पद्मश्री ताई, मनातले वेगवेगळे भाव खूप सुंदर रित्या मांडले आहेत. शेवटच्या कडव्याचा अर्थ नीट कळाला नाही. चालीत वाचताना थोडे अडखळया सारखे वाटले म्हणून हा बदल सुचवावासा वाटला (न मागता सल्ला देतोय किती मनावर घ्यायचा ते तुम्ही ठरवा.)
वाटा कितीक फुटती
(माझे मन चंचल आहे, एकीकडे त्याला तुझी ओढ आहे, आणि ते सतत नवनवीन बहाणे शोधात आहे. म्हणून "असती" च्या ऐवजी "फुटती" )
नेती तुझ्याकडे त्या
(त्या वाटा, मला तुझ्याकडे खेचत आहेत. त्या वाटा नुसत्याच तुझ्या कडे "येत" नाहीत तर त्यांच्याबरोबर मलाही तुझ्याकडे ओढतात )
मी वाट शोधते माझी
(मी द्विधा मनस्थितीत आहे, पुढे काय करू हे मला कळत नाहीये, मी मार्ग शोधतेय. कदाचित तुझ्याकडे येण्याचा ? पण ती वाट असावी, मनाला पटणारी )
परक्याच भासती साऱ्या
(मला तसा भास होतोय)
दूरस्थ तूही तेथे
ठाऊक पाहसी मजला
(पाहसी चा अर्थ काळाला नाही. प्रतिक्षा करतोय असे सूचित करायचे आहे का?)
ओठांवरी तुझ्या तो
परिचित सा अबोला
"वसलेला तोच" च्या ऐवजी हे गेय होईल व त्याचप्रमाणे "तोच" पेक्षा "परिचित" हा जास्त अर्थपूर्ण होईल.
वाटा जरी मिळाल्या
(या शेवटच्या कडव्यात नेमके काय म्हणायचे ते कळाले नाही. परंतु आणि तरीही या दोघांचा अर्थ जवळपास एकाच होतो. "जरी आपण भेटलो तरी" असे सूचित करायचे आहे काय?)
प्रतिक्रिया
'...एक राह अकेली सी कदमों से
'...एक राह अकेली सी कदमों से उतरती है।' ची आठवण करून देणारी तरल कविता. आवडली.
खरंच
In reply to '...एक राह अकेली सी कदमों से by एस
मनापासून धन्यवाद
कविता आवडली
कविता आवडली
सुंदर!
सुंदर!
दूरस्थ तूही तेथे
दूरस्थ हा शब्दप्रयोग आवडला. :-)
सुरेख...
कविता अतिशय आवडली
पैजारबुवा,
पैबु...व्हाट्स धिस..
In reply to सुरेख... by ज्ञानोबाचे पैजार
म्हणजे आधी तुम्ही कविता विडंबवली मग तुम्हाला कविता आवडल्याचा प्रतिसाद द्यावा वाटला! =))
lol
Sandy
अरे !!! तू पण ना संदीप...
In reply to पैबु...व्हाट्स धिस.. by चांदणे संदीप
कामाच्या आणि विडंबनाच्या गडबडीत प्रतिसाद द्यायचे राहून गेले होते.
त्या साठी पद्मश्री ताईंची माफी देखिल मागितली आहे.
पैजारबुवा,
खूप छान रचना आहे.
पद्मश्री ताई, मनातले वेगवेगळे भाव खूप सुंदर रित्या मांडले आहेत. शेवटच्या कडव्याचा अर्थ नीट कळाला नाही. चालीत वाचताना थोडे अडखळया सारखे वाटले म्हणून हा बदल सुचवावासा वाटला (न मागता सल्ला देतोय किती मनावर घ्यायचा ते तुम्ही ठरवा.)
वाटे तरी परंतु
In reply to खूप छान रचना आहे. by गबाळ्या
मला म्हणायचं आहे की मनातून कितीही वाटलं तरी पण (परंतु) , �दोघांपैकी कोणीही बोलणार नाही ..
परिचितसा अबोला हे छान ..
धन्यवाद सूचनांसाठी.
सूचनांसाठी
धन्यवाद . परिचितसा अबोला .. हे छान
धन्यवाद
पै तै, राघव
थँक्स् .
खूप दिवसांनी आले मि पा वर . छान वाटलं .