मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

पुस्तक परिचय: लॉक ग्रिफिन --लेखक -वसंत वसंत लिमये

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसांनी एक पुस्तक हाती आले आणि अतिशय रंजक असल्याने आठवड्याभरात वाचूनही झाले. त्याचीच ही ओळख. पुस्तकाचे लेखक वसंत लिमये हे माझ्यामते काही पेशाने लेखक नव्हेत. ते आय आय टी मुंबईचे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत आणि पुण्यात हाय प्लेसेस नावाची ट्रेकिंग संदर्भातील एक कंपनी चालवतात. ताम्हिणी घाटात गरुड माची नावाची कॅम्प साईटही त्यांनी बनवली आहे जिथे कॉर्पोरेट ट्रेनिंग वगैरे दिली जातात.

इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

सस्नेह ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला. २००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल. मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली. पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले.

मेरे प्यारे दुश्मन

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

काही विस्कळीत जुन्या नोंदी

जिन्क्स ·
लेखनप्रकार
Mandir माझ्या लहानपणीच्या घरा/अंगणाबद्दलच्या काही आठवणी. १. अंगणाच्या नैऋत्येला सूर्यास्तेकडे झुकलेला मोठा गुलमोहर होता. एवढे देखणे झाड पुढे आयुष्यात कधी पाहिले नाही. पूर्ण वाढीचा हा गुलमोहर एका सतेज कांतीच्या रुबाबदार पुरुषासारखा वाटायचा. ऐन रखरखलेल्या उन्हाळ्यात जेंव्हा इतर झाडे कोमेजून जायची तेंव्हा हा गुलमोहर तांबडी फुलें अंगावर फुलवून रुबाबात उभा असायचा. हा म्हशींच्या गोठ्याच्या मागे होता म्हणून रोजच्या वावरात तो दिसत नसे.

वॉल्डनकाठी विचार विहार (ऐसी अक्षरे मेळवीन-६)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वॉल्डनकाठी विचार विहार लेखक – हेन्री डेव्हिड थोरो अनुवाद –दुर्गा भागवत.

जुन्नर भटकंती-१

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसा घरून निघायला‌ उशीरच झाला.राष्ट्रीय महामार्ग ६१ ला‌ पोहचलो.हा रस्ता खुप चांगला असल्याने या‌ मार्गाचे प्रवास आवडतात.पिवळ्या फुलांनी बहरलेल्या मार्गांना‌ मागे टाकत जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नर सुरू होताच खोडद गावातील रेडिओ दुर्बीण दुरुन नजरेस पडते.१९९० साली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली. कित्येक दिवसांपासून नाणेघाट पाहायची इच्छा फलद्रूप होणार होती.सातवाहन‌ काळातील मार्ग जो डोंगर फोडून व्यापारासाठी अंदाजे इसपु.२३०ला बनवला गेला(इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार) नाणेघाटाला पोहचल्यावर पहिल्यांदा जो रांजण दिसला‌ ज्याचा वापर त्याकाळी

तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

कंजूस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तमिळनाडू - वारसा आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटन.

सकाळ प्रकाशन - ललित लेखन - एका खेळियाने

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपाकर मित्रहो, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळे बहुतांशी मिपावर लिहिल्या गेलेल्या "एका खेळियाने" ह्या लेखमालिकेला सकाळ प्रकाशनातर्फे आयोजित लेखनस्पर्धेत सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा पुरस्कार मिळाला. एका खेळियाने, क्रीडायुद्धस्य कथा आणि खासियत खेळियाची ह्या सदरांतर्गत लिहिलेले काही निवडक लेख सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात लवकरच प्रकाशित करण्यात येतील. या लिखाणामागे मिपाकरांच्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. हे आभारप्रदर्शन नाहीच. आपल्याच लोकांना "धन्यवाद" काय म्हणायचं? पण इतकं जरूर म्हणेन की तुम्ही लोकं आहात म्हणून लिहिण्यात मजा आहे.

अलेक्सा झाssssली ...!!

गवि ·
लेखनप्रकार
अलेक्सा... "झाssssलीssss ...!!!!!" माझा नातू खच्चून ओरडत होता. मी जमेल तितका झटपट उठून बसलो. एकदम उभा राहिलो तर मला ब्लॅक आउट व्हायला होतं. बराच वेळ मी आडवाच असतो ना, म्हणून. एक मिनिट बसून मी उभा राहिलो. संतुलित होऊन बाथरुमकडे पावलं टाकत निघालो. मीही जाता जाता अलेक्सा अलेक्सा ओरडत राहिलो. काय झालं होतं मला कळेना.