भावकविता
प्रश्न साधासाच होता...
प्रश्न साधासाच होता,
त्याने उत्तर टाळले..
आणि अबोलीचे फूल
तिच्या केसात माळले.
त्याचा रोजचाच खेळ,
चार दाणे पक्ष्यांसाठी..
पाखरांच्या नकळत,
त्याने हक्काने पाळले.
क्षणभर विसावला
जीव बकुळीच्या खाली..
सडे अनाम दु:खाचे
तिने पायाशी ढाळले.
आहे सुखाचा पाऊस,
डोळे भरले कशाने?
वेडे मन तुझे का ग
मृगजळास भाळले?
काव्यरस
( पुन्हा नोटा )
नोटा
(चाल : गे मायभू तुझे मी)
नोटा अनेक असती
येती तुझ्याकडे त्या
मी नोट शोधतो माझी
परक्याच भासती साऱ्या
दूरस्थ योजना* त्या
खुणवी सदा मनाला
मी गुंतवित जाता
बुडतात घेऊनि मजला
मागावयास जाता
देती कुणी न काही
नोटांनी भरले पाकिट
मी स्वप्नी रोज ते पाही
* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन "स्कीम"
वाटा
वाटा
वाटा कितीक असती
येती तुझ्याकडे ज्या
नाहीच एकही माझी
परक्याच वाटती साऱ्या
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
ओठांवरी तुझ्या ही
वसलेला तोच अबोला
वाटे परंतु तरीही
बोलणार कुणीही नाही
निःशब्द भावनांना
आभाळ साक्षी राही
पद्मश्री चित्रे
24102017
काव्यरस
( काल रातीला सपान पडलं )
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )
गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.
(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514
अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो.
बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….
भू नकाशा लांघणारे चित्र आहे
टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे
तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे
सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे
कवळी शाबीत गळती नेत्र आहे
शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे
अंत ना आदि असे अजस्त्र आहे
प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे
बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….
घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....
एक कागद
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला
जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला
एक कागद कस्पटासम ||धृ ।।
एक बालक हाती घेई,
मायेने मग आकार देई,
बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।।
उंच विहरता मन स्वच्छंदी,
हीन भासली भुतल रद्दी,
वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।।
वाटे त्यासी उंच उडावे
वादळ वारे यांसी भिडावे
कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।।
इतकी उंची तये गाठली
साद मनीची नभी आटली
ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।।
गगन ठेंगणे खुणवी तारे
मांजा परी तो रोखुनी धरे
दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।।
उंच उंच तो जातच राही
स्वानंदी मग
काव्यरस
एक सल नेहमीच - भावानुवाद
एक सल नेहमीच
एक दरवळ नेहमीच
अंगावरून जातो
डोळ्यांदेखत नेहमीच
एक काठ नदीचा भरतो
एक नाव नेहमीच
किनाऱ्याशी थडकते
एक रीत मला नेहमीच, लांबून खुणावते
मी आहे तिथेच बसतो
एक दृश्य नेहमीच, धूळीत साकार होते
एक चंद्रही नेहमीच
खिशात सापडतो
धिटुकली खार झाडावर
सूर्य गिळून घेते
हे जग तेव्हा नेहमीच
वाटाण्याएवढे भासते
एका तळहातावर जणू अलगद मावते
मी आहे तिथून उठतो
एक रात्र नेहमीच, मुंगीच्या पावलांनी येते
एक हसणे नेहमीच
झुळूकीसारखे वाटते
एक नजर नेहमीच
उबदार कानटोपी चढवते
एक गोष्ट नेहमीच
पर्वतासारखी दिसते
एक नीरवता नेहमीच
मला गुंडाळून ठेवते
मी जिथे असतो तिथून चालू लागतो
एक सल नेहमीच, प्रवास होऊ
काव्यरस
माझं मला
माझं मला
खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला जगायचंय
आभाळाचं निळं पाखरू
उरात भरून घ्यायचंय
धुंद अवखळ झऱ्या काठी
तृप्त पाणी प्यायचंय
हसऱ्या वेड्या तृणफुलातून
बेभान होऊन धावायचंय
खोल शांत सागराच्या
कुशीत थोडं निजायचंय
ईश चरण स्पर्शणाऱ्या
हिमशिखरात विरघळायचंय
त्याच्या अस्तित्वाच्या खुणांत
स्वतःलाच शोधायचंय
खूप जगले तुमच्यासाठी
आता माझं मला शोधायचंय
काव्यरस
हॕपी फ्रेंडशिप डे
सर्व मिपाकरांना फ्रेंडशिप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
**अतूट मैत्री **
मैत्री असावी फुलासारखी,
निशब्दपणे उमलणारी..
मैत्री असावी दवासारखी,
मोत्यासारखी चमचमणारी..
मैत्री असावी सूर्यासारखी,
प्रकाशमय करणारी..
मैत्री असावी चंद्रासारखी,
शीतलता देणारी..
मैत्री असावी धाग्यासारखी,
वस्त्र साकारणारी..
मैत्री असावी सुईसारखी,
नात्यांना गुंफणारी..
मैत्री असावी मेणासारखी,
मित्रांसांठी वितळणारी..
मैत्री असावी दगडासारखी,
अतूट राहणारी..
-निलम बुचडे.
आणखी कविता वाचायच्या असतील तर माझ्या पेजला भेट द्या.
काव्यरस
मिसळपाव