबिक जबाबदारी मुळे देण्याची सवय जास्त म्हणून मोह फारसा कुठल्याच गोष्टीचा नाही. सर्कंश्री कंजूस ,हणमंत अण्णा यांनी व इतर वाचकांचे प्रतिसाद लेखनास पुरक आहेत. संदीप चांदणे यांचा प्रतिसाद खुप भाऊक आहे,आवडला पण यांचे म्हणणे पटत नाही.वडील वाघासारखे होते त्यांना विकलांग परिस्थितीत बघण्यास त्रास होतो हे जरी खरे असले तरी वडीलांना आपण जवळ असण्याने किती बरे,समाधान वाटेल,त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. या गोष्टी नाकारता येत नाही. भाऊ आहे,इतर नातेवाईक आहेत तू येऊन काय वेगळे करणार आहेस हे सुद्धा बरोबर असले तरी अंतिम समयी मी अमुक एक गोष्ट करायला हवी होती याची टोचणी उर्वरित आयुष्यात त्रासदायक होऊ शकते. याचीच एक काळी बाजू ,आम्हीच वडीलांचे सर्व केले असे बाकीचे म्हणतील त्याचे काय? संपत्ती असेल तर.... ( हे कटू सत्य आहे ते रोजच्या व्यवहारात आपण बघतोच.). पैतृक संपत्ती व मनुष्यस्वभाव यावर एक वेगळा लेख होऊ शकतो. मृत्यूची भिती वाटत नाही असे नाही पण तो येणारच आहे हे त्रिकालाबाधित सत्य मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सतत करतो. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ ll अशी उन्मनी स्थिती नसली तरी पुढील प्रवासाची तयारी चालू आहे. माझ्या हातात आहे तेवढे मी करणार बाकी मागे सुटलेले व त्यांचे नशीब.

अनिंद्य 25/01/2023 - 11:41
उत्तम संकल्प केलात आणि तो तडीस नेलात, शतवार अभिनंदन !!! So inspiring for all ! माझ्या "Döstädning उर्फ मोकळे हात" धाग्यावर तुमच्या प्रतिसादावरून तुम्ही यावर काम करता आहात याची कल्पना होती. पेन्टिंग्स कचरापेटीत टाकून द्यावी लागली याचे दुःख झाले, पण एकूण व्याप कमी केला हे फार आवडले. प्रवासात ओझे कमी असले तर मजा जास्त घेता येते, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि इच्छापूर्तीसाठी शुभेच्छा. तुमच्या पुढील लेखांची वाट बघत आहे.

टर्मीनेटर 25/01/2023 - 14:15
लेख आवडला! अशाच विषयावर मागे अनिंद्य साहेबांचा एक लेखही वाचनात आला होता आणि (जरी त्यातल्या विचारांशी सहमत नसलो तरी) तो ही एक लेख म्हणुन नक्कीच आवडला होता! "अनिश्चित भविष्याची काळजी करत वर्तमानात आनंदाने जगण्याकडे होणारे दुर्लक्ष" दोन्ही लेखांतून अधोरेखित झाले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत, त्याच्याशी कोणी सहमत असावे अशी माझी अपेक्षाही नाही! पेंटिंग्स ची विल्हेवाट लावतानाचा किस्सा भारीच 👍 'रोम रंगीं रंगले' हे आवडत्या छंदा विषयीचे लेखन वाचण्यात खूप रस असल्याने पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

