Tensors: बलांच्या युतीचा(Confluence of Forces) ऊर्जा परिणाम (Scalar or Dot product) आणि बल परिणाम (Vector or Cross Product)
(तंत्रजगत दालन बहुतेक मिपावाल्यांनी बंद केले आहे..म्हणून इथे लेख..)
विक्रमाच्या राज्यात एक अनोखीच म्हणावी अशी बैलांच्या शक्तीची स्पर्धा घेण्यात आली होती. पण हि स्पर्धा साधी सुधी नव्हती. हि कुठल्याही मैदानात दोन मदोन्मत्त बैलांना झुंजवून किंवा त्यांना जोरजोरात पळवून रेस लावून अशी खेळली गेलेली नव्हती. कोणते बैल त्यांच्या मालकाच्या विहिरीतून सर्वात लवकर पाणी काढून शेताला पुरवतील अशी हि स्पर्धा होती. यात बैलांपेक्षा बैलांच्या मालकाची परीक्षा होती. कोणता मालक बैलाला कमीतकमी श्रम देऊन जास्तीत जास्त पाणी बाहेर काढतो हे विक्रमाला पाहायचे होते.
मिसळपाव