✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिरुनी केली मनात दाटी...

D — Deepak Pawar, Fri, 11/11/2022 - 09:24
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.

प्रतिक्रिया द्या
1287 वाचन

💬 प्रतिसाद (2)

उद्दंड या आठवणी

कर्नलतपस्वी
Fri, 11/11/2022 - 10:13 नवीन
उद्दंड या आठवणी पुन्हा पुन्हा दाटुन येती थकल्या भागल्या जीवाची ऐशी तैशी करून जाती जाळुन पुरून टाका त्या आठवणीच्या कलेवराला नाहीतर उखडून टाकतील इमारतीचा पाया हळवी कवीता. छान.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Deepak Pawar
Fri, 11/11/2022 - 12:29 नवीन
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा