मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विसरु नकोस नाते

सागरसाथी ·

राघव 02/02/2023 - 20:00
छान लिहिलेत! आवडले. लयीत बसण्यासाठी किंचित बदल करावासा वाटला - नात्यास नाव अपुल्या देवू नकोस काही, स्वप्नातील गाव, इतके, व्यापू नकोस बाई. / स्वप्नामधील गावा व्यापू नकोस बाई. दरवळला सुगंध वाऱ्यावरी कधीचा, श्वासास दोष इतका, देवू नकोस बाई. माझेच वागणे जर होता कधी निराळे, विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. तुझाच रंग लेवून मी रंगलो कधीचा, विसरुन स्वप्न नाजुक, जावू नकोस बाई.

मीटर मधे बसायला असे करता येईल का? नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही "स्वप्नात गाव" इतके व्यापू नकोस बाई. "वार्‍यावरी सुगंध" हा पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल वागणे जे माझे जगा विरुद्ध "खोडुनी विचार" माझे काढू नकोस बाई. मिसळून रंग "तू"झा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न "हळवे" जावू नकोस बाई.

चलत मुसाफिर 29/07/2023 - 20:51
कल्पना व शब्दसंपदा चांगली वाटली. गेयतेकडे जरा लक्ष द्यावे अशी नम्र सूचना करतो

सतिश गावडे 30/07/2023 - 14:44
कविता लयीत व मीटरमध्ये बसत नसल्याने तसेच गेय नसल्याने विरस झाला. मुळात अशी कविता कवी लीहूच कशी शकतो हा प्रश्न पडला. शेवटी "तूम तो ठेहरे परदेसी" ची चाल लावून पाहिली. ती लागली आणि मी कवीला माफ केले. पुढच्या वेळी कवीने काथ्याकुट सदरात धागा काढून लय, मीटर आणि गेयता वगैरे गोष्टींच्या विषयी सूचना मागवून त्यानुसार कविता लिहावे असे मी कवीला सुचवतो.

वामन देशमुख 30/07/2023 - 16:45
"नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही." असे काही आम्ही विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात कॉलेजात असताना बरळायचो.

नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट

नको ना रे

पाषाणभेद ·

जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी घ्या ना थोडीशी थोडीशीच घ्या ना आजच्याच दिवस १ ६० ३० उलीशीच घ्या ना...... जशी समजली तशीच प्रतिसादली. पाभे भौ कृ ह घ्या.......

चित्रगुप्त 03/01/2023 - 11:37
नको नको म्हटलं तरी मिपावर येणं होतंच नको नको म्हटलं तरी कविता वाचणं होतंच ... बाकी काय काय नको, ते समर्थ सांगून गेलेतचः नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे। अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥ नको वासना वीषयीं वृत्तिरुपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥ नको रे मना वाद हा खेदकारी। नको रे मना भेद नानाविकारी ॥ नको रे मना शीकवूं पूढिलांसी। अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ ........ ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे.... असेही कुणितरी म्हटलेच आहे, तस्मात : नको वीट मानूं पाषाणभेदा। अती आदरे बोलिले सर्व वेदा ॥ जय जय रघुवीर समर्थ.

नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

उडून गंध चालल्या...

Deepak Pawar ·

राघव 06/12/2022 - 21:33
चांगला प्रयत्न. कल्पना चांगल्या. पहिल्या ओळीत खडा लागल्यासारखं होतंय. जरा बदल झाला तर पहावा. तसंच मीटरही थोडं अजून कडक सांभाळायला हवं, गझल लिहिणार असाल तर. नाहीतर जरा इकडे तिकडे चालतं. पुलेशु.

उडून गंध चालल्या फुलास वाटते तसे कसे सुने - सुने उदास वाटते. कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा झडून पान चालल्या तरुस वाटते. पवन तुला करीत स्पर्श जातसे अता दरवळला चहूकडे सुवास वाटते. कशास जन्म हा जगून काढला इथे उगाच का असे - तसे मनास वाटते. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी तिथेच संपला असे प्रवास वाटते. दीपक पवार.

फिरुनी केली मनात दाटी...

Deepak Pawar ·

उद्दंड या आठवणी पुन्हा पुन्हा दाटुन येती थकल्या भागल्या जीवाची ऐशी तैशी करून जाती जाळुन पुरून टाका त्या आठवणीच्या कलेवराला नाहीतर उखडून टाकतील इमारतीचा पाया हळवी कवीता. छान.

फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.

दुपार

कर्नलतपस्वी ·
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

बरसणाऱ्या सरी|

Bhakti ·

फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती.
वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे

Bhakti 20/09/2022 - 16:29
Q १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!

नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती

चक्रव्युह

ज्ञानोबाचे पैजार ·

सस्नेह 28/05/2022 - 12:26
माझ्याया मनाच्या पाशी करुणा दाटो जराशी हे आवडले

पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115 शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते?

मेघ भरुनी येताना.

Deepak Pawar ·
मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. रिमझिमती असते बरसात चिंब चिंब भिजलेली रात कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. मृदगंध भारला वारा भारी गंधाने गगन धरा वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. हे तरूवर सर्व स्तब्ध शांत सभोती उदास हा एकांत अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

नको पुन्हा एकदा

सागरसाथी ·

कवितेचे शिर्षक वाचून मोठ्ठा गैरामज झाला, वाटले श्रुंगारीक कविता असेल आणि मोठ्या अपेक्षेने कविता उघडली. पहिल्या दोन ओळी वाचल्यावर तर खात्रीच झाली की कविता नक्की त्याच्या बद्दलच आहे पण पुढच्या ओळींनी एकदम भानावर आलो. पैजारबुवा,

नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा. हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा. डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा. देवा तुच धर हात माझा या मावळतीला झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

पाषाणभेद ·

वो था तो कोई गम न था। नही है तो आँखे नम होती है। उसकी यादोमे अक्सर राते गमगीन होती है। नसीहत जो कभी मुसीबत लगती थी। आज वही मुसीबत मे राहत लगती है। रोकता था टोकता था। अक्सर मन सोचता था ये ऐसा क्युं है। आज नही है तो दिल उसीको खोजता क्युं है। बरगद का साया था। हर राझ सिखाया था। परवरीश मे जिसने अपना तन मन धन गवांया था। था वो तो हर मुकाम मुक्कमल हुआ। जिंदगी के हर पादान पर पहाड सा खडा हुआ। बाप बनके देखो बाप क्या चिज होती है। उसकी यादोमे आज भी आँखे नम होती है। मै भी एक बाप हूँ। आज भी कमी महसुस होती है। कभी अकेला होता हूँ तो अटलजी की कवीता याद आती है। " उठो द्रोपदी वस्त्र संम्भालो अब गोबिन्द न आयेंगे।"

कविता चांगली आहे असं आत्ता म्हणण्याचे मन होत नाही . या दुःखातून मी गेलेलो असल्याने त्याची कल्पना मला आहे . आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत . श्रद्धांजली !

पाषाणभेद 11/01/2022 - 00:39
माफ करा. माझे वडील गेल्या मे महिन्यातच गेले आहेत, पण दु:खाचे कढ संपत नाहीत अन मग शब्दांचे रूप घेवून ते येतात. आपल्या आपूलकी बद्दल आभार.

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२