मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

सैंधव मीठ/हिमालयीन/खेवडा मीठ

Bhakti ·
लेखनप्रकार
काल सैंधव मीठ विकणारा एक ट्रक पाहिला.त्यात गुलाबी रंगाचे मोठमोठाले खडक होते,हे मी पहिल्यांदाच पाहत होते.

नराधम

सुबोध खरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नराधम आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२. त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता.

सार्थक जीवन

अनुस्वार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात.

पंढरीची वारी

Bhakti ·
लेखनप्रकार
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे.

“ चिअर्स! "

मी-दिपाली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“ काय घेणार ? रम, वोडका, वाईन की या पावसात चिल्ड बिअर ? ” तिने नेहमीच्या उत्साहात विचारलं. “ कॉफी, ” त्यानेही नेहमीसारखं थंडपणे उत्तर दिलं. “ खूप बोअर आहेस रे तू. ” “ आता जे पॅकेज आहे, ते आहे तुझ्यासमोर. Want to go for return or exchange ? ” “ नको, चालवून घेईन. वैसे भी ' तेरे संग एक सिम्पलसी कॉफी भी किक देती है, तेरे संग'.. ” ती खट्याळ चेहरा करून गात म्हणाली. “ तुझ्याकडे प्रत्येक सिच्युएशनवर गाणी कशी असतात गं ? मागच्या वेळी कुठला तरी विचित्र खेळ शोधून काढला होता. त्यात कमोड सीटवरचं गाणंही आठवलं होतं तुला. काय तर...' कुछ हुआ क्या? ', ' अभी तो नही... कुछ भी नही ' अशक्य आहेस.

आणीबाणी : लुटमारीचे 'उद्योग' !

सुधीर मुतालीक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्या भयानक कालावधी मधली ही बाजु फारशी चर्चेमध्ये नसते... २५ जुन १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात रीतसर आणीबाणी जाहीर केली. जगाच्या इतिहासात आजवर ज्ञात असणाऱ्या चमत्कारिक आणि भयानक पाशवी राजसत्तांपैकी एक स्वतंत्र भारताच्या नशिबी आली हे या देशाचे दुर्दैव. त्या संपुर्ण कालावधीमधली इंदिरा गांधी यांची हुकुमशाही, संजय गांधींची पाशवी अरेरावी आणि पोलिसांच्या क्रौर्याची परिसीमा या विषयी अनेकवेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. त्या भयंकर परिस्थितीमधून गेलेले लोक आजही अनेक किस्से सांगत असतात.

मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)

Bhakti ·
लेखनविषय:
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे

माधुरी

अक्षरमित्र ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी जन्मल्यापासूनच सुर्यवंशी होतो. मला जेव्हा शाळेत पाठवण्यात आलं तेव्हा मी ७.०० च्या शाळेला ७.३० वाजता पोहोचायचो. आईला जवळपास दररोजच शिक्षकांचा ओरडा खायला लागायचा. अर्थात दुपारी घरी गेल्यावर त्याबदल्यात माझी यशाशक्ती षोडोपचारे पुजा व्हायची तो भाग वेगळा. पण म्हणून मी उतलो नाही, मातलो नाही, घेतला वसा टाकला नाही. नंतर नंतर आई मला शाळेपासून अर्धा किलोमीटर लांबूनच सोडून द्यायची आणि आता एकटा जा म्हणायची. शेवटी शेवटी वैतागून वडीलांनी माझी शाळा बदलायचा निर्णय घेतला आणि चौथ्या इयत्तेत माझी रवानगी नवीन शाळेत झाली. नवीन शाळेचे नाव'लोकमान्य टिळक' होते आणि ती नावाप्रमाणेच काही बाबतीत सुधारणावादी होती.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

रिमोट..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा. मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.