विवेकपटाईत 25/01/2023 - 18:53
ही दिल्लीत राहणार्‍या 60 च्या वरच्या 90 टक्के लोकांची व्यथा आहे. द्वितीय युद्धाच्या काळात घरातून पळून/ सहमतीने अनेक मराठी लोक सैन्यात भर्ती झाले. युद्धांनंतर त्यांना सरकारी नौकर्‍य लागल्या. (माझ्या मोठ्या भावाचे आणि बहिणीचे सासरे यात यादीत). त्यांची पुढची पिढीही सरकारी नौकरीत आली. (1950 मध्ये दिल्लीत आलेल्या लोकांच्या पुढच्या पिढी सरकारी नौकरीत आल्या उदा. आमचा परिवार). 1970 मध्ये जनकपुरीत, हरी नगर, विकास पुरी किमान 150 लोकांनी स्वत:चे घर बांधले किंवा DDA फ्लॅट मध्ये आले. भाड्यावर राहणारे ही मोठ्या संख्येत होते. 1977 मध्ये एका प्लॉट वर दत्त विनायक मंदिर ही बांधले . मंदिर मुख्य रस्त्यावर नाही. 1980 मध्ये जनकपुरी (उत्तम नगर) आलो. रोज रात्री मंदिरात वर्दळ राहत होते. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 400 ते 500 लोक सहज होत होते. शनिवार-रविवार तर मंदिराच्या हाल मध्ये दिवसभर केरम टीटी आणि शेजारच्या बगीच्यात बॅडमिंटन इत्यादि. मंदिराच्या पुस्तकालायत 4 ते 5 हजार पुस्तके होते. 100 दिवाळी अंक ही याचे. तिसर्‍या पिढीत अधिकान्श मुले इंजीनियर इत्यादि झाली. त्यांना बंगलोर, पुणे किंवा विदेशात नौकर्‍या मिळाल्या. 1996 खांडेकर नावाचे सज्जन पहिल्यांदा फ्लॅट विकून महाराष्ट्रात गेले. त्यानंतर निवृती नंतर किमान 50 परिवार पुण्यात स्थायी झाले असेल. गेल्या 20 वर्षांत 90 टक्के लोक हा भाग सोडून इतर महाराष्ट्र, इंदूर इत्यादि ठिकाणी गेले. (अधिकान्श परिवारात एकच मूल होते). आज पाच परिवार जनकपुरीत राहत नाही. जे उरले आहेत त्यांची मुले ही दिल्लीत नाही. मंदिराच्या कार्यक्रमांत 50 लोक येत नाही. गणेश उत्सवाच्या भंडार्‍यात 100 ते 150. त्यातले अधिकान्श 60 + आहेत. मंदिरात येणारे अधिकान्श दक्षिण भारतीय होते. जनकपूरित ते ही मोठ्या संख्येने राहत होते. दर शुक्रवारी मंदिरात त्यांच्या श्री सूक्तचा कार्यक्रम व्हायचा. 100 एक लोक राहायचे. मंदिराचा खर्च (पुजारी सेवादार यांचे वेतन, पूजेचे पूजेचे वीज पाण्याच्या खर्च निघून जायचा). तो ही 3 वर्षांपूर्वी बंद पडला कारण तीन चार म्हातारेच उरले होते. आज मंदिराचा खर्च 30,000 रु महिना आहे. मंदिराच्या दानपेटीत 3000 रुपये ही येत नाही. त्यात शिखरासहित मंदिराची मोठी दुरूस्ती करणे भाग आहे. असो. घर सोडून जाताना सर्वांनाच त्रास होतो. माझ्या मुलाने ही ग्रेटर नोएडात एक फ्लॅट बुक केला आहे. मी ही किती काळ भागात राहणार सांगता येत नाही. बाकी दिल्लीतून महाराष्ट्रात परतलेले अनेक वृद्ध तिथेही एकटेच आहे. नव्या लोकांशी जुळविणे त्यांना ही शक्य होत नाही. नातेवाईक ही उदासीन राहतात. दिल्लीत किमान परिचित शेजारी तर होते.

चित्रगुप्त 27/01/2023 - 00:04
मिपाबाहेरील जगातही या लेखात मांडलेल्या अनुभवाचे पदसाद उमटत असल्याची ग्वाही आत्ताच मिळाली. या लेखाचा दुवा मी काही मित्रांना, परिचितांना पाठवला होता. त्यापैकी एकाचा आत्ता फोन आला. त्यांचेही फरीदाबादमधेच घर असून पाच-सात वर्षांपूर्वी नोकरीतून निवृत्त होऊन आता कधी पुण्याला मुलाकडे, कधी फरिदाबादला असे वास्तव्य करत आहेत. लेख वाचून त्यांनी घर विकणे वगैरे संबंधात चवकशी केली. त्यांचाही आता तोच विचार होत आहे, आणि आमच्याप्रमाणेच मनाचा लंबक कधी इकडे, कधी तिकडे झुलत आहे, घरातला पसारा अगदी सेम आहे वगैरे सांगितले. त्यांना वेगवेगळे लोक घर विकून येणार्‍या रकमेत पुण्यात दोन फ्लॅट घ्या, दुकान घेऊन भाड्याने वगैरे सल्ले देत आहेत, त्यामुळेही ते गोंधळून गेलेले आहेत. त्यांना मी या लेखाच्या परिधीबाहेर असलेल्या अनेक बारीक सारीक गोष्टींसकट एक मोठाच पट उलगडून दाखवत काही सल्ले दिले. त्यांनी कबूल केले की असे त्यांना कुणीही सांगितलेले नव्हते, आणि आता आपण काय करायला हवे आहे याची स्वच्छ कल्पना त्यांना आलेली आहे. असो. माझा अनुभव इतरांच्याही कामास येतो आहे, याचे समाधान वाटत आहे.

चौकस२१२ 27/01/2023 - 15:07
वेळ आली कि हा वयाप आवरत घेणे हे केले पाहिजेच पण ते वय होण्याआधी पण २-३ गोष्टी करणे जरुरीचे आहे १) मृत्यूपत्र २) सोप्या शब्दात ( ब्लॅक बुक ) सर्व महत्वाची माहिती लिहून ठेवणे आणि तिसरे म्हणजे मध्य वयातच फाफट पसारा न वाढवणे ... ( कळतंय पण वळत नाही असे ) कधी कधी वाटत कि अक्षरशः २ -३ ब्यागेत भरेल एवढे सामान असावे म्हणजे कधी हि कोठेही जाण्यास बंधने नकोत ( जणू काही आपण मल्या किंवा निरव मोदी आहोत आणि कधीही देश सोडवा लागेल तर ! )

कंजूस 27/01/2023 - 18:41
मरणार मरणार अशी वाच्यता वारंवार करून मुलांना दुखवायचं नाही. उद्या सकाळपासून काय काय करायचं हा विचार येणे बंद झाले की मनुष्य मेल्यातच जमा होतो. ते जाहीर करावं लागतं नाही.

