Skip to main content

शशक- अशीही एक धुंद, गुलाबी सकाळ

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 23/01/2023 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी- झालं का ग तुझं? ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो. मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष. ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला. मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं. ती - जाऊदे तो विषय. सांगून सांगून थकले मी. मी- डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? चिकाटीने प्रयत्न करत राहा. जमेल. ती- त्यांना काय जातंय सांगायला? एकतर मरणाची थंडी. मी- जाऊदे. येणारेस का तू मॉर्निंग वॉकला?नाहीतर मी चाललो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1568
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आवडलीच शशक.