मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

vidamban

(शाक दाट वाटान्याची)

रातराणी ·
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.

सारे जहाँसे

तिमा ·
देशद्रोह्यांचे राष्ट्रवादी(?) गीत सारे जहाँसे अच्छी इशरत जहाँ हमारी असलियत छुपाके उसकी, हम जीतेंगे ये बारी आये कहाँसे शातीर*, ले गये जागीर हमारी तडपते रहे है तबसे, वो याद आयी प्यारी मजहब नही सिखाता आतंकीसे बैर रखना ये काफिरोंकी साजिश ,वो कत्ले-आम करना वो दर्द है के हस्ति, मिटती नही जो उसकी सदियों रहा है दुश्मन, तख्ता पलट्के आया *शातीर - धूर्त, कावेबाज

जर्जरी वार्धक्य माझे

तिमा ·
जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

"बुवा....."

टवाळ कार्टा ·
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

माहितगार ·
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

पुढाऱ्याचे प्रेम

सप्तरंगी ·
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

माहितगार ·
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

घेई छंद

तिमा ·
घेई छंद हे लोकप्रिय गाणे, हीच प्रेरणा. आस्तिक-नास्तिक या खेळांत, बघा, खेळकरपणे घेता येत असेल तर! मतिमंद, भक्तिधुंद प्रिय ज्या,वृथानंद प्रभूपूजना दंग कर्मठांध, हा संग मिटता मनचक्षुबल होई बंदी हा मृदुंग परि सोडिना फांस भजनांत हा गुंग

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

नाखु ·
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ================

ती धावली ...... (विडंबन)

दमामि ·
पेर्ना प्रसंग कुठलाही असो ,दूध उतू जाण्याचा, ट्रेन वा बस पकडण्याचा , कुत्रा मागे लागण्याचा किंवा व्यायामाचा. जेव्हा बायका (विशेषत: वजनदार बायका .) धावतात तेव्हा तो देखावा अगदी हृदयंगम वगैरे असतो यावर कुणाचे दुमत नसावे. ( गज़लेचे वजन शेवटच्या शेरात असल्याने प्रेरणेत नसूनही तो घुसडला आहे, त्या बद्दल संदीपजींची माफी) "टनाची" होती बंदी, ती धावली कुणा वाटे न का संधी?