Skip to main content

भावकविता

उत्तर दे पण...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 16/10/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
इंदिरा संतांची एक नितांत सुंदर कविता "पत्र लिही पण नको पाठवू". पण आजकाल पत्र तर सोडाच, हातानं लिहिणंसुद्धा दुर्मिळ झालंय. संवाद होतो तो मेसेज आणि इमोजीमधून. इंदिरा संतांच्या त्या कवितेवर आधारित ही कविता.
काव्यरस

#तू म्हणालास...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 18/05/2021 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास, पाऊस मला मुळी सुद्धा आवडत नाही. चिखल ओला सगळीकडे, एक काम होत नाही. ऐकून इकडे माझ्या डोळ्यात काळे ढग जमून आले. बरसणार होतेच पण मी निग्रहाने घालवून दिले. पाऊस म्हणजे वेडेपणा, खूप मस्ती तुझ्या कुशीत, पाऊस म्हणजे कटींग चहा अर्धा कप अर्धा बशीत. पाऊस म्हणजे चिंब मी, थोडी धीट थोडी भित्री. पाऊस म्हणजे आशिकीच्या पोस्टरवरची मोठ्ठी छत्री पण तुझ्यासारखं असं कुणी पावसावरती रुसतं का? भिजणं बिजणं सोडून कोरडं पावसात घरी बसतं का? तेव्हापासून रागावून मी एक्कही मेसेज केला नाही वाटलं तुझा येईल ..
काव्यरस

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

चंद्रायण..!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 02/12/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

अंतर

लेखक aanandinee यांनी गुरुवार, 18/06/2020 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं माझं हे दूर असणं जसे नकाशावरचे दोन ठिपके. आठवण करून द्यायला जणू, की कितीही म्हटलं तरी झालोय परके. तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते. पण सरळसोट नाहीच ती, नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते. मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते... डॉ. माधुरी ठाकूर
काव्यरस

मरण

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 10/06/2020 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या उंबरठ्यावर अस्पृश्य सावली हलते. श्वासांच्या झुळूकेसरशी प्राणज्योत मिणमिणते. साऱ्यांच्या अधरांवरती तुझ्या रूपाची नावे. हा प्रवास अटळ माझा नि मागे पडती गावे. इवल्याशा ज्योतीचा विझून भडका झाला. जो इथवर घेऊन आला तो क्षणात परका झाला. -कौस्तुभ

यंत्र

लेखक निखिल आनंद चिकाटे यांनी सोमवार, 25/05/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात माणूस हा कसा या यंत्रणे मध्ये कसा गुरफटला गेला आहे या बादल मला कविता द्वारे सांगायचे होते. माझा या आधुनिकते बद्दल विरोध नाही पण आज काल माणूस माणसात राहिलेला नाही म्हणून मी आपले मनोगत व्यक्त करत आहे. क्षणासाठी वाटतय गोड, मित्रांची संगत. इथे दर दिसते मला , फक्त यंत्रांची पंगत. इथे आहे माणूस, फक्त यंत्रासाठी घडलेला . दिस रात फक्त, या यंत्रांच्या वजा. बाकीत गुंतलेला , घडीचा काट्या सोबत , धावतोय त्पाचा जीव रे . विचारलं तर म्हणतो , हे जिंदगानीची निव रे.

(वळण)

लेखक माहितगार यांनी रविवार, 29/03/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

परकीमिलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/02/2020 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा

माहेर, सासर

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/12/2019 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
माहेर, सासर नदीच्या त्या किनारी साजण माझा उभा कधीचा वाट बघतो माझी जीवाचा तो सखा अल्याड गाव माझे त्यात मी राहिले पल्याड त्याचे गाव कधी नाही पाहिले चिरेबंदी साचा भक्कम असे माझे घर नाही दिसत येथून घर त्याचे आहे दूर मनात त्याची सय मध्येच जेव्हा येते त्याचाकडची वाट नजरेला खुणावते मनी लागली हुरहुर कसे असेल सासर कसे का असेना मी शेवटी सोडेन माहेर - पाषाणभेद ०८/१२/२०१९