सावरकर हा विषय का काढला असेल राहुलने आणि तमाम तथाकथित सेक्युलर, ढोंगी पुरोगामी, हुशार विचारवंतांनी का बरे तो उगाळायचा ठरवला असेल ? 2024 मध्ये काहीही करून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत याची यांना कुणी सुपारी दिलीय की काय ही शंका यावी !!
भारतीय समाजात एक अजस्त्र ध्रुवीकरण झाले आहे. याचा थांगपत्ता मोदी विरोधकांना नाही हे अशक्य आहे. काँग्रेस पक्षाचा नेता तपस्या, रामायण, मंदिरांमध्ये पूजा, जानवे परिधान करून फोटोग्राफी असले उद्योग अन्यथा का करेल ? सगळे राजकीय प्रयत्न करून झाल्यावर ज्या कारणामुळे मतदान मोठयाप्रमाणात विभागले जात आहे ती दृश्य वाटणारी कारणे निष्प्रभ करण्याचे हे प्रयत्न होते.