लेख उत्तम आवडला. प्रतिसादही. वाचत आहे. सालं निरोपाचं सगळं कठीणच असतं. मन गुंतत राहतच असते माणसं असो की वस्तू. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 09/08/2023 - 18:23
"आवरते व्हा" विषयी सुंदर लेख !
समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही,
ही लेखाची सुरुवात वाचून मन कातर झाले. काही लोक जात्यात असतात, आपण सुपात असतो ही जाणीव तीव्र होते. स्वतःलाही "आवरते व्हा" हे आपोआपच जाणवायला लागते ! आवडलेली चित्रे, पेंटिग्ज, मासिके, कात्रणे, कॅलेन्डर्स प्रचंड प्रमाणात जमवायला लागलो होतो ... संग्रह कुठे ठेवायचा हा प्रश्न सुरु झालाच होता. त्यवेळी अगदी जवळचे वयस्क चित्रकार (त्यावेळी त्यांचे वय ७० वर्षे होते) त्यांच्या अवाढव्य संग्रहाचा, जागेचा, साठवणूकीचा आणी हाताळण्याचा प्रचंड त्रास सुरु झाला हे पाहून मनोमन ठरवले आपण संग्रह करायचा नाही ... त्या मुळे वयाच्या ३५शीत अपॉप "अपरिग्रह" अंगी बाणवला गेला ! गेल्या काही वरर्षांपासून "कोनमारी पद्धत बरीच चर्चली जाऊ लागली आहे ! चांदणे संदीप, सस्नेह, सुबोध खरे, Bhakti, हणमंतअण्णा शंकर..., कंजूस, तुषार काळभोर, कर्नलतपस्वी इत्यादि मिपाकरांनी खरंच खूप सुंदर प्रतिसाद लिहिलेत ! पेंटीग्जचे तुकडे करून मगच फेकले हा किस्सा खुसखुशीत आहे ! धन्यवाद, चित्रगुप्त जी ! आता पुढचा भाग वाचायला घेतो.

चौथा कोनाडा 30/01/2024 - 14:43
या लेखाचा पुढचा भाग 'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला' हा लेख वाचायला सुरुवात केला आणि हा धागा वाचला असल्याचे आठवले (त्या वेळी प्रतिसाद द्यायचा राहीला बहुधा) पुन्हा वाचायला आलो. सुंदर लेख आणी प्रतिक्रियाही तितक्याच सुंदर ! स्वतःचा व्याप आवरता घेऊन निरोप घेणे खुपच सुंदर ! (इथं मला कालावश वैगरे शब्द आठवताहेत ! ) धन्यवाद चित्रगुप्त !

मित्रहो, आयुष्याची सांजवेळ सामोरी आलेली आहे. दूरदेशीच्या ‘आपुल्या गावा’ कायमचे जाण्यासाठी वळकटी बांधून आता तयार राहिले पाहिजे आणि तिकडे नेणारा दूत आला की हसतमुखाने त्याला सामोरे गेले पाहिजे. समवयस्क मित्र एकेक करून आपापल्या दूताबरोबर रवाना होत आहेत आणि त्यांच्या तशा जाण्यातून आपलीही वेळ आता फारशी दूर नाही, ही जाणीव प्रबळ होत चालली आहे. तर आपले एकंदरीत व्याप वगैरे आता तरी आवरते घेतलेच पाहिजेत … आता व्याप म्हटले तर ते कोणकोणते ?

शशक- अशीही एक धुंद, गुलाबी सकाळ

राजेंद्र मेहेंदळे ·
मी- झालं का ग तुझं? ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो. मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष. ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला. मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं. ती - जाऊदे तो विषय. सांगून सांगून थकले मी. मी- डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? चिकाटीने प्रयत्न करत राहा. जमेल. ती- त्यांना काय जातंय सांगायला? एकतर मरणाची थंडी. मी- जाऊदे. येणारेस का तू मॉर्निंग वॉकला?नाहीतर मी चाललो.

शशक- निवडणूक

राजेंद्र मेहेंदळे ·

सौंदाळा 23/01/2023 - 10:48
खरयं पण अजून थोडा वेळ आहे. महानगपालिका निवडणुका तारखा जाहीर होऊ द्या. नाहीतर २०२४ मधे तर नक्कीच. पण तेव्हा रक्कम जास्त असेल.

तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे. मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा. तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा. मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले. तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल. मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत? तो-- जास्त नाही. ५० लाख.