Skip to main content

भावकविता

प्रेमाची भाषा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/02/2015 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते... झुकलेल्या पापण्यात ती हळुवार रुजते... शब्दांशिवाय नकळत हृदयात उतरते... दोघांच हितगुज दोघांना सांगते! कधी ती कविता होते.. शब्दातून कागदावर उतरते... कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते; लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन... अशीच ती घरंगळते; दोघांच हितगुज दोघांना सांगते... प्रेमाची भाषा स्पर्शातुन फुलते; तरीही तिला शब्दांचे ख़त-पाणी लागते... मग ती रुजुन, बहरुन, उमलते.... दोघांचे हितगुज दोघांना सांगते!
काव्यरस

अंधार

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 20/02/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब ना कसला डाग, ना कुठला बट्टा सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ . जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते, तिथे तो आपले हातपाय पसरतो.. मस्त राहतो.. . तोच त्याला घेरुन राहतो अन् तोच त्याच्यात भरुन राहतो पण शांत शांत, एकटा जरूर आहे पण एकाकी नाही तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी . तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा त्याला आमंत्रण नाही लागत आगत स्वागत नाही लागत तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तोच येतो तुमच्याकडे तुम्हाला कुशीत घेतो त्याच्यातली शांतता जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे . अंधार एकटाच आहे

चॉकलेटचा बंगला ऽऽ

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 15/02/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट चा बंगला अजून आठवतो का हळूच मनात खरं खरं सांगा बरं गोष्ट राहील आपल्या आपल्यात... लहानपण जर जपलं असेल . बिस्किटांची गच्ची दिसेल टॉफीच्या दारामधली झुपकेवाली खार दिसेल ... लेमनच्या खिडकीमधून . उंच उंच झोका दिसेल झोक्यावर बसलात तर मैनेचा पिंजरा दिसेल चॉकलेट डे च्या दिवशी आज पुन्हा ऐकदा बंगला दिसला तुझीच वाट पहात होतो असं म्हणून हळूच हसला ... चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये तुम्ही सुद्धा जाऊन या बालपणीच्या आठवणी त फेरफटका मारून या!
काव्यरस

मौनात दडले क्रौर्य

लेखक गणेशा यांनी बुधवार, 11/02/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ
काव्यरस

नेहेमीची गोष्ट

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 07/02/2015 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
'Don't take me for granted'; तिने दम दिला 'अग? पण मी कुठे?' त्याने केविलवाणा प्रयत्न केला 'माहिती आहे मला तुझा स्वभाव... मला न विचारता... द्यायचा इतरांना भाव; एक गोष्ट लक्षात राहील तुझ्या... तर शपथ..' चिडून गेली ती आत तणतणत! कस सांगू हिला.. surprise आहे! तिचा वाढदिवस... माझ्या लक्षात आहे! एक गजरा... एक नाटक... नंतर long walk चा plan आहे... तिच्या आवडीच्या restorent मधे टेबलसुद्धा booked आहे... खरच आवडतेस ग मनापासून; विसरभोळा आहे घे सांभाळुन; संसार तुझ्याशिवाय अपुरा आहे... अस आपल् म्हणायच... खर तर मीच तुझ्याशिवाय अधूरा आहे....
काव्यरस

आई ....

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 05/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || -- शब्दमेघ
काव्यरस

स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 29/01/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता ||धृ|| हक्क कितीक आले आरक्षणेही आली आणि वेगळेपणाची मग लक्षणेही आली गर्दीत पुरुषांच्या कोंडतो श्वास येथे एकटेपणात होतो भलताच भास येथे शोधता स्नेह नयनी दिसतेच भूक आता कळपात श्वापदांच्या गत होई जी हरणाची होते तशी अवस्था अन भीती ही मरणाची एकही भला चेहरा ना वाटतो आधार सर्वांसमक्ष येथे घडतोही अत्याचार सगळा समाज वाटे झालाय मूक आता प्रत्येक नजर वाटे धरतेच डूख आता स्त्रीजन्म हीच आहे हर स्त्रीची चूक आता - अपूर्व ओक
काव्यरस

हृदयाचा फोन

लेखक महेश अशोक खरे यांनी मंगळवार, 27/01/2015 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉटस् ऍपवर एक हिंदी मुक्तकाव्य आलं होतं. आवडलं. वाटलं, हे मराठीत असेल तर छान होईल.
काव्यरस

अर्घ्य

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 07/01/2015 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
झळ उन्हाची येते लेवून गतकाळातील 'आठवकळा' ते दिवस नेटके होते अन रात्री उलगडलेल्या... मी तुला, तू मजला ... हलकेच पुन्हा आठवतो विस्मृतीच्या क्षणांसाठी कण कण साठवतो .... हळुवार पुन्हा मी हसतो त्या हसण्यावर ती रुसते बट केसांची नकळत, त्या गालावर रस्ता चुकते तो थेंब चिंब ओलेता ... हलकेच चुकार ओघळतो मी शुष्क कोरडासा, तो मला भिजवूनी जातो प्राजक्त कधी परसातला खांद्यावर ठेवतो डोके दरवळताना जाई-जूई, हळुच घेती व्याकुळ झोके तो स्पर्श चंदनी स्पंदनांचा हृदयाशी गुजगोष्टी करतो विसरताना मी तूला, आठवांचे 'अर्घ्य' देतो . विशाल
काव्यरस