मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

Tensors: बलांच्या युतीचा(Confluence of Forces) ऊर्जा परिणाम (Scalar or Dot product) आणि बल परिणाम (Vector or Cross Product)

अनिकेत कवठेकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(तंत्रजगत दालन बहुतेक मिपावाल्यांनी बंद केले आहे..म्हणून इथे लेख..) विक्रमाच्या राज्यात एक अनोखीच म्हणावी  अशी बैलांच्या शक्तीची स्पर्धा घेण्यात आली होती. पण हि स्पर्धा साधी सुधी नव्हती. हि कुठल्याही मैदानात दोन मदोन्मत्त बैलांना झुंजवून किंवा त्यांना जोरजोरात पळवून रेस लावून अशी खेळली गेलेली नव्हती. कोणते बैल त्यांच्या मालकाच्या विहिरीतून सर्वात लवकर पाणी काढून शेताला पुरवतील अशी हि स्पर्धा होती. यात बैलांपेक्षा बैलांच्या मालकाची परीक्षा होती. कोणता मालक बैलाला कमीतकमी श्रम देऊन जास्तीत जास्त पाणी बाहेर काढतो हे विक्रमाला पाहायचे होते.

शशक | तीर

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या!

जिरेटोप

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"सर... ओळखलंत का मला?" आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्‍यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो. पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अ‍ॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा.

शशक- निवडणूक ३

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचे भाग निवडणूक निवडणूक २ साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात? अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार? पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा. अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात.

शशक- खड्डे

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नर्स- डॉक्टर, एव्हढी नारळाची झाडे का लावताय तुम्ही अचानक? नारळाचा बिसनेस वगैरे करायचा विचार आहे का? डॉक्टर- नाही, वाईच्या फार्म हाऊसवर लावतोय एक एक करून. मागच्या बाजूला मोकळी जागा आहे ना तिथे. नर्स- तुमचे फार्म हाऊस फारच एका टोकाला आहे. नाही का आपण दोघेच गेलो होतो एका वीकेंडला?आजूबाजूला काहीच वस्ती नाही. कम्पाउंडला लागून एकदम धोम धरणच आहे.मला तर बाई भीतीच वाटली. डॉक्टर- मी मुद्दामच तशी जागा निवडली आहे. काम उरकायला बरे पडते तिकडे. नर्स-किती खड्डे खणलेत आतापर्यंत? डॉक्टर- ६ खणलेत, त्यातले ४ भरलेत. एक या आठवड्यात भरेल आणि त्यात नारळाचे झाड लागेल. नर्स- बापरे.

मोगरा फुलला (ऐसी अक्षरे ..मेळवीन -८)

Bhakti ·
लेखनप्रकार
m एका निळाशार डोहात बुडून जावं,तळाशी माउलीची भेट घ्यावी.शिंपला हाती घेत काठाशी यावं.त्यात चमचमता निळा मोती असावा.तो मोती मोगराच्या फुलांच्या राशीत अलगद ठेवावा.असा भास मुखपृष्ठ पाहील्यापासुनच होतो. लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) ह्यांचे ज्ञानेश्वर चिंतनाचे फलित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक १९७५ साली प्रथम प्रकाशित झाले. ज्ञानेश्वरकालीन काळाचा मागोवा ,कावेरी (रुक्मिणीची सखी),भट्टदेव (साऱ्या कुटुंबाचे हितचिंतक)या काल्पनिक पात्रांचे स्वगत माध्यमातून कोमल,संवेदनशील ,काव्यशब्द लयीनी यात साकारले आह

शशक- निवडणूक २

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचा भाग शशक- निवडणूक आबा तंबाखू मळत ओसरीवर बसले आहेत. तेव्हढ्यात बाईकवरून एक कार्यकर्ता येतो. कार्यकर्ता- आबा!! इथे काय बसून राहिला आहेत? चला मतदानाला.नंतर ऊन तापेल. आबा - अरे बाळा, आम्ही म्हातारी माणसे. दोन वेळा खायला मिळाले की झाले.आम्हाला काय करायच्यात या भानगडी? कार्यकर्ता- तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आम्हाला.चला मी घेऊन जातो. आबा - काय भाव आहे यावेळी? कार्यकर्ता- ५०० रुपये. आबा खुशीत मिशीवर ताव देत बाईकवर बसतात. त्यांना मतदानकेंद्रावर सोडून कार्यकर्ता दुसरे गिऱ्हाईक पकडायला जातो.

वात्सल्य, विज्ञान आणि विधि(लॉ)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच हा व्हिडिओ व्हाट्सपवर पाहण्यात आला. संदर्भ असा - 'मि. चटर्जी वि. नॉर्वे' नावाचा एक चित्रपट येऊ घातलेला आहे.

कॅलेंडर

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपण कुठेही एखादा फाॅर्म भरायला गेलो तर त्यात तारखेचा रकाना असतोच. आपली स्मृती आपल्याला दगा देते आणि आपल्याला नेमकी त्यादिवशीची तारीख आठवत नाही. मग आपण समोर पाहतो. तिथं भिंतीवर कॅलेंडर असतं. ते पाहून आपल्या ला तारीख आठवते,आपण ती लिहितो. कॅलेंडर अर्थात् दिनदर्शिका अशी एक उपयुक्त वस्तू आहे. दिनदर्शिका ह्या विविध प्रकाशनसंस्थांच्या, विविध भाषांमध्ये उपलब्ध असतात.

नर्मदे हर , /;/ .

विअर्ड विक्स ·
लेखनप्रकार
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे. पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला.