लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..
- Read more about लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं.
माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी!